नवी मुंबई : सायबर गुन्हेगारी जगतात “मॅन इन मिडल अटॅक” हे प्रचलित वाक्य झालेले आहे. अशाच प्रकारातून एका व्यावसायिकाची १ कोटी ५४ लाख ५६ हजार ४४४ रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सायबर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. आपण अनेकदा . पेटी, खोका, टपकाना असे अनेक शब्द गुन्हेगारी क्षेत्रावर आधारित चित्रपटात प्रयोग झालेले ऐकतो. सायबर गुन्हेगारीत सुद्धा आता नव्याने शब्द प्रयोग रूढ होत आहेत. त्या पैकीच एक ‘मॅन इन मिडल अटॅक’ असाच सायबर अटॅकद्वारे नवी मुंबईतील एका व्यापाऱ्याचे १ कोटी ५४ लाख ५६ हजार ४४४ रुपयांची फसवणूक झाली आहे.

हेही वाचा : नवी मुंबई : सलग सुट्ट्या आणि मेळाव्याने एपीएमसी परिसरात वाहतूक कोंडी

अब्दुल मतीन कुरेशी हे फार्मासिटिकल मशीनचा पुरवठा करतात. हे मशीन ते चीन मधील शांघाई फार्मास्युटिकल मधून आयात करतात. मशीनची मागणी व इतर बोलणी आदी सर्व इ-मेल द्वारेच होत असते. नेहमी प्रमाणे एक मोठी ऑर्डर अब्दुल यांनी शांघाई फार्मास्युटिकल कंपनीला दिली. सर्व व्यवहार मेलद्वारे होत असल्याचा गैरफायदा घेत शांघाई फार्मास्युटिकल या मेल आयडीशी साधर्म्य असलेला केवळ एक पूर्णविरामाचा फरक असलेला इ-मेलआयडी अनोळखी आरोपीने बनवून त्याद्वारे अब्दुल यांच्याशी संपर्क साधत दिलेल्या ऑर्डरचे पैसे नेहमीच्या बँक खात्या ऐवजी इतर विविध टीएन खात्यात पैसे जमा करण्यास सांगण्यात आले.

हेही वाचा : तळोजात बीअर शॉपीमध्ये मद्य विकणाऱ्यावर कारवाई

मेल आयडीतील फरक अब्दुल यांच्या लक्षात न आल्याने त्यांनीही शांघाई फार्मास्युटिकल कंपनीनेच सांगितले असे समजून विविध तीन बँक खात्यात १ लाख ८५ हजार ३९६ डॉलर पैसे भरले. ज्याचे भारतीय मूल्य १ कोटी ५४ लाख ५६ हजार ४४४ एवढे होते. पैसे भरूनही ऑर्डर न आल्याने अब्दुल यांना शंका आली व त्यांनी थेट कंपनीशी संपर्क केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तात्काळ या बाबत सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी त्या अनोळखी आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.