News Flash

डॉ. आनंद दिनकर कर्वे

वनस्पतिशास्त्रामधील पदवीपर्यंतचे शिक्षण पुण्यामध्ये पूर्ण केल्यावर जर्मनीमध्ये पीएच.डी. प्राप्त केली.

विज्ञानामधील क्लिष्ट संशोधन साध्या-सोप्या कृतीमधून कमी खर्चात सर्वसामान्यांपर्यंत घेऊन जाणाऱ्या काही मोजक्या वैज्ञानिकांमध्ये डॉ. आनंद दिनकर कर्वे यांचे नाव अग्रक्रमाने येते. बांबूपासून हरितगृह निर्मिती. धूरविरहित चुली, शेतामधील पालापाचोळ्यापासून केलेला कांडी कोळसा आणि तो वापरण्यासाठी सराई कुकर, शेतकऱ्यांसाठी रोपवाटिका ही त्यांची काही बोलकी उदाहरणे आहेत. गोबर गॅसनिर्मितीसाठी शेणाचा वापर सुरुवातीस हवा. नंतर मात्र कर्बयुक्त टाकाऊ पदार्थच वापरावे असे सिद्ध करून त्यांनी गोबर गॅसची व्याख्याच बदलून टाकली.

महर्षी धोंडो कर्वे हे त्यांचे आजोबा. डॉ. आनंद कर्वे यांचा जन्म १९३८ साली पुणे येथे झाला. वडील प्रा. दिनकर कर्वे फग्र्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आई डॉ. इरावती कर्वे या पुरातत्त्वशास्त्राच्या संशोधक होत्या. डॉ. आनंद कर्वे यांनी

वनस्पतिशास्त्रामधील पदवीपर्यंतचे शिक्षण पुण्यामध्ये पूर्ण केल्यावर जर्मनीमध्ये पीएच.डी. प्राप्त केली. १९६१ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी पंजाब विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठात व्याख्याता आणि विभागप्रमुख म्हणून कार्य केले. त्यांनी आजपर्यंत ५० संशोधन प्रकल्प, शोधनिबंधांचे द्विशतक आणि २५० शास्त्रीय लेख लिहून शेतीमधील प्रगत तंत्रज्ञान तळागाळामधील गरीब शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले आहे. युनोसाठी परदेशामध्ये उच्च पदावर काम केलेल्या डॉ. कर्वे यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. यापकी प्रा. काणे, प्रा. टिळक यू.एस.डी.ए. या प्रतिष्ठित पुरस्कारांचा येथे उल्लेख हवाच. ते एफ.ए.ओ.चे मानद सदस्य होते. मराठी विज्ञान परिषदेच्या अखिल भारतीय ३८ व्या विज्ञान संमेलनाचे ते अध्यक्ष होते. विकसनशील देशांमधील गरीब जनतेसाठी प्रदूषणविरहित स्वच्छ आणि स्वस्त इंधननिर्मितीसाठी दिल्या जाणाऱ्या ‘अश्डेन’ या ब्रिटनमधील प्रतिष्ठित पुरस्काराचे ते दोन वेळा मानकरी ठरले. आज वयाच्या ऐंशीव्या वर्षांला स्पर्श करताना हे थोर वनस्पतिशास्त्रज्ञ शेतकऱ्यांसाठीच संशोधन हे ब्रीद त्यांच्या ‘आरती’ या संस्थेच्या माध्यमातून सातत्याने जपत आहेत. त्यांची सुकन्या डॉ. प्रियदर्शनी कर्वे यासुद्धा वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून पुनर्निर्मितिक्षम ऊर्जा विकसित करण्याच्या विविध प्रकल्पांवर आज फार मोलाचे कार्य करीत आहेत.

– डॉ. नागेश टेकाळे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org 

 

 

 

íकमिडीज

आíकमिडीज हे प्राचीन ग्रीक गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, अभियंता, खगोलशास्त्रज्ञ होते. इ.स.पूर्व २८७ मध्ये जन्मलेल्या आíकमिडीजचे शिक्षण आणि पुढचे संशोधन कार्य अलेक्झांड्रियातच झाले. त्या काळात अलेक्झांड्रिया हे ग्रीक साम्राज्यातील एक महत्त्वाचे सांस्कृतिक आणि व्यापारी केंद्र म्हणून विख्यात होते. जवळच्याच सिसिली बेटातील सेरॅक्यूजचा राजा आíकमिडीजचा जवळचा मित्र होता. राजाने सोनाराकडून बनवून घेतलेल्या सोन्याच्या मुकुटात काही भेसळ असल्याचा संशय आला म्हणून त्याने आपला बहुआयामी विद्वान मित्र आíकमिडीज याला याबाबत शहानिशा करण्यास सांगितले. त्यांनी केलेल्या चाचपणीतून कुठल्या धातूची किती टक्के भेसळ आहे हे उघडकीस आले. विशेष म्हणजे या घटनेतून आíकमिडीजना तरफेचा शोध लागला. तरफेच्या कार्यपद्धतीचा शोध लागल्यावर आíकमिडीज म्हणाले की, ‘‘योग्य टेकू मिळाल्यास मी पृथ्वीसुद्धा तरफेचा वापर करून उचलून दाखवीन.’’ त्यानंतर त्यांनी पाण्याचा उपसा करण्यासाठी ‘आíकमिडीज स्क्रू’ हे उपकरण विकसित केले. त्यांनी भूमितीतील घनफळ, पॅराबोला इत्यादी विषयांवर मूलभूत संशोधन केले. एखादा पदार्थ द्रवरूप किंवा वायुरूप पदार्थात तरंगत असताना त्याला खालून जो दाब पडतो तो त्या पदार्थाने बाजूला सारलेल्या द्रव किंवा वायूच्या वजनाएवढा असतो. हा सिद्धान्त आíकमिडीजने प्रस्थापित केला. ‘‘पदार्थाचे पाण्यात केलेले वजन हे त्याच्या हवेतील वजनापेक्षा त्याने बाजूला सारलेल्या पाण्याच्या वजनाइतके कमी असते’’ हा त्याचा सिद्धान्त ‘आíकमिडीजचा सिद्धान्त’ या नावाने प्रसिद्ध आहे. अंघोळ करीत असताना या सिद्धान्ताचा शोध त्यांना लागला आणि त्या वेळी आनंदातिशयाने त्यांनी काढलेले ‘युरेका! युरेका!’ हे उद्गार प्रसिद्ध आहेतच. त्यांनी वर्तुळाचे क्षेत्रफळ मोजण्याचे सूत्र तयार केले. त्यांनी केलेले संशोधन आणि तयार केलेली यंत्रे यांना प्राचीन काळात विशेष महत्त्व मिळाले नाही. परंतु त्यांच्या सर्व कृतींचे एकत्रीकरण आणि सुसूत्रीकरण इ.स. ५३० मध्ये होऊन त्यांना प्रसिद्धी मिळाली. आयुष्याच्या अखेरच्या दिवसात आíकमिडीज सिसिलीतल्या सेरॅक्यूज येथे राहावयास गेले असता रोमन सनिकांनी त्यांना इ.स. २१२ मध्ये ठार मारले.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 2:34 am

Web Title: anand dinkar karve
Next Stories
1 गवताळ प्रदेश
2 क्लिओपात्राच्या सुया!
3 अलेक्झांड्रियाची क्लिओपात्रा
Just Now!
X