आतापर्यंतच्या लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वात कमी ९ मतांनी दोन उमेदवार विजयी झाले आहेत. त्याच वेळी सर्वाधिक मताधिक्य हे ६ लाख, ९६ हजार एवढे आहे. सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा इतिहास बीडच्या प्रीतम मुंडे यांनी रचला होता. १९६२ पासून सर्वात कमी मतांनी विजयी झालेले उमेदवार : १९६२ : रिशांक किशिंग – मणिपूर (सोशालिस्ट पार्टी) : ४२ मते
१९६७ : एम. राम – हरयाणा (काँग्रेस) : २०३ मते
१९७१ : एम. एस. सिवास्वामी – तमिळनाडू (द्रमुक) : २६ मते
१९७७ : दाजीबा देसाई – कोल्हापूर , महाराष्ट्र (शेकाप) : १६५ मते
१९८० : रामनयम राम – उत्तर प्रदेश ( काँग्रेस) : ७७ मते
१९८४ : मेवा सिंग – पंजाब (अकाली दल) : १४० मते
१९८९ : के. रामकृष्ण – आंध्र प्रदेश (काँग्रेस) : ९ मते
१९९१ : राम अवध – उत्तर प्रदेश (जनता दल) : १५६ मते
१९९६ : सत्यजितसिंह गायकवाड – गुजरात (काँग्रेस) : १७ मते
हेही वाचा : Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट
१९९८ : सोम मरांडी – बिहार (भाजप) : ९ मते
१९९९ : प्यारेलाल शंकवार – उत्तर प्रदेश ( बसपा) : १०५ मते
२००४ : डॉ. पी. पुखनीकोया – लक्षद्विप ( जनता दल-युनायटेड) : ७१ मते
२००९ : नरो नारायण – राजस्थान (काँग्रेस) : ३१७ मते
२०१४ : टी. चेवांग – लडाख (भाजप) : ३६ मते २०१९ :
भोलेनाथ – उत्तर प्रदेश (भाजप) : १८१ मते
(संकलन : संतोष प्रधान)