पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांना एका प्रकरणात ५० हजार रुपयाची लाच घेताना मुंबई च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी त्यांची बदली झाली असताना त्यांनी पदभार सोडला नव्हता.

हेही वाचा >>> शहरबात : मासेमारी बंदी कालावधी वाढीकडे वाटचाल

नियम डावलून २४ उपजिल्हाधिकाऱ्यांना बढती? प्रस्तावाविरोधात तीन संघटनांची मुख्य सचिवांकडे तक्रार
amazon river drying up
विश्लेषण: जगातील सर्वांत मोठी ॲमेझॉन नदी पडतेय कोरडीठाक……
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
Narendra Modi Subhash Desai
Narendra Modi : “मला ८४ हजारांची पेन्शन मिळते, मोदींना किती रुपये मिळतील माहितीय का?”, सुभाष देसाईंनी सगळी आकडेवारी मांडली
Bigg Boss Marathi Aarya Slaps Nikki marathi actress reaction
“जाणीवपूर्वक हिंसा निंदनीयच…”, निक्कीला कानशि‍लात लगावल्याप्रकरणी मराठी अभिनेत्रीची पोस्ट; म्हणाली, “मनाने खंबीर…”
Sarpanch Upasarpanch Salary
Sarpanch Salary Hike : सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ; राज्य सरकारचे २४ मोठे निर्णय
Akshay Shinde Mother and Father
Akshay Shinde Encounter : “अक्षयचा मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही, कारण…”; आई वडिलांनी नेमकं काय म्हटलं आहे?
mumbai court marathi news
मुंबई: लघुवाद न्यायालयातील अनुवादकाला २५ लाखांची लाच स्वीकारताना अटक

मुंबईच्या लाच लुचपत प्रतिबिंब विभागाच्या पथकाने त्यांच्या कार्यालयात सापळा रचून त्यांच्या कार्यालयातच त्यांना अटक केली. पालघर मधून त्यांची बदली रत्नागिरी जिल्ह्यातून राजापूर येथे  झाली होती. मात्र एक वर्ष वाढवून मिळावे ह्यासाठी ते प्रयत्नशील होते.

वाडा येथील एका आदिवासी खातेदारकाची जमीन नावावर करण्यासाठी आदिवासी असलेले तक्रारदार आपले प्रकरण मंजूर करण्यासाठी गेले होते. नियमानुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनही मान्यता देण्यासाठी उपजिल्हाधिकारी जाधवर यांनी तक्रारदाराकडे ५० हजाराची लाच  मागितली होती.

हेही वाचा >>> १५ मच्छीमार संघटनांचा ‘वाढवण’ला पाठिंबा; बंदर समन्वय समिती बैठकीत सकारात्मक चर्चा

तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने मुंबईच्या प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. मंगळवारी दुपारी राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग याच्या अध्यक्षांची पत्रकार परिषद पूर्ण केल्यानंतर ते आपल्या कार्यालयात आले. त्यानंतर तक्रारदारानी त्यांच्या कार्यालयात येऊन संपर्क साधल्यानंतर कार्यालयातच 50 हजार रुपयाची लाच स्वीकारताना त्यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने झडप घातली. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया उशिरा पर्यंत सुरू होती. या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ मजली आहे.