वर्नर स्टिफन विंजी यांच्या मते पुढील ३० ते ५० वर्षांत कृत्रिम बुद्धिमतेची खूप प्रगती होईल आणि यंत्राची बुद्धिमत्ता माणसापेक्षा खूप जास्त होईल (सुपर ह्युमन इंटेलिजन्स). कृत्रिम बुद्धिमत्ता जी स्वत:ची अतिवेगवान प्रगती करेल त्या स्थितीला विंजी यांनी ‘तांत्रिक एकलता’ (टेक्नॉलॉजिकल सिंग्युलॅरिटी) असे संबोधले आहे. विंजी हे तांत्रिक एकलता संकल्पना व्यापक प्रमाणात लोकप्रिय करणारे पहिले अमेरिकन विज्ञानकथा लेखक आहेत. तसेच काल्पनिक ‘सायबरस्पेस’ ही संकल्पना सादर करणारेही ते पहिलेच लेखक आहेत. सायबरस्पेस हे एकमेकांशी जोडलेले डिजिटल वातावरण आहे. इंटरनेटच्या उदयामुळे लोकप्रिय झालेले हे एक प्रकारचे आभासी जग आहे.

विंजी यांचा जन्म २ ऑक्टोबर १९४४ रोजी अमेरिकेमधील वौकेशा या शहरात झाला. त्यांनी सन १९७१ मध्ये सॅन दिएगो येथील कॅलिफोर्निया विद्यापीठामधून, गणितात पीएच.डी. पदवी प्राप्त केली. ब्रिटिश मासिकाच्या ‘न्यू वल्र्ड्स’च्या जून १९६५ च्या अंकात विंजी यांनी त्यांची पहिली लघुकथा ‘अपार्टनेस’ प्रकाशित केली. त्यांची दुसरी कथा, ‘बुकवर्म, रन!’, जॉन डब्ल्यू. कॅम्पबेल यांनी संपादित केलेल्या अ‍ॅनालॉग सायन्स फिक्शनच्या मार्च १९६६ च्या अंकात प्रकाशित झाली होती. या कथेत त्यांनी मेंदूला थेट संगणकीकृत डेटा स्रोतांशी जोडून कृत्रिमरीत्या वाढवलेल्या बुद्धिमत्तेची संकल्पना मांडली आहे. विंजी १९८१ मध्ये त्यांच्या ‘ट्रू नेम्स’ या कादंबरीमुळे प्रसिद्धीस आले. सायबरस्पेसची संकल्पना मांडणारी ही पहिली कादंबरी होती.

Radio images of the Sun obtained by scientists pune news
शास्त्रज्ञांनी मिळवली सूर्याच्या रेडिओ प्रतिमा
Loksatta kutuhal Artificial intelligence Technology The Turing Test Mirror test
कुतूहल: स्वजाणिवेच्या पात्रता कसोट्या
Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
peter higgs death marathi news, peter higgs god particle marathi news
‘देव कणा’चा सिद्धान्त मांडणारा शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड… पीटर हिग्ज यांच्या ‘हिग्ज बोसॉन’ संशोधनाचे मोल काय?

विंजी यांनी सन १९९३ मध्ये ‘द किमग टेक्नॉलॉजिकल सिंग्युलॅरिटी’ या शोधनिबंधामध्ये भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण होणाऱ्या विविध शक्यतांवर सर्वप्रथम भाष्य केले, त्यामुळे त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली व तांत्रिक एकलता या विषयातील संशोधनाला नवीन चालना मिळाली. त्यांच्या मते, भविष्यात, शास्त्रज्ञ आणि संशोधक मानवी बुद्धी वाढवण्यासाठी, बायोइंजिनीयिरगद्वारे मानवांमध्ये तंत्रज्ञानाचे रोपण करण्यासाठी अंतर्गत प्रयत्न करू शकतात. परंतु यामुळे मनुष्य आपली बुद्धी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या हवाली करू शकेल आणि स्वत:चा विनाश ओढवून घेऊ शकेल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

विंजी यांना १९९२ मधील ‘अ फायर अपॉन द डीप’ या कादंबरीसाठी ह्यूगो पुरस्कार मिळाला. या विज्ञान कादंबरीमध्ये त्यांनी तांत्रिक एकलता स्थितीमधील मानवाची परकीय शक्तीतर्फे नियंत्रण मिळवण्याची व त्याविरुद्धच्या संघर्षांची थरारक कथा मांडली आहे. विंजी हे सध्या निवृत्त प्राध्यापक आहेत.

गौरी देशपांडे , मराठी विज्ञान परिषद