काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांनी पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख आणि राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांच्या निधनावर ट्वीटद्वारे भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी परवेज मुशर्रफ कधीकाळी भारताचे कट्टर शत्रू होते, मात्र नंतर ते शांततेची खरी ताकद बनले. असे म्हटले आहे. यावरून भाजपाने त्यांच्यावर टीका केली आहे. भाजपाने आरोप केला आहे की, शशी थरूर यांनी कारगिल युद्धासाठी जे कारणीभूत होते त्यांची स्तुती केली आहे.

शशी थरूर ट्वीटद्वारे म्हणाले आहेत की, “पाकिस्तानेच माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांचे दुर्धर आजाराने निधन झाले. परवजे मुशर्रफ कधीकाळी भारताचे कट्टर शत्रू होते. मात्र ते २००२-२००७ मध्ये शांततेची प्रत्यक्ष ताकद बनले होते. मी त्या दिवसांमध्ये संयुक्त राष्ट्रात दरवर्षी त्यांना भेटायचो. ते आपल्या धोरणात्मक विचारांबाबत हुशार आणि स्पष्ट वाटले.”

यावर केंद्रीयमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी निशाणा साधत म्हटले की, “काँग्रेसच्या एका माजी परराष्ट्र राज्यमंत्र्यांना वाटते की, एक पाकिस्तानी जनरल ज्याने दहशतवाद पसरवला, पाठीत खंजीर खुपसला आणि प्रत्येक आंतरराष्ट्रीय नियामचे उल्लंघन करून आमच्या सैनिकांना हानी पोहचवली. तो शांततेची प्रत्यक्ष ताकद बनला.”

याशिवाय थरूर यांच्या ट्वीटला टॅग करून भाजपा प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी म्हटले की, “कारगील युद्धाचे करतेधरते परवेज मुशर्रफ हे तानशाह, जघन्य गुन्ह्यांमधील आरोपी होते. ज्यांनी तालिबान आणि ओसामा लादेनला भाऊ आणि नायक मानले होते. ज्यांनी आपल्याच सैनिकांचे मृतदेहही परत घेण्यास नकार दिला होता. मात्र काँग्रेसने त्यांची स्तुती केली. तसेच, एकदा मुशर्रफ यांनी एक सज्जन व्यक्ती समजून राहुल गांधी यांची सज्जन व्यक्तीच्या रुपात प्रशंसा केली होती.” असंही पूनावाला यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कारगिल युद्धाचा कट रचला –

एप्रिल ते जून १९९९ दरम्यान भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान कारगिल येथे युद्ध झाले. या युद्धाच्या वेळी परवेज मुशर्रफ चर्चेत आले. त्यावेळी ते पाकिस्तानचे लष्कर प्रमुख होते. सुरुवातीला कारगिल युद्धाची माहिती मुशर्रफ यांनी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यापासूनही लपवून ठेवली होती. जिहादींच्या वेशात पाकिस्तानी सैन्यांनी सीमा ओलांडल्यानंतरही मुशर्रफ यांनी हे रहस्य कुणालाच सांगितले नाही. जेव्हा पाकिस्तानी सैन्य कारगिलच्या टोकावर पोहोचले, तेव्हा कुठे मुशर्रफ यांनी याची माहिती पंतप्रधानांना दिली. तरिही महत्त्वाचे तथ्य लपवून ठेवण्यात आले होते. जिहादींच्या वेषात सैन्यांना पाठविल्यानंतर भारतीय गुप्तचर यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी एलओसीच्या नजदीक रेडिओवर खोटे संदेश पाठविण्यात येत होते. हे संदेश बाल्टी आणि पश्तो भाषेमध्ये असायचे. त्यावेळी एलओसीवरील सर्वच दहशतवादी आणि पाकिस्तानी सैन्य याच दोन भाषांमध्ये संवाद साधायचे.