नवी मुंबई : नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे प्रकल्पाची जल वहिनी फुटल्याने आज (१०जून) संध्याकाळी नवी मुंबईत कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. सकाळी ११ च्या सुमारास आदई गावा नजीक मोरबे धरण प्रकल्पाची २०२४ मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटली आहे.

हेही वाचा – नवी मुंबई:बेदाणे लिलाव केंद्राला टाळे; बेदाण्याची विक्री होत नसल्याने शेतकऱ्यांची एपीएमसीकडे पाठ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. नवी मुंबईकर नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. बुधवारीच मान्सूनपूर्व कामासाठी पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यानंतर कमी दाबाने पाणीपुरवठा केला गेला. मात्र आजही अनेक भागात पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यात आता जलवाहिनी फुटल्याने आज कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे.