scorecardresearch

Premium

बारवीच्या पाण्याची प्रतीक्षाच, बारवी विस्तारीकरण योजनेतील कामे पूर्ण होईपर्यंत पुरवठा अशक्य

ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शहरांसाठी पाण्याचा प्रमुख स्रोत असलेल्या बारवी धरणातील वाढीव पाणी पुढील दीड वर्षे तरी मिळणार नाही. महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) या दोन्ही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांना तसे कळवले आहे.

Barvi water
बारवीच्या पाण्याची प्रतीक्षाच, बारवी विस्तारीकरण योजनेतील कामे पूर्ण होईपर्यंत पुरवठा अशक्य (संग्रहित छायाचित्र)

ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शहरांसाठी पाण्याचा प्रमुख स्रोत असलेल्या बारवी धरणातील वाढीव पाणी पुढील दीड वर्षे तरी मिळणार नाही. महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) या दोन्ही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांना तसे कळवले आहे. बारवी पाणीपुरवठा विस्तारीकरण योजनेतील अनेक कामे सध्या सुरू आहेत. ही कामे पूर्ण नाहीत, तोवर वाढीव पाणी देता येणे शक्य नसल्याचे कळविण्यात आले आहे. तसा ठराव संचालक मंडळाच्या बैठकीत नुकताच झाल्याची माहिती वरिष्ठ प्रशासकीय सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

यंदाच्या वर्षी जुलै आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस झाला. त्यामुळे शहरांना २०२४च्या आरंभीच पाणीकपातीला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. जिल्ह्यातील मोठ्या शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने सूर्या धरण पाणी योजनेच्या वेगवेगळ्या टप्प्यांना वेग दिला आहे. ठाणे जिल्ह्याला सर्वाधिक पाणी देऊ शकेल, अशा काळू धरणाच्या उभारणीसह इतर अनेक प्रकल्प अजूनही कागदावर आहेत. त्यामुळे भविष्यात पाण्याचे नवे स्रोत अद्याप हाती लागलेले नाहीत.

Ajit Pawars order to gave Water to Pune from Mulshi Dam
पुण्याला मुळशी धरणातून पाणी- अजित पवार यांचे आदेश
seeds worth 9 lakhs seized from farmers in Andhra Pradesh
आंध्रप्रदेशातील शेतकऱ्यांकडून ९ लाखांचे चोरबिटी बियाणे जप्त
Chandoli water
सांगली : तीन दशकाचे चांदोलीच्या पाण्याचे स्वप्न सत्यात उतरले
Investment growth potential due to aviation services in Gondia
उद्योग, आरोग्यसेवेत सुधारणा, कृषी क्षेत्राकडे लक्ष देण्याची गरज; गोंदियामध्ये विमानसेवेमुळे गुंतवणूक वाढीची शक्यता

हेही वाचा – जुन्या आनंद आश्रमाच्या आठवणीत सगळेच रमले

चार वर्षांपूर्वी जिल्ह्यातील एमआयडीसीच्या बारवी धरणाच्या विस्तारीकरणाचा तिसरा टप्पा पूर्ण झाला. त्यामुळे धरणाची क्षमता ३४० दशलक्ष घनमीटर इतकी झाली. धरणाची उंची वाढल्याने ठाणे जिल्ह्यातील सर्वच महापालिकांनी बारवी धरणातून वाढीव पाण्याचा साठा मंजूर व्हावा, असा आग्रह धरला आहे. धरणाची उंची वाढवल्यानंतर त्यामुळे प्रकल्पग्रस्त झालेल्या ६८ पैकी ६२ जणांना नवी मुंबई महापालिकेत सामावून घेण्यात आले. त्याबदल्यात नवी मुंबई महापालिकेला बारवी धरणातून २५ एमएलडी पाणी एमआयडीसीमार्फत मिळणे अपेक्षित होते. परंतु,ते ठरलेल्या प्रमाणापेक्षा कमी दिले जात आहे. त्यामुळे ऐरोली, घणसोली येथील नागरिकांना पाण्याचा तुटवडा भासत आहे.

हेही वाचा – ‘आनंद दिघे साहेबांचा हंटर कुठेय’, मुख्यमंत्र्यांनी विचारले निर्मात्यांना, जुन्या आनंद आश्रमाच्या आठवणीत मुख्यमंत्र्यांसह सगळेच झाले रममाण

पुरवठा यंत्रणा

  • ७५१.११

कोटी नक्त प्रकारातील कामे

  • ८६३.७८

कोटी ठोक कामे हाती

बारवी धरणातून विसर्ग केलेले पाणी बारवी नदीत सोडले जाते. बारवी नदी उल्हास नदीस जांभूळ गावाजवळ मिळते. या नद्यांच्या संगमाच्या खालील बाजूस अशुद्ध पाणी नदी पात्रातून उचलण्याकरिता बंधारा बांधून अडवले आहे. अडविलेले पाणी उल्हास नदीच्या किनाऱ्यावर मौजे वसत येथे बांधलेल्या जल उदंचन केंद्राद्वारे उचलून जलवाहिन्याद्वारे जांभूळ येथे स्थापन केलेल्या बारवी जलशुद्धीकरण केंद्रात पाठविले जाते. पुढे महामंडळाच्या अंबरनाथ, बदलापूर, अतिरिक्त अंबरनाथ, तळोजा, डोंबिवली, टीटीसी, वागळे इस्टेट आणि ठाणे या औद्याोगिक वसाहतींना आणि त्यांच्या आजूबाजूला असलेल्या नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, उल्हासनगर, सिडको, म्हाडा वसाहती, अंबरनाथ आणि मीरा-भाईंदर या शहरांना हे पाणी पुरविण्यात येते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Waiting for barvi water supply impossible till completion of works in barvi expansion plan ssb

First published on: 28-11-2023 at 13:02 IST

आजचा ई-पेपर : नवी मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×