बडोद्याचा राजा मल्हारराव यांस पदच्युत करून, गादीला वारस हवा म्हणून ब्रिटिश व्हाइसरॉयने जमनाबाईला तिने दत्तकपुत्र घेण्यास परवानगी दिली. त्याप्रमाणे दिवाण माधवराव आणि जमनाबाईने गायकवाडांच्या जवळच्या नात्यातील मुलांचा शोध घेणे सुरू केले. नाशिक जिल्ह्यातील मालेगावजवळच्या कवळाणे या खेडय़ातील शेतकरी उखाजी व काशीराव हे बंधू गायकवाडांचे जवळचे नातेवाईक होते. त्यांची मुले दादासाहेब, गोपाळ आणि संपत यांची नावे दिवाणांनी ब्रिटिश रेसिडेंटला कळविली. रेसिडेंटने नाशिकचे तत्कालीन कलेक्टर इलियट यांच्यामार्फत या तीन मुलांचे गायकवाड राजघराण्याशी नातेसंबंध, मुलांवर त्यांच्या पालकांनी केलेले संस्कार इत्यादींची खातरजमा करून मुले आणि त्यांचे वडील यांना बडोद्यास बोलावून घेतले. रेसिडेंट, टी. माधवराव तसेच जमनाबाई यांनी या तिघा मुलांमधून उपजत बुद्धिमत्ता, करारीपणा या निकषांवर काशीरावचा १२ वर्षांचा मुलगा गोपाळ याची निवड करून १८७५ साली जमनाबाईंनी गोपाळला विधिपूर्वक दत्तक घेतले. बारा वर्षांचा गोपाळ आतापर्यंत खेडय़ात आपल्या कुटुंबाची गुरे राखण्याचे काम करीत होता, अशिक्षित होता. तो १८ वर्षांचा होईपर्यंत दिवाण माधवराव व रेसिडेंटने तज्ज्ञ शिक्षक नेमून त्याच्या शिक्षणावर आणि राज्यकर्त्यांने उच्च वर्गात वावरण्याच्या रितिभाती त्याने आत्मसात करण्यावर भर दिला. १८८१ साली गोपाळच्या वयाची १८ वष्रे पूर्ण झाली आणि ब्रिटिश सरकारने त्याला राज्याधिकार दिले. जमनाबाईच्या सूचनेवरून त्याचे नामकरण सयाजीराव (तृतीय) असे करण्यात आले.
महाराजा सयाजीराव गायकवाड राजेपदावर आले त्या वेळी राज्यकारभारात अनागोंदी माजलेली होती. दक्षिणेला साल्हेरपासून उत्तरेस द्वारकेपर्यंत संस्थानाचे राज्यक्षेत्र पसरलेले होते. नोकरशाहांच्या मनमानीमुळे, भ्रष्टाचारामुळे राज्याचा पूर्ण महसूल खजिन्यात जमा होत नसे. सयाजीरावांनी आपल्या चोख प्रशासनाने, प्रजाहितदक्ष कारभाराने आपल्या कारकीर्दीत बडोदा हे एक वैभवसंपन्न संस्थान बनवून ठेवले.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

कुतूहल – पिंजण विभागातील यंत्रे – २
गाठ उकलक (बेल ओपनर) : गाठ उकलक हे िपजण विभागातील सर्वात प्रथम येणारे यंत्र आहे. या यंत्राचे मुख्य कार्य हे गाठी खोलून त्यातील कापूस िपजण विभागातील पुढील यंत्रांना पाठवणे हे असते. ही यंत्रे दोन प्रकारची असतात. मानवचलित गाठ उकलक आणि स्वयंचलित गाठ उकलक
मानवचलित गाठ उकलक : पिंजण विभागाच्या विकासाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून िपजण विभागातील पहिले यंत्र म्हणून गाठ उकलक या यंत्राचा वापर होत आला आहे. या यंत्राची रचना खाली दिल्याप्रमाणे असते.
या यंत्रामध्ये सुरुवातीला एक आडवी व जमिनीला समांतर अशी भरवणी साटी (फिडिंग लॅटिस) असते. ही साटी सलग पट्टय़ाप्रमाणे असून ती लाकडीपट्टय़ा एकमेकांस जोडून बनवली जाते. या भरवणी साटीच्या सभोवार कापसाच्या गाठी ठेवल्या जातात. कामगार या गाठीतील कापसाचे गठ्ठे भरवणी साटीवर टाकतो. भरवणी साटीच्या फिरण्यामुळे कापसाचे हे गठ्ठे यंत्रामध्ये पुढे नेले जातात. भरवणी साटीच्या पुढे एक तिरकी साटी जमिनीला १२० अंशाचा कोन करून बसविलेली असते. या साटीच्या लाकडी पट्टय़ांवर खिळे बसविलेले असतात. तिरपी साटी फिरू लागल्यावर हे खिळे भरवणी साटीने पुढे आणलेल्या कापसाच्या गट्टय़ातून खुपसले जातात व त्यामुळे कापसाचे मोठे गठ्ठे फुटून त्यांचे लहान गठ्ठे बनतात व अशा रीतीने कापूस सुटा करण्याच्या क्रियेस सुरुवात होते. हे लहान गठ्ठे तिरप्या साटीच्या खिळ्यांकडून उचलून वर नेले जातात. तिरप्या साटीच्या पुढील बाजूस एक आघातक रूळ (बीटर) बसविलेला असतो. तिरप्या साटीच्या खिळ्यांनी उचलून आणलेल्या कापसाच्या गठ्ठय़ांवर हा आघातक रूळ फिरताना प्रहार करतो आणि या प्रहारामुळे कापसाचे गठ्ठे आणखी थोडे सल आणि लहान होतात. कापसाचे गठ्ठे सल होत असताना त्यामध्ये अडकलेला कचरा काही प्रमाणात सुटा होतो आणि खाली पडतो. या कचऱ्याला खाली पडता यावे म्हणून आघातकाच्या खालच्या बाजूस एक दांडय़ाची जाळी बसविलेली असते. त्यामधून कचरा बाहेर पडतो आणि खाली ठेवलेल्या कचरापेटीत साठविला जातो. आघातक रुळानंतर कापूस पुढच्या यंत्राकडे पाठविला जातो.
चं. द. काणे  (इचलकरंजी)  मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

MP Dhananjay Mahadik, Leads Campaign for Mahayuti, Sanjay Mandlik, Kolhapur lok sabha seat, Rajarampuri peth, Shahupuri peth, people united to campaign,
संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ पदफेरीत राजारामपूरी, शाहूपूरी व्यापारी पेठ एकवटली
Sambhaji Raje Chhatrapati, criticises bjp, 400 seats change constitution, Sambhaji Raje Chhatrapati criticises bjp, shahu maharaj, kolhapur lok sabha seat
संविधान मोडून काढण्यासाठी ‘चार सो पार’ची धडपड – संभाजीराजे छत्रपती
virendra mandlik criticizes shahu chhatrapati s family
छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केले नाही; मंडलिक घराण्याची पुन्हा एकदा टीका
NCP ajit pawar Dissident A.Y. Patil Extends Support to Maha vikas Aghadi Backs Shahu Maharaj
कोल्हापूर : अजितदादांना धक्का; प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांचा शाहू महाराजांना पाठिंबा