पालघर : वैतरणा ते डहाणू रोड दरम्यानच्या पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय क्षेत्रात रेल्वे प्रवाशांच्या अनेक समस्या असून विभागीय रेल्वे वापरकर्ते सल्लागार समितीच्या सदस्यांनी त्या सोडवण्यासाठी गेला दीड वर्षापासून प्रयत्न केले. मात्र रुळांवरून गाड्या वाहून नेण्याची क्षमता व्यापली असल्याचे प्रामुख्याने कारण सांगत नवीन उपनगरीय सेवा सुरू करणे तसेच गाड्यांना थांबा देण्याबाबत नकार घंटा वाजवली आहे. तसेच उत्तरप्रदेश, राजस्थान तसेच पुणे व दक्षिणेतील राज्याकडे जाणाऱ्या अनेक गाड्यांच्या थांब्याबाबत रेल्वे बोर्डाकडून निर्णय प्रलंबित असल्याने उपनगरीय क्षेत्रातील प्रवाशांचे भवितव्य रेल्वेच्या वरिष्ठांच्या हाती टांगणीला पडले आहे.

विभागीय रेल्वे वापरते सल्लागार समितीच्या सदस्यपदी पालघरच्या केदार काळे व हृदयनाथ म्हात्रे यांची पूर्ण कारकीर्द तर तेजराज हजारी यांना अखेरची सहा महिने सदस्य पद मिळाले होते. दर तीन महिन्यांनी होणाऱ्या या समितीच्या बैठकीत प्रत्येक सदस्याला मर्यादित प्रश्न विचारण्याची मुभा होती. त्यादरम्यान या सदस्याने वैतरणाचे डहाणू दरम्यानच्या अनेक समस्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तांत्रिक करणे, रुळाची क्षमता, लांब पल्ल्याच्या गाड्यांची नियमितता राखण्यासाठी येणाऱ्या अडचणी उल्लेखित करून बहुतांश मागण्या प्रलंबित राहिल्या आहेत.

kalyan ac local latest marathi news
कल्याण, बदलापूर, टिटवाळा गारेगार लोकलमधील पोलीस, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या गर्दीने पासधारक प्रवासी त्रस्त
Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
flamingo, Solar lights, Navi Mumbai ,
फ्लेमिंगो क्षेत्रात सौरदिवे! पर्यावरणवाद्यांच्या तक्रारींनंतर नवी मुंबई महापालिकेची धावाधाव
Traffic Congestion Worsens in bandra santacruz vakola
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ, वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याची गरज

हेही वाचा – अप्रशिक्षित शिक्षक स्वयंसेवकांवर नवीन पिढी घडवण्याची जबाबदारी; तीन ते पाच हजार रुपयांत १२ ते पदवीधर यांच्याकडून अध्यापन

करोना काळात बंद झालेल्या रेल्वे सेवा पूर्ववत झाल्यानंतर बांद्रा- कटरा तसेच अजमेरकडे जाणाऱ्या गाड्यांचे पालघरचे थांबे पूर्ववत झाले व नंदुरबारकरिता विशेष गाडी सुरू झाली. गणपती दरम्यान कोकणात जाणाऱ्या हॉलिडे स्पेशल गाड्यांना पालघर येथे थांबा देण्यात आला. तर डहाणू अंधेरी दरम्यान सकाळी धावणाऱ्या लोकलचा चर्चगेटपर्यंतचा विस्तार या जमेच्या बाजू मानल्या जात आहेत. याखेरीज वसई रोड, नालासोपारा व सफाळा येथे सरकते जिने (एसकेलेटर) सुरू करण्यात आले असून रेल्वे फलाटांवरील उपाहारगृहांमधील खाद्यांचा दर्जा तपासणी तसेच शौचालय व मुताऱ्यांची स्वच्छता राखण्याकडे रेल्वेने प्रयत्न केले आहेत.

पालघर जिल्हा मुख्यालय झाल्याने अमृत भारत रेल्वे स्थानकात पालघरला स्थान मिळाले असले तरीही या स्थानकात कोणत्याही स्वरूपाचे अमुलाग्र बदल झाले नाहीत. शटल, मेमू व वलसाड फास्ट पॅसेंजरला करोना काळात दिलेल्या एक्सप्रेस गाड्यांची दर आकारणी अजूनही कायम आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी उपनगरीय सेवेला साईडला काढून ठेवल्याने या गाड्यांना विलंब होत असतो. लोकशक्ती एक्सप्रेसला सफाळे येथे थांबा, फ्लाईंग राणी सुपरफास्ट गाडीला असणारे डबल डेकर डबे काढल्याने प्रवाशांना झालेली गैरसोय, पालघर, बोईसर व डहाणू येथे सरकते जिने उभारण्यास झालेले दिरंगाई तसेच रेल्वे स्थानकावर पिण्याच्या पाण्याची सुविधा डब्यांच्या क्रम दर्शवणारे डिजिटल इंडिकेटर इत्यादी बाबींपासून वैतरणाचे डहाणू रोड दरम्यानचे अनेक प्रश्न कायम राहिले आहेत.

हेही वाचा – शहरबात : समस्यांच्या जाळ्यात मच्छीमार…

करोना काळात पहाटे सुरू केलेल्या नवीन उपनगरीय सेवेमुळे ऐन गर्दीच्या वेळी सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी डहाणू रोड येथून सुटणारी लोकल गाडी आजवर सुरू झाली नसून त्याकरिता आवश्यक असणारा लोकल गाडीचा रॅक उपलब्ध नसणे व त्याच काळात इतर लांब पल्ल्याच्या गाड्यांची वर्ग अशी कारणे सांगण्यात आली आहेत. तर रात्री सव्वाअकरा वाजता सुटणाऱ्या गाडीला १५ ते २० मिनिटे विलंब करण्यास देखभाल दुरुस्तीसाठी असणाऱ्या मेगाब्लॉकची तांत्रिक अडचण दाखविण्यात आली आहे. याखेरीज विरारपर्यंत धावणाऱ्या उपनगरीय सेवा बोरीवलीपर्यंत विस्तारित करण्यास व मेमू गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यासाठी रुळांच्या गाड्या वाहण्याची क्षमता १३० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे.

उपनगरीय सेवांमध्ये वाढ व्हावी यासोबत राजस्थानकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना पालघर येथे थांबा मिळावा, दौंड इंदोर एक्सप्रेस, पुणे बिकानेर एक्सप्रेस, महाराष्ट्र संपर्क क्रांती एक्सप्रेस, वांद्रे भावनगर एक्सप्रेस, दादर बिकानेर एक्सप्रेस, कच्छ एक्सप्रेस, मुंबई आमदाबाद गुजरात एक्सप्रेस इत्यादी गाड्यांना पालघर व इतर स्थानकांत थांबा मिळण्यासाठी रेल्वे वापर करते सल्लागार समितीच्या सदस्यांनी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र लांब पल्ल्याच्या गाड्यांची नियमितता राखणे तसेच उपनगरीय क्षेत्रात लांबपल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्याबाबत रेल्वेचे धोरण आडवे येत असल्याचे कारण सांगून याबाबत वरिष्ठ पातळीवर अथवा रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव अनुमतीसाठी पाठवण्याचे सांगण्यात आले.

परिणामी डहाणू रोड ते वैतरणा दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मर्यादित उपनगरीय सेवेत प्रवास करणे भाग पडत असून त्यांचा प्रवास गैरसोयीचा ठरत आहे. विरार डहाणू रोड दरम्यान उपनगरीय क्षेत्राच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू असून हे काम किमान पुढील तीन वर्ष पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने या पट्ट्यातील प्रवाशांचे होणारे मेगाहाल सुरू राहतील अशी चिन्हं दिसून येत आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी विशेष प्रयत्न केले नाहीत तर पुढील वर्षात या भागातील प्रवाशांच्या हाती काही विशेष लाभेल अशी शक्यता कमी आहे.

आपल्या मतदारसंघातील समस्यांबाबत आपण रेल्वे बोर्डाकडे सातत्याने पाठपुरावा करत असून विरार वसई रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण व नालासोपारा रेल्वे स्थानकाला अत्याधुनिक बनवण्याचे प्रस्ताव मंजूर झाले आहे. रेल्वे वेगवेगळे उड्डाणपूल तसेच पायाभूत सुविधांचा स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उपनगरीय सेवांच्या संदर्भात पश्चिम रेल्वेच्या मुख्य व्यवस्थापक यांची तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. – खासदार राजेंद्र गावित