-
चित्रपटांमधील काम आणि आपले कुटुंब यामध्ये योग्य तो समतोल राखण्यासाठी बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारचे नाव न चुकता घेतले जाते.
व्यग्र वेळापत्रक असूनसुद्धा तो पत्नी व मुलांना पुरेपूर वेळ देतो. मोठ्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त अक्षयने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. अक्षय व ट्विंकल खन्नाचा मुलगा आरव आता १८ वर्षांचा झाला आहे. अक्षयप्रमाणेच आरवनेसुद्धा मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण घेतलं आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत आरवसुद्धा बॉलिवूडमधला मोठा स्टार होईल असं अनेकांना वाटतं. अक्षय व ट्विंकलने आपल्या दोन्ही मुलांना लाइमलाइटपासून दूरच ठेवलं आहे. आरवच्या बॉलिवूड पदार्पणाविषयी बऱ्याचजणांनी तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली होती. -
अक्षय कुमारलाही ‘गोल्ड’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीदरम्यान याविषयीचा प्रश्न विचारण्यात आला.
-
या प्रश्नाचं उत्तर देत आरव बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी अतिशय लहान असल्याचं सांगत अक्षय म्हणाला, ‘सध्यातरी तो अभ्यासातच स्वारस्य दाखवत आहे.’
-
आरवचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.
-
त्याने काही फॅनपेजेससुद्धा आहेत.
-
अक्षय नुकताच बेअर ग्रिल्सच्या 'इन्टू द वाइल्ड' या साहसी शोमध्ये झळकला होता. या शोमध्ये मुलाविषयी सांगताना तो म्हणाला, "माझ्या मुलाचा स्वभाव फार वेगळा आहे. तो माझा मुलगा आहे हे त्याला कोणालाच सांगायचं नसतं. लाइमलाइटपासून दूर राहणं तो पसंत करतो."
-
आरवला स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करायची आहे, असं अक्षयने यावेळी सांगितलं.
म्हणून त्याला त्याच्या इच्छेनुसार करिअर निवडायचं स्वातंत्र्य दिल्याचंही तो पुढे म्हणाला. -
(सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम)

“किती गोड!”, ‘आई नहीं’ गाण्यावर थिरकली चिमुकली; थेट श्रद्धा कपूरला दिली टक्कर, Viral Video पाहू नेटकऱ्यांनी केलं कौतुक