कासा : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी जवळील चिंचपाडा गावाजवळ मुंबईकडे संत्रा घेऊन जात असलेला ट्रक उलटून अपघात झाला. या अपघातामध्ये ट्रकचालक किरकोळ जखमी झाला असून ट्रकचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अपघातानंतर ट्रकमध्ये भरलेली संत्री पूर्ण मार्गावर पसरली आहे. संत्रा घेऊन जाणारा ट्रक उलटल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी संत्री गोळा करण्यासाठी गर्दी केली. तसेच महामार्गाच्या दुभाजकावरच ट्रक उलटला त्यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंनी जवळपास ५ ते ६ किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे.

हेही वाचा – वसई भाईंदर रो रो सेवा मंगळवारपासून सुरू होणार, प्रवाशांना दिलासा

हेही वाचा – बोईसर : औद्योगिक वसाहती मधील रासायनिक कारखान्याला आग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस घटनास्थळी पोहोचले असून वाहतूक धीम्या गतीने सुरू करण्यात आली आहे. अपघात होऊन काही तासांचा अवधी झाला असला तरी देखील अपघातग्रस्त ट्रक काढण्यात आलेला नव्हता. वाहतूक पोलिसांनी क्रेन बोलवली असून ट्रक बाजूला घेण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.