संतोष प्रधान

मुंबई : बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कारवाई करावी म्हणून तेव्हा मागणी करणाऱ्या भाजपने आता याच कृपाशंकर सिंह यांना उत्तर प्रदेशमधील जौनपूर मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.

anurag thakur statement on rahul gandhi
“राहुल गांधींचं लग्न झालं नाही, म्हणून तुमच्या मुलांची संपत्ती ते…”, अनुराग ठाकूर यांचं विधान
Shobha Bachhav, Congress workers sloganeering,
डॉ. शोभा बच्छाव यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
hema malini and yogi
‘काँग्रेसचे मानसिक संतुलन ढळले’; हेमा मालिनी यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधानांनंतर भाजपची टीका
Mahua Moitra
उमेदवारी जाहीर होताच महुआ मोईत्राना झटका; ईडीकडून मनी लाँडरिंगचा खटला दाखल

कृपाशंकर सिंह काँग्रेसमध्ये असताना भाजपने त्यांच्या विरोधात आघाडी उघडली होती. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कृपाशंकर सिंह यांच्या विरोधात कारवाई व्हावी म्हणून भाजपने मागणी केली होती. कृपाशंकर सिंह यांच्या विरोधात लढा देणाऱ्या संजय तिवारी यांना भाजपने पडद्याआडून मदत केल्याची तेव्हा चर्चा होती. कृपाशंकर सिंह यांच्या विरोधात खटला दाखल करण्यासाठी तत्कालीन विधानसबा अध्यश्र दिलीप वळसे-पाटील यांनी नकार दिला असता या विरोधात आवाज उठविण्यात तत्कालीन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे आघाडीवर होते. विशेष म्हणजे याच विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत कृपाशंकर सिंह यांची उमेदवारी जाहीर केली!

आणखी वाचा-पीएम मोदींच्या भेटीपूर्वीच ओडिशामध्ये राजकीय चर्चांना उधाण; बीजेडी-भाजपा पुन्हा युती होणार का?

केंद्र व राज्यात सत्ताबदल होताच कृपाशंकर सिंह हे भाजप नेत्यांच्या जवळ गेले होते. केंद्रातील भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने कृपाशंकर सिंह यांना बरीच मदत केल्याची तेव्हा चर्चा होती. राज्यात भाजपची सत्ता असताना कृपाशंकर सिंह यांच्या विरोधात खटल्यात सरकारी पक्षाने काहीशी नमती भूमिका घेतल्याची कुजबूज तेव्हा होती. पुढील काळात कृपाशंकर सिंह यांची बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. २०१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कृपाशंकर सिंह यांनी भाजपमध्ये प्र‌वेश केला होता. भाजप आणि शिवसेनेची तेव्हा युती झाल्याने कृपाशंकर सिंह यांची मुंबईत भाजपला तेव्हा तेवढी उपयुक्तता वाटली नाही. युती तेव्हाच तुटली असती तर कृपाशंकर सिंह यांचा उत्तर भारतीय मतांसाठी वापर करून घेण्याची भाजपची योजना होती, असे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले. विधान परिषदेच्या मुंबई स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून भाजपने कृपाशंकर सिंह यांच्याऐवजी काँग्रेसमधून आलेले दुसरे नेते राजहंस सिंह यांना आमदारकीची संधी दिली. तेव्हाच कृपाशंकर सिंह यांना पक्षात फारसे महत्त्व मिळणार नाही, असा संदेश गेला होता. कृपाशंकर सिंह हे काँग्रेसमध्ये असताना जसे सक्रिय किंवा प्रसिद्धीच्या झोतात असायचे तसे भाजपमध्ये प्रवेश केल्यावर फारसे प्रसिद्धीत नव्हते. मुंबईत लोकसभा किंवा विधानसभेची उमेदवारी मिळावी, असा त्यांचा प्रयत्न होता. पण मुंबईत उमेदवारी मिळण्याबाबत साशंकता असल्याने त्यांनी गेले वर्षभर जौनपूर या आपल्या मूळ गावी अधिक लक्ष केंद्रित केले होते.

आणखी वाचा-योगी मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार; कोणाला संधी मिळणार?

जौनपूर हा यादवबहुल मतदारसंघ असल्याने कृपाशंकर सिंह यांच्यासाठी लढत चुरशीची असेल. २०१९ च्या निवडणुकीत बहुजन समाज पक्षाचे शामसिंह यादव हे सुमारे ८० हजार मतांनी विजयी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या लोकप्रियतेचा फायदा उठविण्याचा कृपाशंकर सिंह यांचा प्रयत्न असेल.