सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) ने नुकताच जारी केलेल्या आकडेवारी नुसार देशातील बेराजगारीचा दर वाढला असून यावरून विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी ट्वीट करत देशातील युवकाच्या हक्काच्या नोकऱ्या हिसकावून घेण्यात मोदी सरकार ‘विश्वगुरू’ झाले आहे, असं ते म्हणाले.

हेही वाचा – “देशाच्या नव्या राष्ट्रपित्यांनी काय केलं?” अमृता फडणवीसांच्या विधानाचा आधार घेत नितीशकुमारांची मोदींवर खोचक टीका

सीएमआयईने नुकताच देशातील बेरोजगारीबाबत आकडेवारी जाहीर केली असून डिसेंबरमध्ये देशात ८.३ टक्क्यांसह सर्वाधिक बेरोजगारी दर नोंदवण्यात आला आहे. तसेच २०२२ या वर्षात नोव्हेंबरमध्ये ८ टक्के, सप्टेंबरमध्ये ६.४३ टक्के आणि ऑगस्टमध्ये ८.२८ टक्के इतका बेरोजगारी दर होता, असेही या अहवालातून सांगण्यात आलं आहे. याचबरोबर देशातील शहरी भागांमध्ये १० टक्के, तर ग्रामीण भागात ७.५ टक्के बरोजगारी दर असल्याचेही सीएमआयईने म्हटलं आहे. दरम्यान, राज्याच्या विचार केला तर, डिसेंबरमध्ये सर्वाधिक बेरोजगारी दर हरियाणात (३७.४ ) नोंदवण्यात आला असून राजस्थानमध्ये २८.५ टक्के, दिल्लीत २०.८ टक्के, बिहारमध्ये १९.१ टक्के आणि झारखंडमध्ये १८ टक्के बेराजगारी दर असल्याचे या अहवालातून सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा – त्रिपुरा विधानसभा निवडणूक: भाजपाकडून ‘रथयात्रे’ची घोषणा

सीएमआयई प्रसिद्ध केल्या आकडेवारीनंतर विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला असून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी ट्वीट करत केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्र सोडले आहे. “देशात बरोजगारीचा दर ८.३ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून शहरी भागात हेच प्रमाण १० टक्के आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षाला दोन कोटी रोजगार निर्मिती करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता देशातील युवकाच्या नोकऱ्या हिसकावून घेण्यात मोदी सरकार ‘विश्वगुरू’ झाले आहे”, असे ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिला काँग्रेसच्या अध्यक्षा एन. डिसूजा यांनीही मोदी सरकारवर टीका केली असून सरकारने देशात लागू केलेल्या चुकीच्या धोरणामुळे उद्योग-व्यापार बंद पडल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे पोकळ आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारने तरुणांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.