नामांतराच्या विरोधातील आंदोलन मागे तर उद्या मोर्चा

रविवारच्या मोर्चासाठी अधिकाधिक संख्येने एकत्र जमण्याचे आवाहन हिंदू समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. १४ व्या दिवशी एमआयएमच्या वतीने आंदोलनास स्थगिती दिल्यामुळे दोन समाजातील संघर्ष टळेल, असा दावा करण्यात येत आहे.

AIMIM, renaming of Aurangabad, agitation, Hindu organisation , public march, imtiaz jaleel
नामांतराच्या विरोधातील आंदोलन मागे तर उद्या मोर्चा

सुहास सरदेशमुख

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

छत्रपती संभाजीनगर : सकल हिंदू जनजागरण मोर्चाच्या वतीने रविवारी ( १९ मार्च) होणाऱ्या आंदोलनात बाहेरगावाहून प्रक्षोभक भाषणे करणाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या मुळे गेली १४ दिवस सुरू असणारे नामांतर विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन स्थगित करण्याची घोषणा खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी रात्री केली.

रविवारच्या मोर्चासाठी अधिकाधिक संख्येने एकत्र जमण्याचे आवाहन हिंदू समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. १४ व्या दिवशी एमआयएमच्या वतीने आंदोलनास स्थगिती दिल्यामुळे दोन समाजातील संघर्ष टळेल, असा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, या सकल हिंदू संघटनांच्या आंदोलनाच्या नियोजनापासून ठाकरे गट चार हात दूर असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा… विरोधकांच्या एकजुटीचे भाजपपुढेच आव्हान

हेही वाचा… शिंदे गटातील प्रवेशावर परिणाम ?

शहराचे नाव छत्रपतीसंभाजीनगर करण्यात आल्यानंतर नामांतर विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला. खासदार इम्तियाज जलील यांनी या आंदोलनाचे नियोजन आणि अंमलबजावणी केली. गेल्या काही दिवसापासून निदर्शन करण्यास येणाऱ्या तरुणांची संख्याही कमी झाली होती. शुक्रवारी सायंकाळी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन शहरात अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती खासदार जलील यांनी दिली. प्रक्षोभक भाषणांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या काही नेत्यांना आमंत्रित करण्यात आले असून त्यामुळे शहरातील वातावरण खराब होईल. त्यामुळे पोलिसांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहनही खासदार जलील यांनी केले. ‘ गेली १४ दिवस सुरू असणाऱ्या आंदोलनातून नामांतरास विरोध असल्याचा संदेश दिला असून या निर्णयाच्या विरोधात न्यायालयीन लढाई कायम राहील ’ असे खासदार जलील यांनी जाहीर केले. सकल हिंदू संघटनांच्या वतीने आयोजित आंदोलनानंतर छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ प्रपत्र भरुन घेतले जाणार आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-03-2023 at 15:32 IST
Next Story
विरोधकांच्या एकजुटीचे भाजपपुढेच आव्हान
Exit mobile version