कारणमीमांसा करता येणे हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा दुसरा मूलभूत घटक आहे. आपली नैसर्गिक बुद्धी दोन किंवा अनेक गोष्टीमधील संबंध समजून घेते, तसेच कुठल्या कारणांमुळे कुठले प्रभाव मिळाले आहेत किंवा मिळू शकतात, याचा अंदाज सहसा अचूकपणे लावते. त्यामागचे तर्कशास्त्र आपल्यात इतके भिनले आहे, की फारसा प्रयत्न न करता आपण सहजपणे कारण समजून योग्य ती कृती वेळेत करू शकतो. त्याशिवाय आपण प्रयोग करून कारणमीमांसेला बळकटी देणारे पुरावे गोळा करू शकतो. उदाहरणार्थ, प्रयोगशाळेत केले जाणारे प्रयोग शास्त्रीय सिद्धांत आणि त्यांची तपासणी करून आपल्याला आत्मविश्वास देतात.

कृत्रिम बुद्धिमत्तेला मात्र याबाबतीत आपण दिलेल्या आज्ञावलींवर अवलंबून राहावे लागते. केवळ त्यांचा आधार घेऊन ती दिलेल्या परिस्थितीत निष्कर्ष काढण्यास बाध्य असते. ते निष्कर्ष दोन तार्किक पद्धतींचे असतात. निगमन (डीडक्टिव) हा त्याचा एक प्रकार तर, विगमन (इंडक्टिव) हा दुसरा प्रकार.

Aditi Tatkare
मविआतील बंडखोरी आदिती तटकरेंच्या पथ्यावर ?
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Gujarat man, presumed dead, walks into his own memorial service shocking news goes viral
बापरे! कुटुंबाने अंत्यसंस्कार उरकले अन् पुढच्याच क्षणी शोकसभेत मुलगा जिवंत डोळ्यासमोर उभा; नेमकं काय घडलं?
Aai Kuthe Kay Karte
अरुंधतीचं पूर्ण नाव काय? प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पत्नीने दिलं एकदम करेक्ट उत्तर, पाहा व्हिडीओ
Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
Maharashtra Elections Assembly Elections 2024 Election Commission
महाराष्ट्र वाहून जाणार की आपली वेगळी वाट आखणार?
Viral Video Shows little girls playing Bhatukali
‘खरंच खूप भारी होते ते दिवस…’ भांडीकुंडी आणली, पानांची बनवली पोळी-भाजी अन्… VIRAL VIDEO पाहून आठवेल बालपण

हेही वाचा >>> कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे पायाभूत घटक : शिकणे ते समस्या सोडवणे

प्रतल भूमितीची युक्लिड यांनी केलेली रचना निगमन पद्धतीचे उत्तम उदाहरण आहे. त्यात काही व्याख्या आणि गृहीतके यांच्या आधारे प्रमेये सिद्ध करून निष्कर्ष काढले जातात. ते जर उपलब्ध निष्कर्षांना छेद देणारे नसले तर मान्य केले जातात, अन्यथा गृहीतके बदलून पुढे जाणे असा मार्ग असतो. कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी ही पद्धत आत्मसात करणे तुलनेत सोपे आहे. नवल नाही की कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित भूमितीशिवाय इतर गणित शाखांमधील विविध प्रमेयांची सिद्धत्ता देणाऱ्या, मांडणाऱ्या आणि तपासणाऱ्या अनेक ‘सिद्धता साहाय्यक’ (प्रूफ असिस्टंट) प्रणाली सध्या कार्यरत आहेत. उदाहरणार्थ पीव्हीएस, मायझर आणि थेरोमा.

हेही वाचा >>> कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रणेते

विगमन पद्धतीत एका विषयावर प्राप्त निष्कर्षांना व्यापक करणे आणि अनुभवावरून ते समृद्ध करणे अशा आज्ञावली कार्यरत असतात. बुद्धिबळ आणि तत्सम आव्हानात्मक वैचारिक खेळांत प्रावीण्य मिळवणे यंत्राला अशा रीतीने प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे ‘लेखन साहाय्यक’ (रायटिंग असिस्टंट) प्रणाली (उदा. ग्रामर्ली) आपल्याला संगणकावर मजकूर टंकलिखित करताना शुद्धलेखन, वाक्यरचना सुधारणे आणि पर्यायी शब्द सुचवणे अशी मदत करतात. त्यांचे ‘चॅट जीपीटी’ हे प्रगत रूप तर दिलेल्या विषयावर पाहिजे त्या लांबीचा लेख नवनव्या शैलीत तयार करून देते.

कारणमीमांसा हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा पायाभूत घटक जोमाने विकसित झाला असून आपल्या बुद्धीला मागे टाकू शकेल या स्थितीत आला आहे.

– डॉ. विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org