कासा: जव्हार तालुक्यात वडिलांनी आपल्या १५ वर्षांच्या मुलाची हत्या करून त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जव्हार तालुक्यात घडली आहे. आदित्य उर्फ भावेश शरद भोये ( १५) असे मृत मुलाचे व शरद रघुनाथ भोये ( ४०) हे आत्महत्या करणाऱ्या वडिलांचे नाव आहे.

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील पिंपळशेत परिसरात राहणारे शरद भोये यांचे वडील रघुनाथ जानू भोये बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास पिंपळशेत होळीची माळी येथील त्यांच्या शेतावरील घरी गेले असता त्यांना एक धक्कादायक दृश्य घरात दिसून आले. त्यांच्या १५ वर्षाचा नातू भावेश याचा मृतदेह घरात पडला होता आणि दुसऱ्या खोलीत त्यांच्या मुलगा शरद ने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

त्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली, घटनेची माहिती मिळाल्यानंतर जव्हार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोनही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी जव्हार पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या कलम १०३ (१ ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद भोये यांनी पिंपळशेत शेतावरील घरात स्वतःच्या मुलाचे जमिनीवर डोके आपटून दोरीने त्याचा गळा आवळून त्याची हत्या केली. त्यानंतर नायलॉन दोरीच्या सहाय्याने घरातील दुसऱ्या खोलीत लोखंडी अँगलला गळफास घेऊन स्वतः आत्महत्या केली. शरद भोये यांनी मुलगा भावेश याची हत्या करून स्वतः आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. जव्हार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या हत्येचा आणि आत्महत्या कशामुळे केली याचा तपास जव्हार पोलीस करत आहेत.