बिहारच्या विधिमंडळाचे सभापती असलेल्या विजय कुमार सिन्हा यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर काही तासांच्या अंतराने त्यांची नियुक्ती विरोधी पक्ष नेता म्हणून करण्यात आली. या पदासाठी चर्चेत असलेल्या दोन माजी उप मुख्यमंत्री, तरकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांना बगल देत देत ही नियुक्ती झाली.  

सिन्हा यांना भाजपाने देऊ केलेली नवीन जबाबदारी पाहता आश्चर्य वाटू नये. विधीमंडळाच्या कामकाजादरम्यान मुख्यमंत्री आणि जनता दल (संयुक्त) प्रमुख नीतिश कुमार यांच्या समवेत त्यांची शाब्दिक चकमक सर्वांनाच ठाऊक आहे. अगोदरच्या विधीमंडळ सत्रात तर नीतिश यांचा मित्रपक्ष भाजपा होता. उच्चवर्णीयांचा टक्का अधिक असलेल्या मुख्य मतदार संघात आपली पकड मजबूत करण्यासाठी भाजपाने सिन्हा यांची नियुक्ती केली आहे. चार वेळा आमदार असलेले सिन्हा ही लखीसराईचे उच्चवर्णीय भूमीहार नेते आहेत.

त्याचप्रमाणे भाजपाने नवल किशोर यादव यांच्या जागी विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते म्हणून ओबीसी कुशवाह नेते आणि माजी मंत्री सम्राट चौधरी यांनी निवड करण्यात आली. आता भाजप सात पक्षांचा समावेश असलेल्या सत्ताधारी महागठबंधन २.० च्या विरोधात उभा राहिला आहे. सत्ताधाऱ्यांना विविध जाती-गटांचा पाठिंबा असल्याने त्यांचे सामाजिक संयोजन अभेद्य बनले आहे. भाजपा सक्षम नेत्याच्या शोधात होती. महागठबंधनमधून कुशावह मतं वळवण्याची त्यांची योजना आहे. नितीश यांच्या मूळ ओबीसी कोएरी-कुर्मी मतदारसंघाचे विभाजन करण्यासाठी भाजपने सम्राट यांना बढती दिल्याचे सूत्रांकडून समजते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“विजय कुमार सिन्हा आणि सम्राट चौधरी यांची निवड भाजपाने अतिशय विचारपूर्वक केली आहे. दोन्ही नेते राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करत होते. त्यांना जनतेचे चांगले पाठबळ आहे. सर्वसामान्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी दोघंही सत्ताधारी सरकारवर चांगला दबाव आणतील”, अशी माहिती बिहार भाजपा प्रवक्ते आणि माजी-आमदार मनोज शर्मा यांनी दिली.