जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरवस्था

गावातील बहुतांशी विद्यार्थी खासगी किंवा इंग्रजी माध्यमांच्या शाळांतून शिक्षण घेत आहेत.

 

दुरुस्तीचे प्रस्ताव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे पडून, पटसंख्या घटली

उरणमधील जिल्हा परिषदेच्या आठ प्राथमिक शाळांची दुरवस्था झाली असून या शाळा सध्या विद्यार्थी संख्या घटत असल्याने ओस पडू लागल्या आहेत. शाळांच्या इमारतीं जीर्ण होऊ लागल्या आहेत. वर्गात पाणी शिरत असून छत गळू लागले आहे. या शाळांची दुरुस्ती करण्याचे प्रस्ताव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे करण्यात आले आहे, मात्र मागील वर्षभरापासून त्यांना मंजुरी मिळालेली नाही.जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी गावातील काही व्यक्तींनी जमिनी दान केल्या, सुविधा निर्माण केल्या, गावातील मुलांमध्ये शिक्षणाची गोडी लागावी म्हणून बक्षिसे जाहीर केली. मात्र त्याच शाळा आता मोडकळीस आल्या आहेत. तर अनेक शाळांत दहा ते चार इतकीच विद्यार्थी संख्या शिल्लक राहिली आहे. गावातील बहुतांशी विद्यार्थी खासगी किंवा इंग्रजी माध्यमांच्या शाळांतून शिक्षण घेत आहेत. त्यामुळे या शाळांकडे दुर्लक्ष केले जात आहे. उरण तालुक्यातील काही गावात तर प्राथमिक शाळेच्या सुसज्ज इमारती आहेत. या शाळेत गावातील एकही विद्यार्थी नाही. उरण पंचायत समितीच्या गट शिक्षण विभागाकडे करंजा कोंढरी, मोठी जुई, धाकटी जुई, जांभूळ पाडा, टाकीगाव, पुनाडे, पिरवाडी या गावांच्या शाळांच्या इमारतीच्या दुरुस्तीचे प्रस्ताव आलेले असल्याची माहिती उरण पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी प्रियांका पाटील यांनी दिली आहे. या प्रस्तावांना लवकरच मंजुरी मिळेल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

विद्यार्थ्यांचा ओढा खासगी शाळांकडे

गावातील बहुतांशी विद्यार्थी खासगी किंवा इंग्रजी माध्यमांच्या शाळांतून शिक्षण घेत आहेत. त्यामुळे  शाळांकडे दुर्लक्ष केले जात आहे.उरण तालुक्यातील काही गावात तर प्राथमिक शाळेच्या सुसज्ज इमारती आहेत. या शाळेत गावातील एकही विद्यार्थी नाही. उरण पंचायत समितीच्या गट शिक्षण विभागाकडे करंजा कोंढरी, मोठी जुई, धाकटी जुई, जांभूळ पाडा, टाकीगाव, पुनाडे, पिरवाडी या गावांच्या शाळांच्या इमारतीच्या दुरुस्तीचे प्रस्ताव आलेले असल्याची माहिती उरण पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी प्रियांका पाटील यांनी दिली आहे. या प्रस्तावांना लवकरच मंजुरी मिळेल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Zilla parishad schools bad condition in uran