बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अलीकडेच भाजपाशी युती तोडून राष्ट्रीय जनता दलासोबत सरकार स्थापन केलं आहे. भाजपाशी काडीमोड घेतल्यानंतर ते भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर राजकीय खेळी करण्याचा प्रयत्न करत आहेत. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतंच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वात देशाने प्रचंड प्रगती केली, असं विधान नितीश कुमारांनी केलं.

वाजपेयींच्या जयंतीनिमित्त सरकारी कार्यक्रमाला संबोधित करताना नितीश कुमारांनी आठवणींना उजाळा दिला. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी माझा नेहमी आदर करायचे आणि आमच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते, असंही ते म्हणाले.

या कार्यक्रमात वाजपेयींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर नितीश कुमार म्हणाले, “अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वात देशाने खूप प्रगती केली. त्यांनी मला तीन खात्यांचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. जेव्हा मी त्यांच्याकडे कोणताही प्रस्ताव घेऊन जायचो, तेव्हा ते त्याला होकार द्यायचे. त्यांनी माझं नेहमीच कौतुक आणि आदर केला. ते खूप प्रेमळ होते. ”

हेही वाचा- “गोडसेचा गवगवा, लव्ह जिहाद ते हिंदूंनी शस्त्र बाळगावे” प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या वक्तव्यामुळे भाजपाची अडचण?

खरं तर, २०१९ पासून बिहार सरकार वाजपेयींची जयंती सरकारी कार्यक्रम म्हणून साजरी करत आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचं बिहारमधील राजकीय महत्त्व नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या चांगल्याप्रकारे लक्षात आलं आहे. वाजपेयींच्या नेतृत्वाखालील भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा यांची नितीश कुमारांनी पहिल्यांदाच तुलना केली, असं नाही. ऑगस्टमध्येही भाजपाशी युती तोडताना नितीश कुमारांनी “दोन भाजपा” असा उल्लेख केला होता.

हेही वाचा- Sahibzade martyrdom : ‘वीर बाल दिवस’ साजरा करणे म्हणजे इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा कट – ‘एसजीपीसी’चा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जनता दल संयुक्तच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितलं की, नितीश कुमार यांनी नेहमीच वायजपेयींचं कौतुक केलं आहे. कारण ते त्यांच्याच पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात राजकीय उंचीवर गेले. नरेंद्र मोदींवर मात करण्यासाठी ते आता वाजपेयींचा राजकीय प्रतीक म्हणून अधिक वापर करत आहेत.