वाडय़ात २० कोटींचा विकास निधी परत; नगरपंचायतीच्या अंतर्गत वाद, ढिसाळ कारभाराचा फटका

वाडा शहराच्या विकासासाठी नगरविकास विभागाने गेल्या काही महिन्यांपूर्वी २० कोटी रुपयांचा विकास निधी वाडा नगरपंचायतीला दिला होता.

वाडय़ात २० कोटींचा विकास निधी परत; नगरपंचायतीच्या अंतर्गत वाद, ढिसाळ कारभाराचा फटका
( प्रतिनिधिक छायाचित्र )

वाडा : वाडा शहराच्या विकासासाठी नगरविकास विभागाने गेल्या काही महिन्यांपूर्वी २० कोटी रुपयांचा विकास निधी वाडा नगरपंचायतीला दिला होता. मात्र येथील प्रशासनाचा ढिसाळ कारभार व पदाधिकारी यांच्यातील अंतर्गत वादामुळे हा निधी नगरपंचायतीला खर्च करता आला नाही. परिणामी नगरविकास विभागाने यामधील काही निधी विक्रमगड नगरपंचायतीकडे वळविला तर काही निधी नगरविकास विभागाकडे परत गेला आहे.

वाडा नगरपंचायतीमध्ये अनेक सेवा, सुविधांची वानवा आहे. येथील विकास कामे होण्यासाठी येथील नागरीकांची नेहेमीच ओरड असते. नगरपंचायत कार्यक्षेत्रातील विविध प्रकारच्या विकास कामांसाठी वर्षभरापुर्वीच नगरविकास विभागाने २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र वर्षभरात या निधीच्या खर्चासाठी नगरपंचायत प्रशासनाला निविदा प्रRिया राबविता आली नाही. अखेर नगरविकास विभागाने १ऑगस्ट रोजी शुध्दीपत्रक काढून यातील काही निधी विRमगड नगरपंचायतीकडे वळवण्याचा निर्णय घेतला. तर काही निधी गोठविण्यात आला आहे.

नगरपंचायत प्रशासन व येथील पदाधिकारी, नगरसेवक यांच्या हलगर्जीपणाबाबत समाज माध्यमांवर टिकाटिपणी होत असुन येथील नागरीकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. येथील नगरसेवक, पदाधिकारी यांच्यातील अंतर्गत हेवेदावे यामुळेच हा प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे.

पाच कोटी विक्रमगडला
वाडा शहराच्या विकासासाठी नगर विकास विभागाने गेल्या मार्च महिन्यात २० कोटींचा निधी रस्ते, स्मशानभूमी व उद्यने विकसित करण्यासाठी दिला होता. मात्र संबंधित कामांची निविदा प्रक्रिया आजपर्यंत होऊ शकली नाही. तसेच या कामांचे कार्यारंभ आदेशही देण्यात आलेले नाहीत. यामुळे या निधीतील ५ कोटी रुपये विRमगड नगरपंचायतीकडे वळवण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला गेला आहे. उर्वरित निधी परत घेतला आहे. दरम्यान, या निधी संदर्भात सद्य माझ्याकडे काहीच माहिती उपलब्ध नाही, नसल्याचे वाडा तहसीलदार तथा प्रशासक डॉ. उद्धव कदम यांनी सांगितले आहे.

गटातटाचे राजकारण ?
वाडा नगरपंचायतीमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. अलिकडेच शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीमध्ये येथील नगरपंचायतीमधील एकही नगरसेवक अथवा वाडा शहरातील शिवसेनेचा एकही पदाधिकारी शिंदे गटात सामील झालेला नाही. त्यामुळे नगरविकास विभागाने असा निर्णय घेतला असावा असे काही शिवसैनिकांकडून बोलले जात आहे.

मंजूर करण्यात आलेला निधी गोठविण्यात आला आहे ही वस्तुस्थिती खरी आहे. मात्र तो कोणत्या कारणास्तव गोठविला आहे याची माहिती आम्ही घेत आहोत. -संदीप गोरे, उपनगराध्यक्ष, नगरपंचायत, वाडा.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 20 crore development fund returned to the castle amy

Next Story
जिल्ह्याला साथीच्या आजारांचा विळखा ; ताप, सर्दी, खोकल्याचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये वाढ
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी