अंगणवाडय़ांत निकृष्ट आहार

जव्हार तालुक्यातील अंगणवाडीअंतर्गत लहान मुले, गरोदर व स्तनदा मातांना देण्यात येणाऱ्या पोषक आहार हा निकृष्ट असल्याची तक्रारी शासनाकडे करण्यात आली आहे.

शासनाकडे तक्रार, लाभार्थीकडून आहार परत 

पालघर: जव्हार तालुक्यातील अंगणवाडीअंतर्गत लहान मुले, गरोदर व स्तनदा मातांना देण्यात येणाऱ्या पोषक आहार हा निकृष्ट असल्याची तक्रारी शासनाकडे करण्यात आली आहे. लाभार्थीनी हा आहार शासनाला परत केला आहे. जव्हार नगर परिषद यांच्या अंतर्गत  बारा अंगणवाडी केंद्र ही शहरी भागात येतात. या अंगणवाडय़ा भिवंडी बाल विकास प्रकल्पअंतर्गत जोडलेल्या आहेत. या अंगणवाडी केंद्रात सात महिने ते सहा वर्षे मुलांसाठी तसेच गरोदर व स्तनदा मातांसाठी कच्चे धान्य अर्थात पोषक आहार दिला जात आहे. मात्र देण्यात येणारा आहार हा निकृष्ट असल्याचा  अंगणवाडी क्षेत्रातील महिलांनी म्हटले आहे.  या आहाराच्या पाकिटावर या आहाराच्या वस्तूंचे उत्पादन कोणी केले, उत्पादनाची दिनांक, आहार किती महिने किंवा किती दिवसांपर्यंत वापरता येऊ शकतो अशा माहितीचा उल्लेख केलेला नाही.  तसेच लाभार्थी मातांनी या आहारात पुरवलेल्या शिरा, सुकडीच्या दर्जाबाबतच्या तक्रारी केल्या आहेत. शासनातर्फे पुरवण्यात आलेला उपमा खूप तिखट आहे, शिरांमध्ये साखर नाही तसेच सुकडी व बालभोग व्यवस्थित शिजत नाही, तसेच हळद, तिखट खराब दिले आहे अशा स्वरूपाच्या तक्रारी पुढे आल्या आहेत.  आहारसंदर्भात त्रुटी निदर्शनास आल्याने महिलांनी  त्याबाबतच्या तक्रारी शासकीय व्यवस्था व श्रमजीवी संघटनेकडे केल्या आहेत.

 शासनातर्फे पुरविण्यात येणाऱ्या आहारामध्ये साखरेऐवजी तेलाचा समावेश व्हावा तसेच अंगणवाडीत कडधान्य, डाळी, गहू, हळद, तिखट, मीठ असे खाद्यपदार्थ देण्यात येत असून त्या ठिकाणीदेखील साखरेऐवजी तेल मिळावे अशी मागणी लाभार्थीनी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून शासनाकडे केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची अन्न प्रशासनाकडून चौकशी व्हावी व माता व बालकांच्या जिवाशी खेळणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी श्रमजीवी संघटनेने जव्हारचे तहसीलदार तसेच ठाण्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

यापूर्वीही आंदोलन

अंगणवाडय़ांना पुरवण्यात येणाऱ्या टेक होम रेशन (टीएचआर) च्या दर्जाबाबत सन २०१७ मध्ये अशाच प्रकारे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. नंतर आंदोलनही झाले होते. अशा प्रकारे पुरवल्या जाणाऱ्या वस्तूचा वापर न केल्याने खाद्यपदार्थाची पाकिटे जनावरांना टाकण्यात असल्याचे दिसून आले होते. स्थानिक पातळीवर नागरिकांना डाळी, कडधान्य, मीठ-मसाला व तेल या पोषक वस्तूंची अधिक गरज असल्याचे प्रशासनाला यापूर्वी कळविल्यानंतरदेखील काही ठिकाणी शिरा, उपमा सुकडी व बालभोग हा निकृष्ट दर्जाचा पुरविण्यात आल्याचे दिसून आले आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Students children poor diet complaint government ysh

Next Story
सभेत विकासात्मक चर्चेकडे दुर्लक्ष
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी