कराड : लोकसभेच्या सातारा मतदारसंघातील उमेदवारांची नावे वाढतच चालली आहेत. विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी आपले जिवलग मित्र शरद पवार यांची सोबत कायम ठेवली आहे. तर, दुसरीकडे ‘राष्ट्रवादी’मधून नितीन पाटील यांचे तर भाजपमधून खासदार उदयनराजे भोसले यांची नावे आघाडीवर असतानाच माथाडी कामगार व आजी-माजी सैनिकांनीही आपल्या नेत्यांची नावे पुढे केली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून लोकसभेची सातारा व कराडचीही जागा मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात टाकून शरद पवार यांना बळ दिले. परंतु, अलीकडेच झालेल्या शिवसेना व राष्ट्रवादीतील दुहीमुळे साताऱ्यात विलक्षण चित्र पहावयास मिळत आहे.

हेही वाचा >>> कोल्हापूरसाठी सांगलीचा बळी नको, काँग्रेस नेत्यांचे नेतृत्वाकडे आर्जव

Lok Sabha Elections Union Minister Jitendra Singh from Udhampur Constituency in Jammu Congress challenge to him
जितेंद्र सिंह यांच्यापुढे एकत्रित विरोधकांचे आव्हान
ramdas tadas
‘‘हे एकदाचं थांबवा,” रामदास तडस यांना भाजप नेत्यांचा निर्वाणीचा इशारा
Thackeray group, Gaikwad,
कल्याणमध्ये ठाकरे गट आणि गायकवाड समर्थक छुप्या युतीच्या चर्चा ? भाजप आमदारांचा शिंदेंना पाठींबा, आमदार पत्नी मात्र ठाकरेंच्या उमेदवारासोबत
devendra fadnavis
इंदापूरमधील नाराजीवर मनोमीलन सभेचा उतारा; देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मेळावा

या मतदारसंघात सर्वाधिक दोन विधानसभा सदस्य शिवसेनेचे असल्याने येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेलाही मोठे महत्त्व आहे. तर, भाजपाचा एक विधानसभा अन् एक राज्यसभा सदस्य असून, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक विधानसभा सदस्य आणि शरदचंद्र पवार पक्षाचा लोकसभेचा व विधानसभेचा प्रत्येकी एक-एक सदस्य आहे. काँग्रेसचे बळ केवळ एकच राहिले असून, काँग्रेस वगळता शरदचंद्र पवार पक्ष, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मर्यादित ताकद असलेल्या रिपाइं आठवले गटानेही उमेदवारीसाठी दावा केला आहे. यापूर्वी भाजप शिवसेना युतीतून शिवसेनेकडून राष्ट्रवादीच्या उदयनराजे भोसले यांच्या विरोधात अतिशय आक्रमकपणे लढलेले माथाडी कामगारांचे नेते आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्या उमेदवारीसाठी माथाडी कामगार एकवटले आहेत.

हेही वाचा >>> सोलापुरात भाजपच्या उमेदवारीवरून चुरस वाढली; आजी-माजी खासदारांसह अनेक इच्छूक

लोकसभेच्या सातारा मतदारसंघात माथाडींची हजारो कुटुंबे असून, लाखो मतदार असल्याचा माथाडी नेत्यांचा दावा आहे. तर, दुसरीकडे मिलिटरी अपशिंगे (ता. सातारा) येथे झालेल्या भव्य सैनिक निर्धार मेळाव्यात साताऱ्यातून सैनिक खासदार करायचाच असा निर्धार करण्यात आला. त्यात जिल्ह्यात आजी-माजी व शहीद जवानांची संख्या ८० हजार असून, त्यांच्या कुटुंबातील मतदान सव्वातीन लाख असताना आमच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना निर्धार मेळाव्यातून व्यक्त झाली. सातारा जिल्हा सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष प्रशांत कदम यांचे नाव अपक्ष उमेदवार म्हणून पुढे करण्यात आले. सातारा मतदार संघातून इच्छुक उमेदवारांमध्ये दिग्गजांची नावे चर्चेत येत आहेत. शरदचंद्र पवार पक्षातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील. त्यांचे पुत्र उच्च विद्याविभूषित युवानेते सारंग पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे. भाजपामधून खासदार उदयनराजे भोसले, अण्णासाहेब पाटील मराठा आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नामदार नरेंद्र पाटील. शिवसेनेतून पुरुषोत्तम जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसमधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, रिपाइं आठवले गटातून अशोकराव गायकवाड अशा इच्छुकांची यादी असून, त्यात आणखी भर पडण्याची चिन्हे आहेत.