पालघरमध्ये एका धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे प्रियकराबरोबर टेकडीवर फिरण्यास गेलेल्या तरूणीवर बलात्कार करण्यात आला आहे. बुधवारी ( २२ मार्च ) ही घटना घडली. दोन आरोपींनी प्रियकराला झाडाला बांधलं. नंतर तरूणीवर बलात्कार केला आहे. याप्रकरणी विरार येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर गुरूवारी ( २३ मार्च ) पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केलं, असता २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा : वैतरणा आणि भाईंदर खाडय़ांवर तीन नव्या पुलांची निर्मिती, वसई- मुंबईचे अंतर गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मिळालेल्या माहितीनुसार, तरूणी प्रियकरासह टेकडीवर फिरण्यासाठी गेली होती. तेव्हा आरोपींनी त्यांना पाहिलं. तिथे आरोपी आणि तरूणामध्ये वाद झाला. तरूणाने आरोपींना बिअरची बाटली मारली. यानंतर आरोपींनी तरूणाचे कपडे काढत, झाडाला बांधलं.

हेही वाचा : वाढवण बंदर विरोधाची तज्ज्ञ समितीला शिक्षा?, डहाणूतील ‘डीटीईपीए’ समितीतून चौघांची गच्छंती केंद्राकडून १९९६ च्या अधिसूचनेत बदल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मग आरोपींनी तरूणीला निर्जनस्थळी घेऊन गेले. तिथे तिच्यावर बलात्कार केला आणि तिची पर्सही जाळली. मात्र, पीडित तरूणी आरोपींच्या तावडीतून सुटका करून घेत घरी पोहचली. पण, तिचा प्रियकर झाडाला बांधूनच होता. काही तासानंतर पोलिसांनी त्याची सुटका केली.