डहाणू : डहाणू तालुक्यातील कंक्राडी राईपाडा येथील एका वाडीमध्ये मादी बिबट्याचा अधिवास आढळून आला असून मादीसह दोन पिल्लं मिळून आली आहेत. वाडी मालकाच्या निदर्शनास बिबट्याची पिल्ले आली असता त्यांनी वनविभागाला याची माहिती दिली. सध्या वनविभाग डहाणूचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी पिलांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला असता झुडुपांमध्ये मादी बिबट्या आढळून आल्याची माहिती वनविभागाने दिली.

सध्या घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी उपस्थित असून बिबट्याचा अधिवास असलेले ठिकाण गावापासून लांब असल्यामुळे त्यांना येथून हलवण्याची गरज नसल्याची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली. तर गावातील लोकांना याबाबत सूचना देण्यात येऊन गावात जनजागृती करण्यात येणार आहे. शिवाय बिबट्याच्या हालचाली टिपण्यासाठी याठिकाणी कॅमेरा लावण्यात येणार आहे.

हेही वाचा – रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगा हाल, सोयीसाठी एसटी आगाराकडून ज्यादा फेर्‍या

हेही वाचा – पालघर: वाढवण बंदर जनसुनावणी पुढे ढकलली; २२ डिसेंबर ऐवजी १९ जानेवारी रोजी होणार पर्यावरणीय सुनावणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंक्राडी राई परिसरात गेल्या काही वर्षांपासून सतत बिबट्याचे दर्शन होत आहे. अनेक वेळा बिबटे मानवी वस्तीच्या परिसरात कुत्री आणि कोंबड्यांची शिकार करण्यासाठी येत असल्याचे आढळून आले आहे. शिवाय या परिसरात मोठ्या प्रमाणात वाड्या असून अनेक वाड्या ओसाड असल्यामुळे येथे जंगली प्राण्यांचे वास्तव्य आढळून येत आहे. त्यामुळे परिसरातील गावांमध्ये रात्रीच्या सुमारास एकटे दुकटे फिरण्यास मज्जाव करण्यात आला असून जनजागृतीच्या माध्यमातून नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.