द्रमुकशी झालेल्या निवडणूक करारानंतर एमएनएम(मक्कल निधी मय्यम) नेते आणि अभिनेते कमल हसन राज्यसभेत प्रवेश करण्यासाठी सज्ज झाले आहेत. एमएनएम पक्षाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीला पाठिंबा दर्शविला होता. त्यानंतर त्यांनी या पक्षाला राज्यसभेतील जागेबाबत शब्द दिल्याचे बोलले जाते. एम. शानमुगम, एम. मोहम्मद अब्दुल्ला आणि पी. विल्सन (सर्व द्रमुकचे), वैको (एमडीएमके) आणि अंबुमणी यांच्या पदांच्या मुदती संपुष्टात आल्यामुळे ही निवडणूक आवश्यक ठरली आहे.

“कमल हसन यांच्या नेतृत्वाखालील एमएनएमची केंद्रीय प्रशासकीय संस्था आणि कार्यकारी समिती त्यांच्या उमेदवारीला मान्यता देण्यासाठी बुधवार किंवा गुरुवारी बैठक घेईल,” असे एमएनएमच्या एका नेत्याने सांगितले. “नेतृत्वाने स्थापन केलेली समिती पुढील कृतीसाठी डीएमएक सहयोगींशी चर्चा करेल,” असे एमएनएमच्या एका नेत्याने सांगितले.

२३४ सदस्यांच्या विधानसभेत राज्यसभेची जागा मिळवण्यासाठी ३४ मतांची आवश्यकता आहे. १५९ जागांसह द्रमुक युतीची स्थिती तर मजबूत आहे. एडाप्पाडी के पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील अण्णाद्रमुक ६२ आमदारांसह दोन जागा आरामात जिंकण्याची अपेक्षा आहे, कारण भाजपासोबतच्या त्यांच्या नव्या युतीमुळे त्यांना निश्चितच बळकटी मिळेल. शिवाय भाजपाने नुकतंच तामिळनाडूमध्ये प्रमुख पदावरून के. अन्नामलाई यांना हटवत अण्णाद्रमुकच्या परतीचा मार्ग सोपा केला. तेव्हा आता आण्णाद्रमुक या सहयोगाच्या बदल्यात एक राज्यसभेची जागा देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

ओ. पनीरसेल्वम गटाचे चार आमदार आहेत. ते तांत्रिकदृष्ट्या राज्य विधानसभेत अण्णा द्रमुकचे सदस्य आहेत. तेदेखील पक्षाला पाठिंबा देण्याची अपेक्षा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक नियमांनुसार पडताळणीसाठी पक्षाच्या अधिकृत एजंटला मतपत्रिका दाखवल्यानंतर आमदारांना त्यांचे मतपत्र दाखवावे लागते. “अण्णाद्रमुकचे नेतृत्व दलित आणि अल्पसंख्याक समुदायातील उमेदवाराला नामांकित करण्यास सज्ज आहे”, असे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

डीएमके किंवा अण्णा द्रमुकशी युती नसल्यामुळे अंबुमणी यांच्या शक्यता धूसर दिसत आहेत. पीएमके (पट्टाली मक्कल काची) खासदार अंबुमणी रामदास यांना कोणत्याही मोठ्या द्रविड पक्षाचा पाठिंबा नसल्याने त्यांची जागा टिकवणे कठीण काम वाटू शकते. असे असूनही काही पीएमके कार्यकर्त्यांना आशा आहेत की पक्ष नेतृत्व अण्णा द्रमुकचा पाठिंबा मिळविण्यासाठी निवडणूक रणनीती आखू शकेल.
“मला याबाबत काहीही बोलायचे नाही,” असे पीएमकेचे प्रवक्ते के. बालू यांनी म्हटले आहे. अण्णा द्रमुकला अनेक माजी मंत्र्यांसह पक्षातील इच्छुकांकडून अनेक विनंत्या आलेल्या आहेत.

भाजपाबाबत बोलायचे झाले तर ते अण्णा द्रमुककडून जागा मागणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नैनार नागेंद्रन म्हणाले की, “याचा निर्णय राष्ट्रीय नेतृत्व ठरवेल. “काही सदस्यांनी द्रमुक नेतृत्वाला वायको यांची जागा कायम ठेवण्याची विनंती केली आहे. यावेळी द्रमुक दबावापुढे झुकण्याची शक्यता नाही.
द्रमुक गटातील अटकळ असे दर्शविते की, विद्यमान खासदार पी. विल्सन आणि एम मोहम्मद अब्दुल्ला पुन्हा निवडून येऊ शकतात. विल्सन यांना अलीकडेच कायदेमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकांना राज्यपालांच्या संमतीशी संबंधित प्रकरण यशस्वीपणे हाताळल्याबद्दल गौरविण्यात आले आहे. इतर संभाव्य उमेदवारांमध्ये माजी खासदार टी.के.एस. एलांगोवन आणि आर. एस. भारती तसेच पक्षाचे मुख्यालय सचिव जे. कॉन्स्टेटाइन रवींद्रन यांचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आगामी राज्यसभा निवडणुकांमुळे तामिळनाडूमध्ये मोठी राजकीय चर्चा रंगत आहे. द्रमुक आणि अण्णाद्रमुक अनुक्रमे चार आणि दोन जागा जिंकतील अशी अपेक्षा आहे. राज्यसभेची निवडणूक १९ जून रोजी होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी होईल.