नवी मुंबई : आमदार मंदा म्हात्रे व विजय चौगुले यांच्या सांगण्यावरूनच गणेश नाईक यांच्या विरोधात बलात्काराची खोटी तक्रार दाखल केली होती असा खळबळजनक आरोप एका महिलेने नेरूळ व बेलापूर पोलीस स्टेशनला दिलेल्या पत्रात सात मे ला केला होता. या पत्रामुळे नवी मुंबईतील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली होती.

आज बाळासाहेब ठाकरे गटाचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी चौगुले यांना केलेला कॉल व त्याचे रेकॉर्डिंगच माध्यमांसमोर ऐकून संबंधित महिलेची नार्को टेस्ट करावी व तिला पोलिसांनी संरक्षण द्यावे अशी मागणी सानपाडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

या कॉल रेकॉर्डिंग मुळे दूध का दूध व पानी का पानी झाले असून आपण या संदर्भात नवी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र व हे कॉल रेकॉर्डिंग देणार असल्याची माहिती चौगुले यांनी माध्यमांना दिली.

आपल्याला फसवले जात असून पोलीस स्टेशनला पत्र देण्यापूर्वी राहत असलेले घर ,ऑफिस व सात करोड रुपये तयार आहेत असे सांगण्यात आले होते असा खुलासा महिलेने या रेकॉर्डिंगमध्ये केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता महिलेच्या फोन रेकॉर्डिंगवरून राजकीय वातावरण आणखी तापणार असल्याचे चित्र आहे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपचे आमदार मंदाताई व विजय चौगुले यांचे नाव घेऊन तक्रार करायला लावल्याचे कॉल रेकॉर्डिंगमध्ये स्पष्ट होत असून याबाबत नवी मुंबई पोलीस आयुक्तांना भेटून संबंधित महिलेची नार्को टेस्ट करायला सांगणार असून या सर्व प्रकरणामागे कोणाचा हात आहे हे स्पष्ट होत आहे – विजय चौगुले जिल्हाप्रमुख बाळासाहेब ठाकरे गट नवी मुंबई