मुंबई : अटल सेतू, सागरी मार्ग, आरे कारशेड, मेट्रो तीन अशा मोठ्या प्रकल्पांत टाकण्यात आलेले गतीरिोधक (स्पीडब्रेकर) आम्ही दूर केले. नाहीतर हे प्रकल्प पुढील १५ वर्षांत पूर्ण झाले नसते, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केली.

वरळी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. वरळीतील ‘स्पॅन’ विस्ताराचा प्रश्न सोडविण्यास महाविकास आघाडी सरकारने असमर्थता दाखवली होती. महायुती सरकारने हा प्रश्न तातडीने सोडविला. प्रेम नगर, सिद्धार्थ नगर, बी. डी. डी. चाळ, पोलीस वसाहती. कोळीवाडा विकास, धोकादायक इमारतींचा प्रश्न, मुंबईत रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी सात विविध संस्था काम करीत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. देवरा यांनी या भागाचे लोकसभेत दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. गेल्या दहा वर्षांत वरळीकरांना न्याय मिळाला नाही.

हेही वाचा >>>रश्मी शुक्लांना हटवण्यास एवढा वेळ का लागला? नाना पटोले यांचा सवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरळीकरांना न्याय देण्यासाठी देवरा यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून देवरा काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवडणुका आल्या की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार अशी एक टेप लावली जाते मात्र ही टेप आता जास्त काळ चालणार नाही, असा टोला त्यांनी ठाकरे पिता-पुत्रांना लगावला.