सुहास सरदेशमुख

औरंगाबाद: माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासाठीऔरंगाबाद येथील चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये ५२ भूखंडाच्या वापराचे हेतू बदलून देण्यासाठी उद्योजकांकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये कमावल्याचा आरोप खासदार इत्मियाज जलील यांनी केला. राज्यात अशा प्रकारे ३२ हजार हेक्टरावरील औद्योगिक वसाहतीचे वापराचे हेतू बदलण्यात आल्याचा दावा त्यांनी के. पी. बक्षी यांच्या अहवालाच्या आधारे केला. ही समिती मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी नेमली होती. औरंगाबादच्या प्रकरणात सुमारे १०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा घोटाळा झाला असावा त्यामुळे त्यांची विशेष तपास यंत्रणेमार्फत चौकशी करावी असा आरोप खासदार जलील यांनी केला.

‘कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप विधिमंडळात गाजत असताना जलील यांनी केलेले आराेपाची वेळ हा योगायोग मानायचा का, या प्रश्नाचे उत्तर त्यांनी गोल फिरवून दिले. ते म्हणाले, ‘ मी एका प्रकरणातील भ्रष्टचार पुढे आणला आहे. विधिमंडळात अजित पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे हे नेते आवाज उंचावत आहेत. तेव्हा त्यांनी या प्रकरणातही विशेष तपास यंत्रणा नेमावी. नाही तर भ्रष्टाचार चालूच द्यावा.’

हेही वाचा: भाजप-एमआयएममधील श्रेयवादात धुळ्यातील रस्त्यांचे भाग्य उजळणार

औरंगाबाद शहरातील ५२ भूखंडाचे औद्योगिक वापराचे हेतू बदलून ते भूखंड व्यापारी आणि निवासी स्वरुपाची करण्यास प्रत्येक भूखंडा मागे दोन कोटी रुपये घेतले जायचे हे काम त्यांचा मुलगा करत हाेता, अशी आपली माहिती आहे. पण या अनुषंगाने आपण कोणाकडही तक्रार केलेली नाही. अथवा पत्रव्यवहारही केला नाही. केवळ महाराष्ट्रातील विधिमंडळात गैरव्यवहाराची चर्चा सुरू असल्याने हाही एक भ्रष्टाचार समोर ठेवावा म्हणून काही कागदपत्रे उद्योग विभागाकडे मागिविली होती. तीन स्मरण पत्रे देऊनही ती माहिती मिळाली म्हणून आहे त्या माहितीच्या आधारे बोलत असल्याचे ते पत्रकार बैठकीत म्हणाले.

हेही वाचा: ओबीसींच्या मुद्द्यावर योगी आदित्यनाथ यांना धक्का; नितीशकुमार यांची आघाडी

हेतू बदलण्यासाठी राज्यांच्या मंंत्र्यांना अधिकार असतात मात्र त्याचे प्रमाणा पाच ते दहा टक्के असल्यास हरकत नसते. पण अधिकाराचा सरसकट उपयोग करणे चुकीचे असल्याचे के. पी. बक्षी यांच्या अहवालात नमूद असल्याचेही खासदार जलील म्हणाले. सुभाष देसाई यांच्यावरील खासदार जलील यांच्या आरोपाचे अर्थ राजकीय पटलावरील सत्तार यांच्या आरोपाशी जोडून पाहिले जात आहेत. ज्या ५२ भूखंडाची यादी जलील यांनी पत्रकार बैठकीनंतर पत्रकारांना दिली. त्यातील एकाही उद्योजकांचे नाव घेऊन बोलण्यास खासदार जलील तयार नव्हते.

हेही वाचा: फक्त शिंदे गटाचेच मंत्री वादग्रस्त कसे ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खासदार जलील हे नेहमीच ‘ ब्लॅकमेल’ करण्यासाठी आरोप करत असतात, त्यांनी या पूर्वी केलेल्या आरोपात तर कधीच तथ्य आढळून आलेले नाही. त्यामुळे शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे आहेत.’ – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेता विधान परिषद