पालघर : पालघर जिल्ह््यात समुद्र किनारपट्ट्यांवर वादळाची शक्यता हवामान विभागाने वर्तवल्याने यंदाचा मासेमारी हंगाम आठवड्याअखेरीस संपेल, असे मच्छीमारांकडून सांगितले जात आहे. तसेच मासेमारीच्या अखेरच्या टप्प्यात पुरेशा प्रमाणात माशांची आवक होत नसल्याने अधिकतर बोटी किनाºयावर नांगरण्यास मच्छीमारांनी सुरुवात केली आहे.
पालघर जिल्ह््यात सुमारे २०३० मासेमारी बोटी आहेत. पावसाळ्यात दरवर्षी १ जून ते ३१ जुलै या दरम्यान मासेमारी बंदी असते. गतवर्षी मत्स्यसंवर्धनाच्या दृष्टीने १५ ऑगस्टपर्यंत ती बंद होती. मे ३१ पर्यंत मासेमारी हंगाम असतो. मात्र यंदा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निर्माण झालेल्या वादळी पावसाच्या परिस्थितीमुळे मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. डहाणू व इतर काही भागात बोटीची नासधूस देखील झाली. यंदाच्या हंगामात तीन आठवडे शिल्लक मच्छीमार बोटी किनाºयावर असतानाच महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात राज्याच्या किनारपट्टीवर वादळ येणार असल्याची सूचना हवामान विभागाने दिली आहे. तर मत्स्य व्यवसाय विभागाने जिल्ह््यातील सर्व मच्छीमार सोसायटीना २३ ते २५ मे दरम्यान वादळी परिस्थिती निर्माण होण्याबाबत दक्षतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे मच्छीमारांनी सर्व मासेमारी बोटी नांगरण्यासाठी सुरक्षित ठिकाणी जावे, अशा सूचना केल्या आहेत. या संदर्भात हवामान विभागाकडून मिळणाºया धोक्याच्या इशाºयाच्या अनुषंगाने मासेमारी बोटी बंदरावर आणण्याबाबत आवश्यकतेनुसार सूचना मच्छीमारांना देण्यात येतील अशी माहिती पालघर ठाणे मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त दिनेश पाटील यांनी दिली. वादळाची परिस्थिती तीव्र असल्यास ३१ मे रोजी संपणारा मासेमारी हंगाम यंदा २४- २६ मे दरम्यानच संपेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
इतर माशांची आवक समाधानकारक
२०२४ मध्ये सुरू झालेल्या मासेमारी हंगामाच्या आरंभी आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरणाºया पापलेट माशाची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती. मात्र दिवाळीनंतर आवक अचानक कमी झाल्याने मासेमारी बोटीच्या प्रत्येक फेरीला होणारा खर्च निघत नव्हता. तरीदेखील डिसेंबरपासूर्न ंडग पाला, मुशी, काटी, घोळ, दाडा सारख्या माशांची आवक उर्वरित हंगामात चांगल्या प्रमाणात झाल्याने मच्छीमारांना दिलासा मिळाला आहे.
लहान आकाराच्या पापलेटवर बंदी
मच्छीमारांच्या अर्थकारणातील पापलेट हा प्रमुख मासा असून पापलेटच्या लहान आकाराचे मासे पकडण्यात येत असल्याने पापलेट माशाच्या आवकावर परिणाम होत आहे. त्यामुळे सातपाटी येथील दोन्ही मच्छीमार सहकारी संस्थांनी लहान आकाराचे पापलेट मासे पकडायचे
नाहीत, पकडल्यास त्यांना बंदरात उतरू द्याायचे नाहीत तसेच लहान आकाराचे पापलेट मासे साठवणूक करण्यासाठी शीतगृह आणि माशांसाठी बर्फ पुरवठा उपलब्ध न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याची माहिती सर्वोदय सहकारी सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत तरे तसेच मच्छीमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष विनोद नाईक यांनी दिली.
सातपाटीत २०० पैकी केवळ ३५ बोटींकडून मासेमारी
मासेमारी हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात पुरेशा प्रमाणात माशांची आवक होत नसल्याने इंधन तसेच बोटीची फेरी करण्यासाठी असणारा इतर आवश्यक खर्च निघत नसल्याने अनेक मासेमारी बोटी सध्या बंदरावर उभ्या आहेत. मासेमारीसाठी प्रसिद्ध असणाºया सातपाटी येथील दोन मच्छीमार सहकारी संस्थांच्या २०० बोटींपैकी सध्या जेमतेम ३०-३५ बोटी मासेमारी करीत आहेत. शिवाय खलाशी उपलब्ध असेपर्यंत बोटीच्या दुरुस्तीची काम हाती घेतली जात असल्याने काही मच्छीमारांनी मासेमारी बंद केली आहे.
यंदाच्या हंगामात पापलेटची आवक कमी प्रमाणात झाली असली तरी इतर प्रकारचे मासे मोठ्या प्रमाणात मिळाल्याने मासेमारी हंगाम समाधानकारक राहिले. तरीदेखील वादळी परिस्थितीचे अंदाज घेता तसेच र्बोंटच्या दुरुस्ती कामे आमच्या सोसायटीच्या बहुतांश बोटी बंदरावर आहेत. -विनोद नाईक, अध्यक्ष, सातपाटी मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्था