
अभिनेत्री-डान्सर माधुरी पवारला तुम्ही मराठी डान्स रिएलिटी शोमध्ये तुम्ही पाहिलंच असेल.
झी मराठी वाहिनीवरील ‘देवमाणूस’ या मालिकेमध्ये देखील तिने काम केलं.
आता ‘रानाबाजार’ या वेबसीरिजमुळे ती चर्चेत आली आहे.
‘रानाबाजार’मध्ये एका राजकारणी घराण्यातील राजकारणात उतरलेल्या मुलीची भूमिका साकारत आहे.
पण प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडितच्या तोडीसतोड काम तिने या वेबसीरिजमध्ये केलं आहे.
ही वेबसीरिजमध्ये तिच्यासाठी सुवर्ण संधी होती.
कारण मराठीमधील अनेक दिग्गज कलाकारांनी यामध्ये काम केलं आहे.
या वेबसीरिजमधील तिच्या कामाचं कौतुक देखील होत आहे.
अभिनेत्री म्हणून कलासृष्टीमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी माधुरी सध्या धडपड करत आहे. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)