पालघर : समुद्रावर क्रिकेट खेळण्यासाठी सातपाटी मोहल्यातून गेलेल्या सहा मित्रांपैकी एक १७ वर्षीय तरुण समुद्रात पोहोताना वाहून गेल्याची घटना आज दुपारी घडली आहे. त्याच्यासोबत असणारे पाच मित्र बचावले असून बेपत्ता असलेल्या मुलाचा शोध सातपाटी पोलीस व स्थानिक घेत आहेत.

उमेद इमरान शेख (१७) हा सातपाटी येथील तरुण मित्रांबरोबर क्रिकेट खेळण्यासाठी दुपारी समुद्रकिनाऱ्यावर गेले होते. समुद्राला मोठी भरती आल्याने तसेच लाटा किनाऱ्यावर धडकताना येणाऱ्या आनंदाच्या मोहात हे सर्व तरुण पोहण्यासाठी समुद्रात उतरले. दरम्यान एका तीव्र लाटेच्या धक्क्याने उमेद चा तोल गेला व लाटांच्या तो समुद्र वाहून गेल्याचे मित्रांनी सांगितले. ही घटना दुपारी चार वाजल्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात आले.

स्थानिक तरुण आणि मच्छीमारांच्या मदतीने समुद्रात वाहून गेलेल्या तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र लाटांची तीव्रता व सायंकाळी असणाऱ्या भरतीमुळे पाण्याच्या पातळी मध्ये वाढ झाल्याने शोध कामास अडथळा निर्माण झाला. या प्रकरणात सातपाटी पोलीस व स्थानिक बुडालेल्या मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.