तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत तर काही नेत्यांना अटकही झाली. या विषयावरून विरोधकांनी तृणमूल काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. तर तृणमूलच्या नेत्यांकडूनही पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पक्षाच्या दुटप्पी भूमिकेबाबत जाब विचारताना तृणमूलचे नेते म्हणाले की, एकाबाजूला अनुब्रता मोंडल (Anubrata Mondal) आणि माणिक भट्टाचार्य (Manik Bhattacharya) यांना एक न्याय आणि दुसऱ्या बाजूला पार्थ चॅटर्जी (Partha Chatterjee), कुंतल घोष (Kuntal Ghosh) आणि शंतनू बॅनर्जी (Shantanu Banerjee) व इतरांना दुसरा न्याय का?

टीएमसीचे वरिष्ठ आणि वजनदार नेते पार्थ चॅटर्जी यांना शाळेत नोकरी देण्याच्या घोटाळ्यात मागच्यावर्षी जुलैमध्ये ईडीने अटक केली. ही अटक झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी चॅटर्जी यांच्यापासून अंतर तर ठेवलेच त्याशिवाय त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी केली आणि पक्ष सदस्यत्वही काढून घेतले. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी युवा नेते कुंतल घोष आणि शंतनू बॅनर्जी यांनाही शाळेतील नोकरी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने अटक केली. तेव्हाही पक्षातून या दोघांची हकालपट्टी करण्यात आली.

पिंपरी : मावळमध्ये विरोधात काम करणाऱ्या नेत्यांवर होणार कारवाई; भाजप नेत्याचा इशारा
PM narendra Modi about changing Constitution India Bloc Rahul Gandhi loksabha election 2024
“स्वत: आंबेडकर आले, तरी घटना बदलू शकत नाही”; या निवडणुकीत राज्यघटनेच्या मुद्यावरून एवढा वादंग का होतोय?
Manifesto of Samajwadi Party released
हमीभावासाठी कायदा करण्याचे आश्वासन; समाजवादी पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित
aap party leader aatishi
‘आप’च्या नेत्या आतिशी यांना नोटीस; भाजपवर केलेल्या आरोपांबाबत उत्तर देण्याचे निर्देश

मात्र विरोधाभास असा आहे की, टीएमसीचे बिरभूम जिल्ह्याचे अध्यक्ष अनुब्रता मोंडल ऊर्फ केस्टो यांना सीबीआयने गुरांच्या तस्करीप्रकरणात मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अटक केल्यानंतर ममता बॅनर्जी मोंडल यांच्या समर्थनार्थ उतरल्या. भाजपा केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असून प्रमुख विरोधी पक्षांना लक्ष्य केले जात आहे, असा आरोप बॅनर्जी यांनी केला. कोलकाता येथील नेताजी बोस इनडोअर स्टेडियममध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बॅनर्जी म्हणाल्या की, जेव्हा मोंडल तुरुंगातून बाहेर येतील, तेव्हा त्यांचे जोरदार स्वागत केले जाईल.

यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या, “त्यांना (भाजपाला) असे वाटत असेल की केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून दोन लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी त्यांना मदत होईल, तर ते चूक करत आहेत. प्रत्येक निवडणुकीत त्यांना रोखण्यासाठी काहीतरी मार्ग शोधून काढला जातो. केस्टो यांना रोखल्याने विजयाची शक्यता वाढेल, असे त्यांना वाटते. जे लोक याठिकाणी बिरभूम येथून आले आहेत. त्यांनी केस्टो बाहेर येईपर्यंत निकराने लढा द्यावा आणि जेव्हा केस्टो बाहेर येतील तेव्हा त्यांचे एखाद्या नायकाप्रमाणे जल्लोषात स्वागत करावे.”

मोंडल यांना पाठिंबा देण्याची ममता बॅनर्जींची भूमिका अगदी स्पष्ट आहे. केंद्रीय यंत्रणांनी टीएमसी नेत्यांविरोधात निर्दयपणे कारवाई केल्यानंतर पक्ष संघटनेचे मनोधैर्य खचलेले आहे. मोंडल हे ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मानले जातात. बिरभूम जिल्ह्याचे वजनदार नेते असण्यासोबतच त्यांचा आजूबाजूच्या जिल्ह्यांवरदेखील चांगला प्रभाव आहे. एका वरिष्ठ टीएमसी नेत्याने सांगितले की, अनुब्रता मोंडल हे पक्षातील अतिशय वरिष्ठ संघटक आहेत. पक्षाला त्यांना गमवायचे नाही. ममता बॅनर्जी यांना सुरुवातीला वाटले की, एक किंवा दोन महिन्यात मोंडल यांना जामीन मिळेल. पण आता त्यांना कळून चुकलंय की जामीन मिळणार नाही. त्यामुळे मोंडल यांच्यापासून त्या हळूहळू दूर जावू लागल्या आहेत. मात्र राजकीय अपरिहार्यतेमुळे मोंडल यांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करणे शक्य होत नाही आहे.

पण टीएमसीच्या एका गटाला ही बाब रुचलेली नाही. पक्षाने शालेय सेवा आयोगाचे माजी अध्यक्ष माणिक भट्टाचार्य यांना काढून का नाही टाकले? असा प्रश्न हे नेते विचारत आहेत. एका ज्येष्ठ टीएमसी नेत्याने सांगितले की, ज्या नेत्यांवर केंद्रीय यंत्रणा कारवाई करतील, ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोकड प्राप्त होईल, त्या नेत्यांवर कारवाई करण्याचे पक्षाने धोरण आखले आहे. कारण काय? तर भ्रष्ट प्रकरणे बरी दिसत नाहीत. पण हाच न्याय माणिक आणि अनुब्रता यांच्यासारख्या नेत्यांना का लागू होत नाही? त्यांच्यावरदेखील केंद्रीय यंत्रणेने कारवाई केली आहे. तरीही त्यांच्यावर पक्षाने कारवाई न करता फक्त त्यांच्यापासून अंतर राखले जात आहे. गरज भासलीच तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. माणिक भट्टाचार्य यांना जर पक्षातून काढले तर ते अपक्ष निवडणूक लढवतील, जे पक्षाला नको आहे.

विरोधकांना तर हा मुद्दा आयताच मिळाला. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याची संधी सोडली नाही. टीएमसीच्या भ्रष्ट नेत्यांबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. भाजपा नेते सामिक भट्टाचार्य म्हणाले की, अनुब्रता हे टीएमसीचे पोश्टर बॉय असून पक्षाचा मुखवटादेखील आहेत. टीएमसी म्हणजेच अनुब्रता, असे समीकरणच आहे. म्हणून त्यांच्यावर काहीच कारवाई होणार नाही. भाकप (एम) नेते सुजन चक्रबर्ती म्हणाले की, टीएमसीने कुणालाचा पक्षातून बाहेर काढलेले नाही. त्यांनी फक्त आरोपी नेत्यांना निलंबित केले आहे. तसेच टीएमसी मोंडल यांना निलंबितही करू शकणार नाही. कारण टीएमसी त्यांना घाबरते, हे सर्वांना माहीत आहे.