‘नेचर डेफिसिट डीसॉर्डर’ हा वैद्यकीय अभ्यासात न बसणारा एक गंभीर आजार आहे. तो निसर्गाच्या सान्निध्याच्या अभावामुळे जडतो. रॉबर्ट लुव्ह या अभ्यासकाने ‘लास्ट चाइल्ड इन द वाइल्ड’ या पुस्तकात त्याबद्दल लिहिले आहे. ही एक प्रकारची मानसिक व्याधी आहे.

बदलत्या जीवनशैलीमुळे माणूस निसर्गापासून दूर होत चालला आहे. विशेषत: नवीन पिढीत निसर्गापासूनचे दुरावलेपण, तुटलेपण अधिक प्रकर्षांने दिसते. मुले आणि निसर्ग यांच्यातील अंतर वाढत चालले आहे. पर्यावरणीय मूल्यांना पायदळी तुडवून निसर्गाला भकास करणारा तथाकथित विकास, बेसुमार औद्योगिकीकरण व वाढते प्रदूषण, त्यातून निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय समस्या; यामुळे भावी पिढय़ांचे जीवन खडतर होणार आहे. आताच्या लहानग्यांत टीव्ही, मोबाइल, व्हिडीयो गेम्स आदींबद्दल विलक्षण आकर्षण दिसून येते. त्या तुलनेत त्यांच्यात असलेली निसर्गाबद्दलची उदासीनता आणि मदानी खेळांत रस नसण्यामुळे या ‘नेचर डेफिसिट डीसॉर्डर’ म्हणजेच ‘निसर्ग सान्निध्याच्या अभावामुळे जडणाऱ्या व्याधी’ फोफावत आहेत.

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
Amul dominates the Mumbai milk market
मुंबईच्या दूध बाजारपेठेवर ‘अमूल’चे वर्चस्व
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?

आजच्या मुलांच्या मनात निसर्गाविषयी प्रेम, जिज्ञासा, आकर्षण, कुतूहल निर्माण होईल, असे उपक्रम ना शालेय स्तरावर होताना दिसतात, ना कुटुंब वा समाजात त्याबद्दल काही पुढाकार घेतला जातो. मात्र मुलांच्या डिजिटल वाटचालीला पर्यावरणाच्या प्रेमाची जोड मिळाली, तर कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची क्षमता त्यांच्यात आपोआप निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ, इंग्रजीत ‘गॉट डर्ट’ नावाची एक संकल्पना आहे. बागेमध्ये मुलांसाठी त्यांची अशी खास सुरक्षित जागा असावी. तिथे मुले खेळतील. चिखलात माखतील, पडतील. नवनव्या युक्त्या शिकतील आणि विकसित होतील.

पालकांनी मुलांना भवतालची झाडे, वनस्पती, पशू-पक्षी यांचे महत्त्व पटवून द्यायला हवे. तहानलेल्या पक्ष्यांसाठी परिसरात पाण्याचे भांडे ठेवण्यास प्रवृत्त केले पाहिजे. मुलांना ‘जादूई वाडगा’ (वंडर बाऊल) देऊन त्यात छोटे दगड, पिसे, बिया, शंख-शिंपले आदी शोधून गोळा करण्याचा छंद जडवून द्यायला हवा. त्यांना भवतालच्या पर्यावरणातील घडामोडींचे वर्णन करायला शिकवायला हवे. त्यांना परिसरातील पक्षी, फुलपाखरे, झाडे यांचे निरीक्षण करू द्यात. समुद्रकिनारी वाळूत लुटुपुटूचे किल्ले बांधू द्यात. शक्य असल्यास परिसरात झाडे लावून त्यांची निगराणी करण्यास मुलांना प्रोत्साहन द्या. रात्री चमचमणाऱ्या काजव्यांचे गुपित त्यांना समजून द्या. सुटीच्या दिवसांत अभयारण्य, वृक्षवाटिका अशा नैसर्गिक ठिकाणी सहलीला न्या. मुलांच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोठा वाटा असतो आणि त्यांना निसर्गाकडे नेण्यास ते मोलाचा वाटा उचलू शकतात.

तरच आपली नवीन पिढी एकाकीपणा, नराश्य, ताणतणाव, निरुत्साह यांसारख्या लक्षणांनी घेरणाऱ्या  ‘नेचर डेफिसिट डीसॉर्डर’पासून मुक्त होईल!

– जोसेफ तुस्कानो मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org