नागपूर:युद्ध विरामानंतर प्रथमच महाराष्ट्राच्या भेटीवर येत असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारपासून दोन दिवस नागपुरात आहेत. रविवार पासून त्यांचा दौरा सुरू होत असून. त्तो सरकारी आहे. विशेष म्हणजे शहा यांचे कार्यक्रम सोमवारी असले तरी ते आदल्या दिवशी रविवारी रात्री नागपुरात दाखल होत असून येथे त्यांचा मुक्काम आहे. त्यामुळे ते या काळात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी राज्यातील विद्यमान परिस्थितीवर चर्चा करू शकतात. संघाचा प्रशिक्षण वर्ग नागपुरात सुरू आहेत. त्यानिमित्ताने संघाचे वरिष्ठ पदाधिकारी येथे आहेत. त्यांचीही भेट शहा घेऊ शकतात. त्यामुळे हा दौरा सरकारी असला तरी त्याला राजकीय महत्त्व आहे.

शहा यांच्या स्वागताची नागपूर भाजपने केलेली जय्यत तयारी लक्षात घेता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहा स्थानिक नेत्यांना कोणता कानमंत्र देतात या कडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. केंद्रीय गृहंमंत्री अमित शहा यांचे रविवारी रात्री ९.१५ वाजता आगमन होणार आहे. त्यांचा येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम असणार आहे. हे हॉटेल केंद्रीय महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील निवासस्थानाला लागून आहे. त्यांचा पूर्णवेळ राखीव आहे. दुसऱ्या दिवशी त्यांचे दोन कार्यक्रम आहे. पहिला कार्यक्रम नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये एका इमारतीचे उद्घाटन शहा यांच्या हस्ते होणार आहे. हे इस्पितळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून ट्रस्टच्या माध्यमातून उभारण्यात आले आहे. विशेष म्हणजे २०२३ मध्ये इस्पितळाच्या उद्घाटनाला अमित शहा येणार होते. पण ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाला होता, त्यामुळे ते आता तेथे येत असल्याचे सांगितले जाते.

३० मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नागपूर दौ-यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेडगेवार स्मृती भवनाला भेट दिली होती. याच दिवशी संघाच्याच एका संस्थेच्या कार्यक्रमात मोदी आणि सरसंघचालक डॉ मोहन भागवत एकाच व्यासपीठावर होते. . ज्या रूग्णालयात शहा जाणार आहेत ती संस्था संघाशी संबधित आहे. त्यामुळे शहा यांना राखीव वेळेत राज्यातील भाजप व संघाचे पदाधिकारी भेटण्याची शक्यता आहे. सध्या रेशीमबागेत संघ स्वयंसेवकांचा प्रशिक्षण वर्ग सुरू असून त्यानिमित्ताने संघाचे वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी नागपुरात आहेत. त्यामुळे ऐनवेळी शहा प्रशिक्षण वर्गाला भेट देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहा यांच्या दौ-यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या सोबत राहणार आहेत तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूरचे पालकमंत्री म्हणून दौ-यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे या नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विषयी चर्चा होऊ शकते. दोनच दिवसांपूर्वी नागपूर मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मेळावा झाला. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराने स्वबळावर निवडणुका लढण्याची मागणी केली. त्यामुळे महायुतीत वाद होतात की काय?अशी चर्चा सुरू झाली आहे. या सर्व गोष्टी अमित शहा यांच्या कानवर टाकून त्यांचा सल्ला घेतला जाण्याची शक्यता आहे.