नैसर्गिक तंतूमध्ये असलेला रेशीम हा प्राणिजन्य तंतू आहे. तुतीच्या पानावर पोसलेल्या किडय़ापासून मिळालेले रेशीम (तुती रेशीम) आणि वेगवेगळ्या जंगली झाडांच्या पानावर वाढवलेल्या किडय़ापासून मिळणारे रेशीम (जंगली रेशीम) असे दोन मुख्य प्रकार रेशमात आहेत. तुती रेशीम हे तलम असते तर जंगली रेशीम जाडेभरडे असते. तुती रेशमाबाबतीत किडय़ाचे फुलपाखरात रूपांतर होण्याआधी त्या कोशातून रेशीम मिळवतात. त्यामुळे सलग लांबी मिळते आणि तलम, मजबूत रेशमी धागा मिळतो. कोश फोडून पतंग बाहेर आल्यास त्या रेशमाचे तंतू तुटतात, तरी त्यापासून वेगळ्या पद्धतीने रेशीम धागा तयार करतात. पण मजबुतीच्या दृष्टीने तो डावा असतो. रेशीम धागा तयार करण्याची हीच पद्धत एरी रेशमासाठी वापरतात.
रेशमाची पाणी शोषून घेण्याची क्षमता चांगली असते. रेशमाच्या तंतूंना चमक असते. लोकरीपेक्षा कमी तापमानाला रेशमाची रंगाई करता येते. तसेच रेशमाची रंगाई आम्लधर्मी आणि आम्लारीधर्मी दोन्ही प्रकारच्या रंगांनी करता येते. रेशमाची रंग शोषून घेण्याची क्षमता चांगली असते. या सर्वामुळेच रेशमाला गडद आणि आकर्षक रंगात रंगवता येते.
रेशीम मुख्यत: फायब्रोईन आणि सेरिसिन या दोन प्रथिनांचे बनलेले असते. याखेरीज मेण, रंगद्रव्य, राख इ. इतर घटकांचा अंतर्भाव रेशमात अल्प प्रमाणात असतो. रेशमाच्या रासायनिक घटकांमुळे ते पाण्यात किंवा अल्कोहोल, बेन्झीन इ. द्रावकात विरघळत नाही. गरम अ‍ॅसेटिक आणि फॉर्मिक आम्लांच्या तसेच ऑक्झालिक, सायट्रिक आणि टार्टारिक इ. आम्लांचा रेशमावर सावकाश परिणाम होतो. रेशमाच्या या गुणधर्माचा विचार आपण रेशमी वस्त्रे धुताना करायला हवा.
जंगली रेशमाच्या टसर, मुगा व एरी या महत्त्वाच्या जाती आहेत. टसर रेशीम ओक वृक्षांच्या पानांवर वाढलेल्या किडय़ापासून मिळते. हे रेशीम बदामी, फिकट तपकिरी रंगाचे असते. ऐन व अर्जुन झाडांच्या पानावर वाढवलेल्या किडय़ापासून मिळालेले टसर रेशीम रुपेरी, पिवळसर, तपकिरी, हिरवट रंगाचे असते. टसर धाग्यात कॅल्शिअमयुक्त पदार्थ असल्याने उकळत्या सोडिअम काबरेनेटची प्रक्रिया करून तो काढून टाकावा लागतो. मुगा जातीचे रेशीम सोनेरी रंगाचे असल्याने त्याचा वापर जरीऐवजी करतात. एरी जातीचे रेशीम एरंडीच्या झाडाच्या पानावर पोसलेल्या किडय़ापासून मिळते.

मनमोराचा पिसारा: डॉक्टरांइतकेच रुग्णांसाठीचे बहुमोल पुस्तक
‘सायकॉलॉजी फॉर मेडिसीन’ हे पुस्तकाचं शीर्षकच फार महत्त्वाचं आहे. या पुस्तकाचा विषय मनोविकार हा नसून मानसशास्त्र आणि त्याचं वैद्यकीय शास्त्रामधील उपयोजन असा आहे. मानसशास्त्र म्हणजे मनाचा वैज्ञानिक अभ्यास, तर मनोविकारशास्त्र ही या विषयाची महत्त्वाची उपशाखा. साधारणत: सर्वसामान्यांचा फार तर मनोविकारतज्ज्ञाशी परिचय होतो. मनोविकारशास्त्राची रुग्णविषयक मानसशास्त्र ही पूरक शाखा आहे. यातील मानसशास्त्रज्ञ व्यक्तीच्या वा रुग्णाच्या मानसाचे- मुख्यत: विविध वृत्ती-प्रवृत्ती, स्थिती आणि मानसिकतांचे मापन करते. मनोविकारतज्ज्ञ वैद्यकीय शाखेचा अभ्यास करून पदव्युत्तर प्रशिक्षण घेतो आणि रुग्णनिदान हे प्रमुख काम करतो.. रुग्णांना मार्गदर्शन करतो.. बहुतेक वेळा रुग्णाला वैद्यकीय औषधोपचार आणि मानसोपचार सल्ला देणाऱ्या चमूचे नेतृत्व करतो.
मनोविकारतज्ज्ञ, मानशास्त्रज्ञ या परिपाठापलीकडेदेखील मानशास्त्र विलक्षण सामर्थ्यांने वैद्यकीयशास्त्रात ठामपणे संशोधन, निदान आणि सल्लामसलत करते. उदा. गुन्हाविषयक मानसशास्त्र गुन्हेगाराची मानसिकता तपासते.
‘ज्ञानग्रहणात्मक मानसशास्त्र’ मनोव्यापारातील विचार, प्रतिमा आणि ज्ञानप्राप्तीच्या पद्धतीमधील गुण-दोष यांचा विचार करते.
‘विकासात्मक मानसशास्त्र’ अर्भकापासून सुरू झालेली मानसिक, बौद्धिक, भावनिक वाढ-विकास प्रक्रियेचा अभ्यास आणि सल्ला यांचा विचार करते.
सर्वसाधारणपणे (तातडीची गरज नसणारे) लाखो रुग्ण डॉक्टरांचा सल्ला घेतात, वैद्यकीय उपचारासाठी भेट घेतात. त्यामधील ६०-७० टक्के रुग्ण प्रत्यक्षात मानसिक ताणतणाव आणि चिंता, उदासीनता यातून उद्भवलेल्या त्रासासाठी शारीरिक तक्रारी पुढे करून डॉक्टरांची अथवा आरोग्यपरिचारकांची भेट घेतात. पण अशा डॉक्टरांना मानसशास्त्र, मनोविकारशास्त्राची त्रोटक वा जुजबी माहिती असते.
यासाठी मानसरोगापलीकडे जाऊन रुग्णांच्या मानसिकतेचा अभ्यास करणे गरजेचे आहे. मानसिक पातळीवर गांजलेल्या रुग्णांची हाताळणी कशी करावी, याचं प्रशिक्षण देणं निकडीचं आहे. त्यासाठीच्या अनेक पुस्तकांपैकी सूझन आयर्स आणि रिचर्ड द विसर यांनी लिहिलेलं ‘सायकॉलॉजी फॉर मेडिसीन’ हे फार महत्त्वाचं आहे.
या पुस्तकाची मांडणी रटाळ नाही. कंटाळवाणा मजकूर, सूक्ष्म तपशील आणि किचकट भाषा अशा पठडीला झुगारून उद्बोधक आणि आकर्षकपणे हे पुस्तक लिहिलेलं आहे. प्रत्येक प्रकरणात सर्वसाधारण कोणती माहिती आहे याचा गोषवारा देऊन पुस्तकाची सुरुवात होते. काही मजकूर संशोधनावर आधारित शास्त्रशुद्ध माहिती देतो. केस स्टडीजद्वारे त्यातील प्रत्यक्षदर्शी प्रत्यय मिळतो. वाचकानं पुस्तकाशी समरस व्हावं आणि व्यवहारात त्याचा पडताळा घ्यावा या हेतूनं काही गृहपाठवजा अ‍ॅक्टिव्हिटी दिलेल्या आहेत.
अशा प्रकारच्या पुस्तकात सहसा रोग, व्याधी, विकलांगता यांचं विश्लेषण आणि उपचार यांची माहिती दिली जाते. परंतु या पुस्तकात मनोविकारांना मागे टाकून मनोविकासाकडे कशी वाटचाल करता येऊ शकते यावर विचार आणि महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. कर्करोग अथवा इतर रोग यांचा प्रादुर्भाव कसा होतो यावर विश्लेषणात्मक सांगोपांग भाष्य मनोविकारशास्त्रावरील पुस्तकात असतं. अशा दुर्धर अथवा असाध्य, गुंतागुंतीच्या अथवा किचकट विकारांची लागण झालेल्या व्यक्ती त्या व्याधीला कशा सामोऱ्या जातात आणि त्यात डॉक्टरांची सांत्वनात्मक, मनोबल वाढवणारी भूमिका कोणती आणि ती त्यांनी कशी पार पाडावी यावर उत्तम मार्गदर्शन केलं आहे.
आशावादी वृत्ती कशी मोजावी, जोपासावी आणि आरोग्यकर्मीनी त्यासाठी रुग्णाशी कसा संवाद साधावा यावर व्यावहारिक पातळीवरील नाटय़रूप मांडलेलं आहे. किंचित खुसखुशीतपणासाठी चुटके आणि व्यंगचित्रांची जागोजागी पखरण केली आहे. हे पुस्तक डॉक्टरांनी आवर्जून वाचावंच, पण त्याचबरोबर मानसशास्त्रात रस घेणाऱ्या लोकांनीही वाचावं, असं सुचवावंसं वाटतं.
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Skin care tips jaggery face pack helpful to glowing your skin
चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या? गुळाचा करा खास वापर; त्वचा दिसेल तरुण- चमकदार
coconut oil and aloe vera for beautiful and glowing skin Benefits
उन्हाळ्यात चेहरा कायम चिपचिपा, घामट दिसतो? खोबऱ्याचं तेल अन् कोरफडीचं मिश्रण वाढवेल सौंदर्य

प्रबोधन पर्व: विचारातून निघालेली अनुमाने सहन करण्यातल्या मर्यादा
‘‘सुखसाधनांपासून अलिप्त राहण्यात मनुष्याला पुण्य लागते आणि म्हणून सुखसेवनात पाप आहे, अशी तापसी नीतीतील मुख्य कल्पना आहे. ही कल्पना किती वेडगळ आहे हे ज्यांना बरोबर समजेल, त्यांचीच पूर्वग्रहांच्या कचाटीतून सुटका होईल आणि त्यांनाच स्वतंत्र विचार करणे शक्य होईल. परंतु या सुधारणेच्या युगातसुद्धा असे लोक अजून फारसे दिसत नाहीत. अधार्मिक, नास्तिक, बुद्धिप्रामाण्यवादी, समाजवादी म्हणवून घेणारे लोकदेखील या पूर्वग्रहांनी इतके ग्रासलेले दिसतात, की इतर कोणत्याही बाबतीत त्यांनी धर्माची पर्वा केली तरी कामविषयक बाबींत मात्र स्वतंत्र विचार करण्याची त्यांची तयारी नसते. या बाबतीत ते जुन्या समजुतींनाच चिकटून राहतात; पण लोकांना तसे वाटू नये म्हणून ते जुन्या समजुतींना पोषक अशा नव्या बाबी मात्र शोधून काढतात..’’
‘कामविषयक स्वातंत्र्याच्या मर्यादा’ (समाजस्वास्थ्य, जुलै १९४२) या लेखात          र. धों. कर्वे लिहितात – ‘‘वस्तुत: या समर्थनात विचारवंताला अर्थ सापडणार नाही. ते केवळ शाब्दिक समर्थन असते, आणि स्त्रीपुरुषसंबंध हे पाप आहे, ही एकच कल्पना या सर्व लपंडावाच्या मुळाशी असते. ही कल्पना ज्याने सोडून दिली, त्यालाच खरोखर या प्रश्नाचा समतोल बुद्धीने विचार करता येईल. अर्थात ज्याला समाजात प्रतिष्ठित रीतीने जीवन कंठायचे आहे, त्याला सामाजिक र्निबधांना थोडीबहुत भीक घालणे भाग पडते. परंतु अशांनीदेखील स्वतंत्र रीतीने विचार करायला काय हरकत आहे? त्यांना विचार करून इतके ठरवता येईल, की खरोखर शास्त्रीय दृष्टय़ा जरूर असे र्निबध कोणते, आणि समाजात केवळ अंध परंपरेने चालत आलेले र्निबध कोणते? म्हणजे तात्त्विक दृष्टय़ा बरोबर काय आहे, आणि केवळ समाजाकरता कोणत्या गोष्टी करायच्या, या बाबतीत ते आपली स्वत:ची तरी निदान फसवणूक करून घेणार नाहीत.. या बाबतीत शास्त्रीय विचार करायला बरेच धैर्य लागते, आणि ते धैर्य पुष्कळ बुद्धिप्रामाण्यवाद्यांनाही नसते.. ज्यांना शास्त्रीय विचारातून निघालेली अनुमाने सहन होत नाहीत, त्यांनी विचार करण्याचे भानगडीत न पडलेले बरे.’’