नवरात्रोत्स सूरु असताना गेल्या तीन दिवसापासून खारघर, द्रोणागीरी व उलवे वसाहतींसह तळोजा गावात पाण्याची बोंबाबोंब सूरु आहे. सिडको महामंडळाची हेटवणे धरणातून वसाहतींना पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने ही पाणी टंचाईची समस्या उद्भवली आहे. या जलवाहिनीला लोखंडी ठिगळ लावण्याचे काम सूरु असल्याने सोमवारी हे काम पूर्ण होऊन कमी दाबाने का होईना सिडकोवासियांची ही समस्या दूर होईल अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. या पाणीबाणीमुळे वसाहतींशेजारील अनेक ग्रामस्थांनी विहीरींची व विंधणविहीरींमधील पाण्याची उपल्बधतेवर आपली सोय करण्याचा प्रयत्न केला मात्र पिण्यासाठी शुद्ध पाणी पिण्यासाठी हवे असल्याने हजारो सिडकोवासीयांना सीलबंद पाणी बाटल्या खरेदी करुन स्वताची तहान भागवली. हेटवणे धरणातून खारघर, तळोजा, उलवे आणि द्रोणागिरी वसाहतींना पाणी पुरवठा केला जातो.

हेही वाचा >>> रस्त्याकडेला लघुशंकेसाठी वाहन थांबवणार असाल तर सावधान…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुक्रवारी रात्री मुख्य जलवाहिनी हेटवणे धरणानजीक सापोली गावाजवळ फुटली. यामध्ये लाखोलीटर पाणी वाया गेले. शुक्रवारी फुटलेली जलवाहिनीचा दुरुस्ती तातडीने करुन पुन्हा पाणी पुरवठा पुर्ववत होईल असे आश्वासन सिडको मंडळाचा पाणी पुरवठा विभागातील अधिकारी नागरिकांना देत होते. मात्र तसे झाले नाही. रविवारी सिडको वसाहतींमधील खारघरसारख्या गावांमधील महिला गावदेवी मंदीराशेजारील विहिरीवर पाणी भरत होत्या. घरात पाण्याची बोंब असताना नवरात्रोत्सवात देवीसमोर आंघोळ न करता गरबा खेळण्यासाठी कसे जावे असा संतापजनक प्रश्न यानिमीत्ताने महिलांकडून व्यक्त केला. याबाबत पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी चोईथानी यांना संपर्क साधला मात्र संपर्क होऊ शकला नाही.