डहाणू: रविवारी रात्री सुरु झालेल्या संततधारेमुळे डहाणूच्या ग्रामिण भागात नद्य ओहोळ दुथडी वाहू लागले तर ठीकठीकाणी पुरस्थीती निर्माण होऊन डहाणू, चारोटी, वाणगाव, बोर्डी, येथे प्रमूख मार्गावरुन पाणी वाहू लागल्यायाने वाहतूक ठप्प झाली. रेल्वे ट्रेन ही अनियमित वेळेत सुरू होत्या. पावसामुळे सकाळचे वेळापत्रक चुकल्याने चाकरमान्याइना सक्तीच्या रजेवर थांबावे लागले. पहाटे शाळेमध्ये गेलेल्या विद्यर्थांचे हाल झाले. रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे काही लोकांना, नोकरदारांनी सकाळी घरा बाहेर पडणे टाळले.
डहाणू शहरात मुसळधार पावसामुळे सतिपाडा, प्रभूपाडा, मसोली, सरावली येथील काही घरांना पाणी गेले होते.मुसळधार पावसामुळे सुर्या नदीला पूर आल्याने नदीतीरावरील गावांनी सतर्क राहण्याची दक्षता घेतली.त्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही.मात्र काही भागात मूख्य नाल्यावरील पूल पूराच्या पाण्याखाली गेल्याने अनेक भागात वाहतूक बंद झाली. नंदारे येथील मूख्य रस्त्यावरील नाला वाहून गेला, आंबेसरी मूख्य रस्त्यावर झाड पडल्यामुळे वाहातूकीस अडथळा निर्माण झाला होता. चारोटी येथील गूलजारी नदीला पूर आल्याने पूलाला पाणी टेकले. खूटखाडी पूल , कोलपाडा येथे पूल पाण्याखाली गेल्याने डहाणू बोर्डी वाहतूक ठप्प झाली. तर वाणगाव येथे देदाले तसेच खडखड येथे पूल पाण्याखाली गेले. कंत्राटी नदीला पूर आल्य़ाने मसोली परिसरात पाणी शिरले. संततधार असल्याने पूरस्थीती नियंत्रणात आली.
पावसामुळे ईराणी रोड तर जलाराम परिसर जलमय झाला होता. मसोली परिसरात तसेच बाजारपेठेत काही दुकानात पाणी शिरले. पावसाच्या पाण्यामुळे अनेक भागातीला भातशेती पाण्याखाली गेल्याने नुकताच पेरलेले बी, खत पूरासोबत वाहून गेल्याचा प्रकार घडला .त्यामुळे पावसाच्या आगमनामुळे सुखावलेला शेतकऱ्याला पून्हा बी टाकण्याची वेळ ओढवली आहे.