-
काजोल बॉलिवूडमधली एक यशस्वी अभिनेत्री आहे. तिने करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. शाहरुख खान बरोबरची तिची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना प्रचंड भावली.
-
रिअल लाइफमध्ये काजोलची जोडी अजय देवगण बरोबर जमली. काजोल आणि अजयला दोन मुले आहेत. मुलीचे नाव न्यासा तर मुलाचे नाव युग आहे.
-
बॉलिवूड चित्रपटांमधून दिलखुलास आणि बेधडक भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे काजोल.
-
खऱ्या आयुष्यात मात्र काहीशी वेगळी आहे. त्यामुळेच बॉलिवूडमध्ये अनेक वर्ष वावर असणाऱ्या या अभिनेत्रीला चंदेरी दुनियेमध्ये हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच मित्र-मैत्रिणी आहेत.
-
मुळातच मितभाषी स्वभावाची व्यक्ती असल्यामुळे मला फारसं सोशल व्हायला आवडत नाही. त्यामुळे मी चित्रपटांच्या सेटवरही फार कमी वेळा सहकलाकारांबरोबर वावरत असते.(फोटो सौजन्य – काजोल इन्स्टाग्राम)
-
आजवर मी अनेक कलाकारांबरोबर काम केलं आहे. मात्र या पूर्ण कारकिर्दीमध्ये मला एकही मैत्रीण मिळाली नाही, याची खंत वाटते’, असं काजोल दोन वर्षांपूर्वी एका मुलाखतीत म्हणाली होती.
-
अलीकडेच ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर.’ चित्रपटात काजोलने तान्हाजी मालुसरेंची पत्नी सावित्रीबाई यांची भूमिका साकारली होती. पती अजय देवगण 'तान्हाजी'च्या भूमिकेत होते.
-
अजय आणि काजोलची १६ वर्षांची मुलगी न्यासा सध्या सिंगापूरमधील युनायडेट वर्ल्ड कॉलेज ऑफ साऊथ इस्ट एशियामध्ये शिकत आहे.
-
काजोलचा जन्म पाच ऑगस्ट १९७४ रोजी झाला. काजोल अभिनेत्री तनुजा समर्थ आणि शोमू मुखर्जी यांची मुलगी आहे. तिचे आई-वडिल दोघेही चित्रपट सृष्टीशी संबंधित आहेत.
-
काजोलला आतापर्यंत सहा फिल्म फेअर पुरस्कार मिळाले आहेत. २०११ साली भारत सरकारने तिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.
-
१९९२ साली बेखुदी या सिनेमातून काजोलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. १९९३ साली आलेला बाझीगर हा तिचा पहिला यशस्वी चित्रपट आहे.
-
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, कुछ कुछ होता हैं, प्यार किया तो डरन क्या, प्यार तो होना ही था हे काजोलचे गाजलेले चित्रपट आहेत.
-
१९९९ साली काजोलने अजय देवगण बरोबर लग्न केले. लग्नानंतर करण जोहरचा 'कभी खुशी कभी गम' हा काजोलचा पहिला चित्रपट होता.
-
या चित्रपटात काजोल सोबत अमिताभ बच्चन, शाहरुख खान, करीना कपूर आणि ह्रतिक रोशन हे कलाकार होते.
-
या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आपण गर्भवती असल्याचे काजोलला समजले. गर्भवती असल्याचे समजल्यानंतरही काजोलने चित्रीकरणातून ब्रेक घेतला नाही. तिने चित्रीकरण सुरुच ठेवले.
-
१४ डिसेंबर २००१ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट हिट ठरला. संपूर्ण युनिट चित्रपटाचं यश साजरं करत होतं. या छायाचित्रात काजोलसोबत तिची मुलगी न्यासा आहे.
-
ज्यावेळी सर्व कलाकार चित्रपटाचं यश साजरं करत होते. त्यावेळी काजोल रुग्णालयामध्ये होती. तिचा गर्भपात झाला होता.
-
गर्भपाताचे काजोलला प्रचंड दु:ख झाले. ही गोष्ट तिच्या मनाला लागली. त्यावेळी अजय देवगण सतत तिच्यासोबत होता.
-
गर्भपाताच्या घटनेनंतर काजोल चित्रपटांपासून दूर गेली. न्यासाला जन्म दिल्यानंतरच तिने पुन्हा चित्रपटांमध्ये काम सुरु केले.
-
गर्भपात हा कुठल्याही महिलेसाठी दु:खाचा काळ असतो, असे काजोलने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे.
-
त्या कठीण काळात कुटुंबाची महत्त्वाची भूमिका असते. जितके जास्त प्रेम तुम्हाला कुटुंबाकडून मिळते, तितक्या लवकर तुम्ही दु:ख विसरता असे काजोलने म्हटले होते.

India vs Pakistan War Updates: “जर पाकिस्तान थांबला नाही, तर आम्ही…”, भारतानं शेजाऱ्यांना ठणकावलं; मध्यरात्रीच्या घडामोडींनंतर दिला इशारा!