फळे आणि भाजीपाल्यापासून तयार केलेले प्रक्रियायुक्त पदार्थ जास्त काळ साठवून ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक पदार्थाना ‘परिरक्षक’ (प्रिझव्‍‌र्हेटिव्ह) म्हणतात. याचे दोन प्रकार असतात.
१) प्राथमिक (फर्स्ट क्लास) परिरक्षक हे नसíगक पदार्थ असतात. उदा. साखर, मीठ, तेल, व्हिनेगर.
२) दुय्यम (सेकन्ड क्लास) परिरक्षक हे रासायनिक पदार्थ असतात. उदा. सोडियम बेन्झोएट, सल्फर डायॉक्साईड. प्रक्रियायुक्त पदार्थाचे स्वरूप विशेषत: त्याची आम्लता आणि त्यातील सूक्ष्म जंतूंचे निराकरण यांवर पदार्थात किती सोडियम बेन्झोएट मिसळायचे हे ठरते. सर्वसाधारणपणे फळ रसांच्या स्क्व्ॉश अथवा सिरपमध्ये सोडियम बेन्झोएट हे परिरक्षक ६०० ते ७१० मिलिग्रॅम प्रतिकिलो पेय या प्रमाणात वापरले जाते. सल्फर डायॉक्साईड हा विद्राव्य स्वरूपात किंवा वायू स्वरूपात असतो. म्हणून सुमारे ५० टक्के सल्फर डायॉक्साईड असलेला पोटॅशियम मेटाबायसल्फाईट (केएमएस) हा रासायनिक पदार्थ परिरक्षक म्हणून वापरला जातो. सल्फर डायॉक्साईडच्या वापरामुळे फळरसातील ऑक्सिडीकरणाची क्रिया थांबते. त्यामुळे फळांच्या रसाचा रंग आणि स्वाद चांगल्या प्रकारे टिकून राहण्यास मदत होते. फालसा, जांभूळ, स्ट्रॉबेरी, कोकम इत्यादी फळांच्या रसातील रंगद्रव्य सल्फर डायॉक्साईडमुळे रंगहीन होते. त्यामुळे या फळांच्या रसात सल्फर डायॉक्साईड हे परिरक्षक वापरू नये. फळांचा रस अथवा गर टिनच्या डब्यात टिकवून ठेवायचा असल्यास त्यात परिरक्षक म्हणून सल्फर डायॉक्साईड वापरू नये. कारण या परिरक्षकाची क्रिया टिनवर आणि आतील लोहावर होऊन हायड्रोजन सल्फाईड नावाचा वायू तयार होतो. तो लोहाशी संयोग पावून काळ्या रंगाचा पदार्थ तयार होतो. काचेच्या बाटल्यांमध्ये रस साठवल्यास हे परिरक्षक वापरावे.
याशिवाय सध्या वापरण्यात येणारा तिसरा परिरक्षकाचा प्रकार म्हणजे ‘बायोप्रिझव्‍‌र्हेटिव्ह’ होय. यालाच अँटिमायक्रोबिअल्स असेही म्हणतात. काही बुरशी किंवा जीवाणूंपासून मिळवलेले घटक प्रक्रियायुक्त पदार्थ जास्त काळ साठवण्यासाठी वापरले जातात. उदा. नायसिन, टायलोसिन, सबटॅलिन, पिमॅरिशिन इत्यादी. फळे आणि भाजीपाल्यांच्या प्रक्रियायुक्त पदार्थामध्ये यांच्या वापराविषयी संशोधन सुरू आहे.-डॉ. विष्णू गरंडे (कोल्हापूर) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

जे देखे रवी..  – वैष्णव
भारतात जगातले तीन महत्त्वाचे धर्म निर्माण झाले आणि इथे जे निर्माण झाले नाहीत ते धर्मही इथे वास्तव्याला आहेत. आपली राज्य घटना २ीू४’ं१ आहे म्हणजे धर्मनिरपेक्ष. धर्माच्या नावाने पक्षपात असू नये असे उद्दिष्ट आहे. हा उदारमतवाद आपल्याला कोठून मिळाला या प्रश्नाचे उत्तर इथेच दडलेले असणार. कारण जगातल्या अनेक देशांत धर्म हा त्याच्या राज्यघटनेचा एक मूलभूत पाया तरी आहे किंवा त्यांची घटना धर्माने वेढलेली आहे. अमेरिकेत देवावर विश्वास ही गोष्ट त्यांच्या राज्यघटनेतच अंगीकृत केली गेली आहे. इंग्लंडमध्ये आतापर्यंत ख्रिश्चन धर्माचा किंवा देवदेवतांचा अपमानच केवळ दंडाकृत कारवाईसाठी लायक होता. इतर देवादिकांच्या अपमानाविरुद्ध खटला चालवण्यासाठी कायदेच अस्तित्वात नव्हते.
या सगळ्या गोष्टींचा आणि वैष्णव या शब्दाचा संबंध काय असा जर प्रश्न वाचकांना पडला असेल तर भारताचे वैष्णवीकरण हे आपल्या देशाच्या इतिहासातले एक फार महत्त्वाचे आणि प्रदीर्घ प्रकरण आहे हे ध्यानात घेतलेले बरे. अनेक धर्म अस्तित्त्वात असूनही भारताची ओळख जर कोठल्या एका पुस्तकाने करून घ्यायची झाली तर गीतेचे पुस्तक हे त्या ओळखीचे महत्त्वाचे साधन आहे. गीता विष्णूच्या अवताराने सांगितली आहे, अशी एक प्रस्थापित समजूत आहे. त्यातले तथ्य महत्त्वाचे नाही. ज्ञानेश्वरीची प्रस्तावना जर बघितली (पहिल्या अध्यायाच्या आधीचे मंगलचरण) तर त्यात श्रीकृष्णाचे नाव नाही. गुरू आहे, गणपती आहे, व्यास आहेत आणि सरस्वती आहे आणि शेवटी श्रीरंगाचा उल्लेख आहे. श्रीरंग हा शब्द श्रीकृष्णासाठी वापरात असला तरी ते मूळ नाव विष्णूचे आहे.
ज्ञानेश्वरीत आणखी एक गमतीदार ओवी आहे. त्यात शंकर पार्वतीला म्हणतो की तुला दरवेळा बघितले की तू निराळी आणि नवी दिसतेस तशीच ही गीता दरवेळेला मला काहीतरी नवे सांगते. नव्या तऱ्हेने दिसते. शंकर या देवाने गीतेला म्हणजे विष्णूने किंवा त्याच्या अवताराने सांगितलेल्या या ग्रंथाला दिलेले हे प्रमाणपत्र महत्त्वाचे. एका अर्थाने शैव (शंकराधिष्ठ) संप्रदायाने गीतेचे महत्त्व मान्य करणे आणि दुसरे तेवढेच महत्त्वाचे  ज्ञानेश्वरांनी अशा तऱ्हेने ते उद्धृत करणे. या दोन्ही गोष्टी लक्षणीयच.
ज्ञानेश्वर तर नाथसंप्रदायातले. तो काश्मिरी शैव संप्रदाय. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, निवृत्तिनाथ वगैरे हे त्यांची गुरूपरंपरा. परंतु ज्ञानेश्वरीतच ह्या परंपरेत हे ज्ञान शंकराने शक्तीला दिले (पार्वतीला). ते मत्स्येंद्राला मिळाले. त्याच्या पोटात विष्णू होता असे भाषांतर दांडेकर प्रतीत सापडते आणि शेवटी निवृत्तीनाथांनी आज्ञा केल्यावर त्रासलेल्या जीवांना वाचवण्यासाठी गीतार्थ सांगण्यास मी प्रवृत्त झालो असे ज्ञानेश्वर म्हणाले आहेत. शैवांबद्दल उद्या.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स
How Suryanamaskar and pranayama can help you fight spring allergies
तुम्हालाही वारंवार शिंका येतात का? रोज करा ‘हे’ दोन प्रभावी प्राणायाम अन् व्हा अ‍ॅलर्जी फ्री

वॉर अँड पीस- हिवाळा येतोय; वजन सांभाळा
डिसेंबर महिना. ऐन हिवाळ्याचे दिवस, भारतीय कालगणनेप्रमाणे हेमंत ऋतू. ‘हेमंते प्रबलोऽ नल:। या काळात कितीही खावे, ते अंगी लागतेच. ‘तरुण वयात आम्ही नाही भरपूर खायचे तर कोणी खायचे’ अशी प्रश्नार्थक मुद्रा करून तरुणाई खातपित असते. दुसरीकडे झीरो फिगरची तरुणाईवर, प्रामुख्याने युवतींवर मोठी मोहिनी असते. त्यांच्या आवडत्या अभिनेत्री झीरो फिगर मेन्टेन करण्यासाठी काय करायचे सोडत नाहीत, याचीच मोठी चर्चा होते. कॉलेजच्या कट्टय़ावर या चर्चेला रंगत येते. फिगरमुळे चर्चेला नवी फोडणी व खाद्य मिळते. तर फिगर मेन्टेन करण्यासाठी सारेच झटून प्रयत्न करत असतात. त्याचे कमी-अधिक अपेक्षित परिणाम दिसून येतातही. म्हणजे तुमचे वजन लक्षणीय कमी होते. तुम्ही अधिक स्मार्ट दिसू लागता. रुबाबदार आणि आकर्षक लुकमुळे तुमच्यात नवा आत्मविश्वास तयार होतो. तुमच्या हालचाली वेगवान होतात, कामातला उत्साह वाढतो. आहारावर नियंत्रणे घालून घेतल्याने खाण्या-पिण्याविषयी तुम्ही पूर्वीच्या तुलनेत कमालीचे सजग होता.
आपण ‘चवळीची शेंग’ झाले आहोत हे समाधान अल्प काळच टिकते. वजन कमी करण्याचे पूर्वीचे नेटाने केलेल्या प्रयत्नांमध्ये सातत्य रहात नाही. पुन्हा कळत नकळत वजन वाढते. तुम्ही थोराड दिसू लागता व एक प्रकारचे नैराश्य येते. याला काही शास्त्रीय कारणे आहेत.  
मस्त समाधानाने तृप्त जेवण झाल्यावर पोटातील एका विशेष पेशीकडून मेंदूकडे सकारात्मक संदेश जातो. मध्यंतरी आहार नियंत्रण सुरू केल्यावर ही यंत्रणा थोडी विस्कळीत होते. काही काळ वजन कमी झाल्यानंतर पुन्हा पूर्ववत सातत्याने पथ्य पाळणे होत नाही व त्यामुळे धास्ती वाढते, नैराश्य येते.
फाजील फॅट कमी करण्याकरिता खूप औषधे घेण्यापेक्षा पुदिना, आलेलसूण अशी चटणी, आलेलिंबाचा पाचकरस, काळ्या मनुका यांची अग्रक्रमाने मदत घ्यावी. आमलक्यादि चूर्ण जेवणाअगोदर, जेवणानंतर पिप्पलादिकाढा, पंचकोलासव पचनाकरिता निवडावे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत  – १२ डिसेंबर
१८९३ > जागतिक कीर्तीचे भारतीय समाजशास्त्रज्ञ डॉ. गोविंद सदाशिव घुर्ये यांचा जन्म. भारतीय समाजशास्त्रीय अभ्यासाचे आद्य प्रवर्तक या बिरुदावलीने सन्मानित. या विषयावर २३ ग्रंथ व शेकडो लेख प्रसिद्ध.
१९०२ > संपादक (‘अरविंद’ मासिक) आणि मुंबई आणि मराठी साहित्य संघाचे संस्थापक अमृत नारायण भालेराव यांचा जन्म.१९५५ साली ते निवर्तले.
१९०४ > ख्यातनाम समीक्षक खंडेराव त्र्यंबक सुळे यांचा जन्म. ‘शेष’ या नावाने ललित तर ‘स्कंद’ नावाने राजकीय स्वरूपाचे लेखन. १९७८ साली निवर्तल्यावर ‘शेषसमीक्षा’ (१९७९) हा लेखसंग्रह प्रसिद्ध झाला. मायकोवस्की, ख्रिस्टोफर कॉडवेल, बोरिस पास्तरनाक यांच्याविषयीचे त्यांचे लेख विशेष उल्लेखनीय ठरले.
१९९२ >‘संस्कृतिकोश’कार तसेच धर्म, संस्कृती आणि समाजविषयक अनेक पुस्तकांचे लेखक पं. महादेवशास्त्री जोशी यांचे निधन.
२००२ > आधुनिक तत्त्वज्ञानाचे व्यासंगी, ‘नवी क्षितिजे’ या वैचारिक नियतकालिकाचे संपादक विश्वास रघुनाथ पाटील यांचे निधन.
२००५ > साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक, कवी, कादंबरीकार, समीक्षक त्र्यंबक विनायक सरदेशमुख यांचे निधन.
– संजय वझरेकर