संगणकीय क्षेत्रात द्विमान अंक पद्धती. म्हणजे २ अंक पाया धरून संख्या वापरल्या जातात. त्यामुळे त्यात ० व १ हे दोनच अंक वापरात येतात. दशमान पद्धतीतील संख्यांचे द्विमानमध्ये रूपांतर केल्यावर त्या संख्या (१ ही संख्या सोडून) अनेक बीट व्यापतात. परंतु द्विमान संख्या केवळ एकच बीट व्यापतात. दशमान पद्धतीत संख्येच्या मूल्यास महत्त्व असते. तर द्विमान क्षेत्रात केवळ दोनच अवस्था असतात. विधान सत्य (१) किंवा असत्य (०); सिग्नल असणे (१) वा नसणे (०), इत्यादी या द्विमान पद्धतीतील गणिताचे नियम म्हणजेच बुलीयन अल्जिब्रा (Boolean Algebra). या शाखेचे जनकत्व जॉर्ज बुल या इंग्लिश गणितज्ञाकडे जाते. सन १८४७ साली त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात हा विषय मांडला.

बुलीयन अल्जिब्रामध्ये मूलभूत तीन क्रियांचा वापर होतो. त्याशिवाय अन्य क्रियाही आहेतच. मूलभूत क्रियांची नावे व त्यांची चिन्हे OR (V), AND (A), NOT (-,) अशी आहेत. या क्रियांची थोडक्यात माहिती घेऊ.

Loksatta explained North Korea also has a destructive hypersonic missile
उत्तर कोरियाच्या हाती लवकरच विध्वंसक हायपरसॉनिक क्षेपणास्त्र… पण या छोट्या, मागास देशाकडे हे तंत्रज्ञान आले कसे?
Listed on Roots 2 Roots Social Stock Exchange in Arts Sector
कला क्षेत्रातील ‘रूट्स २ रूट्स’ सोशल स्टॉक एक्सचेंजवर सूचिबद्ध
economy of engineering sector marathi news
अर्थचक्राचे शिल्पकार – अभियांत्रिकी आणि भांडवली उद्योग क्षेत्र
Robert Dennard
चिप-चरित्र : ‘मेमरी चिप’ क्षेत्राची पायाभरणी

OR : वरील सारणीप्रमाणे अ = ० ब = ० असल्यास अ OR ब याचे उत्तर ० असेल.

तसेच अ = १ किंवा ब = १ असल्यास अ डफ ब याचे उत्तर १ असेल.

OR ची तुलना विद्युत रचनेतील समांतर मांडणीशी होऊ शकते.

AND : वरील सारणीप्रमाणे अ = ० किंवा ब = ० असल्यास अ AND ब याचे उत्तर ० असेल. तसेच अ = १ व ब = १ असल्यासच अ AND ब याचे उत्तर १ असेल.

परंतु, अ किंवा ब यांपैकी कोणत्याही एकाची किंमत शून्य असेल तरी अ AND ब याचे उत्तर ० असेल.

अठऊची तुलना विद्युत रचनेतील एकसर मांडणीशी होऊ शकते.

NOT: -, अ यात अ चे मूल्य ० असेल तर या क्रियेने ते १ होते आणि १ असेल तर ० होते.

डिजिटल सर्किट रचनेत व संगणकीय भाषेत या प्राथमिक क्रिया व अन्य क्रियांचा उपयोग केला जातो.

– श्रीनिवास म. मुजुमदार

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

डॉ. प्रतिभा राय – साहित्य आणि सन्मान

डॉ. प्रतिभा राय यांच्या ‘याज्ञसेनी’ या कादंबरीला १९९१मध्ये मूर्तीदेवी पुरस्कार मिळाला असून, तिचा मराठी अनुवाद ‘कृष्णा’ या नावाने राधा जोगळेकर यांनी केला आहे. याज्ञसेनी, पांचाली, कृष्णा- म्हणजेच द्रौपदी. पाच पांडवांची पत्नी. ही तेजस्वी नायिका, पाच पांडवांची पत्नी. प्रत्येक पतीभेटीच्या वेळी तिच्या मनाची काय अवस्था झाली असेल? महाभारतातील या द्रौपदीच्या व्यक्तिरेखेचा एक स्त्री, एक माणूस म्हणून आजच्या काळाच्या संदर्भात विचार करणारी, एका वेगळ्याच दृष्टिकोनातून पत्ररूपाने केलेली कादंबरीची रचना हे या कादंबरीचे वेगळेपण आहे. वस्त्रहरणासारख्या लज्जास्पद प्रसंगी धावून येणाऱ्या श्रीकृष्णाजवळ ती आपलं मन मोकळं करते. ‘मी एकाच्याच- अर्जुनाच्या गळ्यात स्वयंवरमाला घातली. त्याने ‘पण’ जिंकला म्हणून. मग अन्य भावांचा पतीरूपात मी का म्हणून स्वीकार करावा?’ शेवटी ती म्हणते, ‘जेव्हा हे दुरात्मे माझ्या वस्त्रास हात घालून ओढत होते तेव्हा मी सीतेप्रमाणे भूमिकन्या होऊ शकले असते. पृथ्वीनेही मला अव्हेरले नसते, पण मी असे केल्याने लज्जारक्षण झाले असते. पण दुष्टांना त्याचे शासन झाले नसते. भविष्यातील स्त्रियांच्या अशाच प्रकारच्या समस्यांचे निराकरण झाले नसते..’ .

डॉ. राय यांच्या ‘शिलापद्म’ या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कादंबरीचा मराठी अनुवाद ‘कोणार्क’ या नावाने पद्माकर जोशी यांनी केला आहे.  कोणार्कचा इतिहास, दंतकथा, लोककथा या सगळ्यातून त्यांच्या सखोल अभ्यासातून सातशे वर्षांपूर्वीचा काळ लेखिकेने जिवंत केला आहे.  या मंदिराच्या शिल्पकामासाठी बाराशे शिल्पकार अनेक वर्षे कुटुंबापासून दूर राहून इथे काम करीत होते. प्रमुख शिल्पकार कमल महाराणा, त्याची बालिकावधू चंद्रभागा, तिला सोसावा लागलेला विरह, तिचा त्याग, निष्ठा, समर्पण यांचा मागोवा अत्यंत संवेदनशीलतेने या कादंबरीत चित्रित केला आहे. एखाद्या वास्तूकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन लेखिका अधोरेखित करते.

साहित्य अकादमी पुरस्कार, सारळा पुरस्कार,  पुरस्कार, सप्तर्षी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार, मूर्तीदेवी पुरस्कार प्राप्त झाले असून, २०१७ मध्ये त्या ‘पद्मश्री’ ठरल्या. त्यांच्या अनेक कथा-कादंबऱ्यांचे हिंदी, मराठी, गुजराती, कन्नड, तामिळ, मल्याळम्, आसामी, पंजाबी, बंगाली अनुवाद झाले असून, ‘याज्ञसेनी’ चा हंगेरियन भाषेतही अनुवाद झाला आहे.

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com