िपपळीची सुकलेली काळी फळे लेंडय़ांप्रमाणे दिसतात म्हणूनच तिला लेंडी िपपळी म्हणतात. या झाडाचे शास्त्रीय नाव पायपर लॉग्म    Piper longam

‘पायपरेसी’ कुलातील हे बहुवर्षांयू सुगंधी फुलझाड लहान आणि नाजूक असते. मुळे लाकडासारखी असतात आणि फांद्या सरळ असतात. पाने साधी एकाआड एक असतात. वरची पाने लांबट अंडाकृती, बिनदेठाची आणि खोडास वेढणारी तर खालची पाने देठ असलेली, टोकदार आणि हृदयाकृती असतात. कणसाच्या स्वरूपात फुलोरे असून त्यात एकिलगी फुले असतात. पुं-कणिसे बारीक पण लांब असून स्त्री-कणिसे नाजूक आखूड असतात. फळे मृदू, लहान, मांसल फुलोऱ्याच्या अक्षात रुतलेली असतात. फळे पिकल्यावर प्रथम पिवळट नािरगी नंतर हिरवट होतात. ही वनस्पती भारतात तामिळनाडू, आसाम, बंगाल, कोकण इत्यादी ठिकाणी आढळून येते. तसेच श्रीलंका,  फिलिपाइन्स येथेही आढळते. झाडाचे सर्वच भाग मूळ, खोड, पान, फूल औषधी असतात. िपपळीमध्ये पिपारिन, पिपलार्टी, रेझिन, बाष्पनशील तेल असे औषधी घटक असतात. ‘पिप्पलासव सीतोपलादी’ यांसारखी औषधे िपपळीपासून बनवतात. िपपळीची फळे मिऱ्यासारखी तिखट असतात. खाल्ल्यावर तोंडाला पाणी सुटते. तोंड बधिर होते, िपपळीची फळे हृदयाला चालना देणारी सारक, जंतुनाशक, पाचक असतात. िपपळी वातहारक असून पचन व शोषणकार्यातील दोष दूर करते. लहान मुलांच्या बाळगुटीत िपपळीचा वापर करतात. िपपळीच्या उत्तेजक गुणधर्मामुळे कफ सुटतो, नवीन कफ निर्माण होत नाही, खोकला, दम लागणे, ताप येणे ह्य़ातही िपपळी उपयोगी आहे. िपपळीने यकृत आणि प्लीहा उत्तेजित होऊन त्यातून पाचकस्राव स्रवण्यास मदत होते. अपचन, अग्निमांद्य, पोट दुखणे, पोटात वायू निर्माण होणे, सर्दी, पडसे, खोकला, यावर िपपळी उपयुक्त असून छातीवर लेप लावल्यास वेदना कमी होतात. कच्च्या फळांचा आणि मुळांचा काढा दीर्घकालीन खोकला व ब्राँकायटिसवर तर चूर्ण पोटाच्या पचनाच्या विकारावर वापरतात. संधिवातावर िपपळी प्रतिदाहक व प्रतिशोधक असल्याने वापरतात. सांध्यावर लेप लावल्यास सूज आणि वेदना कमी होतात. िपपळी निद्रानाश, उन्माद अपस्मारातील झटके यांसारख्या मज्जाविकारावरही शामक आहे.  विविध गुणकारी िपपळीचा उपयोग तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.

pink moon 2024
गुलाबी साडीचा विषय सोडा, आकाशात दिसणार चक्क ‘गुलाबी चंद्र’; आज पौर्णिमेला ‘या’ वेळेत पाहा ‘पिंक मून’
meteor showers, sky, meteor,
उद्यापासून आकाशात उल्कावर्षावाचा विविधरंगी नजारा, सुमारे १२ हजार वर्षांनी…
Surya Grahan 2024
४ दिवसांनी हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? ५०० वर्षांनी सूर्यग्रहणाला चार ग्रहांची महायुती होताच मिळू शकतो पैसा
pimpri chinchwad, three year old boy fall into well
धक्कादायक! पिंपरी- चिंचवडमध्ये तीन वर्षीय चिमुरड्याला खेळता- खेळता विहिरीत ढकलले; अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळी दाखल

– मृणालिनी साठे (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

माद्रिदवरील सत्तांतरे

१८०८ साली नेपोलियनच्या फ्रेंच फौजेने माद्रिदमध्ये प्रवेश करून राजवाडय़ाभोवती वेढा घातला, स्पेनचा राजा फडिर्नाड  यांस अटक केली. नेपोलियनने माद्रिदचा ताबा घेऊन त्याचा भाऊ जोसेफ बोनापार्ट याला स्पेनचा बादशाह म्हणून घोषित केले.

पुढे १८१२ मध्ये ब्रिटन आणि पोर्तुगालच्या संयुक्त फौजेने फ्रेंच फौजांचा पराभव करून फíडनांड सातवा १८१३ साली परत राजेपदावर आला. १८३३ ते १८६८ अशी प्रदीर्घ राजकीय कारकीर्द लाभलेल्या राणी इसाबेला द्वितीयच्या काळात मात्र तिला अनेकवेळा विरोधाला सामोरे जावे लागले. तिच्या काळात माजलेली बंडाळी आणि यादवीमुळे १८३७ साली माद्रिदमध्ये पहिले प्रजासत्ताक स्थापन झाले. परंतु पाचच वर्षांत इसाबेलाने स्पेन आणि माद्रिदवर आपली राजवट पुनस्र्थापित केली.

१८६८ साली इसाबेलाच्या मृत्यूनंतर तिचा मुलगा अल्फान्सो बारावा माद्रिदच्या राजेपदी आला मात्र १८७४ मध्ये आपल्या काळात राज्यात विरोधकांशी जमवते घेऊन, स्पेनचा विकास करून त्याने शांतता प्रस्थापित केली. याने काही प्रमाणात लोकशाही आणण्याचा प्रयत्न केला तरीही राजकीय विरोधकांनी बंडाळी माजवून १९३१ ते १९३६ ही पाच वष्रे माद्रिद मध्ये अस्थिरता निर्माण केली.

या राजकीय विरोधकांमध्ये स्पेनचा सेनापती फ्रान्सिस्को फ्रँको हा प्रमुख होता. १९३९ साली जनरल फ्रँकोने स्पेनच्या राजकारणाची सर्व सूत्रे स्वतकडे घेऊन हुकूमशाही कारभार सुरू केला. १९३९ ते १९७५ अशी छत्तीस वष्रे फ्रँकोने हुकूमशाही लष्करी पद्धतीने माद्रिदवर शासन केले परंतु राजघराण्याकडे नामधारी राजेपद चालूच ठेवले. जनरल फ्रँको राजकीय विरोधकांच्या बाबतीत अत्यंत क्रूर असलातरी त्याने त्याच्या कारकीर्दीच्या शेवटच्या वीस वर्षांत माद्रिदमध्ये उद्योजकांना प्रेरणा, सवलती देऊन माद्रिदमध्ये बाहेरचे अनेक उद्योग आणून शहराचा आíथक विकास केला.

फ्रँकोच्या मृत्यूनंतर स्पेनचा राजा जुआन कार्लोस आणि सामाजिक कार्यकर्ता एनरिक गॅलव्हन यांनी १९७८ मध्ये सांविधानिक राजेशाहीचे लोकशाहीवादी सरकार स्पेनमध्ये  आणले. चार दशकांच्या हुकूमशाहीनंतर गेल्या ४० वर्षांत माद्रिदने औद्योगिक, शैक्षणिक, साहित्य, कला आणि संस्कृती या सर्वच क्षेत्रांत मोठी भरारी मारली आहे.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com