गुजरात विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा, काँग्रेस तसेच आप अर्थात आम आदमी पक्षाकडून पूर्ण ताकदीने प्रयत्न केला जात आहे. येथील कटरगाम मतदारसंघातील निवडणूक चांगलीच रंजक ठरणार आहे. जातीय समीकरणे, निवडणूक लढणारांची संख्या यामुळे या जागेवरील लढत अटीतटीची होण्याची शक्यता आहे.

कटरगाम हा मतदारसंघ सध्या भाजपाच्या हातात आहे. सध्या शहर विकास आणि गृहनिर्माण मंत्री विनोद मोरडिया या मतदारसंघाचे आमदार आहेत. मोरडिया हे पाटीदार समाजाचे आहेत. भाजपाने या जागेवर अद्याप अधिकृत उमेदवाराची घोषणा केलेली नाही. तर काँग्रेसने या जागेसाठी कल्पेश वारिया यांना उमेदवारी दिली आहे. वारिया हे प्रजापती समाजाचे आहेत. आप पक्षाने या जागेवरून गुजरातचे प्रदेशाध्यक्ष गोपाळ ईटालिया यांना उमेदवारी दिली आहे.

हेही वाचा >>> Gujarat Election 2022 : भाजपची पहिली यादी जाहीर, ३८ विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारली, हार्दिक पटेल यांना मात्र संधी

कटरगाम मतदारसंघाचे जातीय समीकरण काय आहे?

या मतदारसंघात प्रजापती आणि पाटीदार समाजाचे प्राबल्य आहे. येथे ९० हजार पाटीदार समाजाचे मतदार आहेत. तर प्रजापती समाजातील मतदारांची संख्या ७५ हजार आहे. याव्यतिरिक्त या मतदारसंघात स्थलांतरित मतदारांचीही संख्या बरीच आहे. कटरगाम मतदारसंघातील सुरत महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक ७, ९ आणि प्रभाग क्रमांक ६ मधील काही भाग येतो. मागील वर्षी झालेल्या पालिका निवडणुकीत आप पक्षाचे प्रभाग क्रमांक ७ मधून दोन तर प्रभाग क्रमांक ८ मधून एक नगरेसवक निवडून आला होता. याच कारणामुळे ही जागा जिंकण्यासाठी आपकडून प्रयत्न केला जात आहे.

हेही वाचा >>> विधेयकांच्या मंजुरीला दिरंगाई, तेलंगणाच्या राज्यपाल आणि राज्य सरकार पुन्हा आमनेसामने

भाजपाला ही जागा जिंकण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागेल, असे राजकीय जाणाकारांचे मत आहे. या मतदारसंघात भाजपाला मतविभागणीला सामोरे जावे लागू शकते. तसेच पक्षामधील बंडखोरी तसेच नाराजी हादेखील भाजपापुढील मोठा प्रश्न आहे. भाजपातील नाराजीचा आप पक्षाला फायदा होण्याची शक्यता आहे. भाजपातील साधारण २३ जणांनी या जागेवरून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. यामध्ये २०१९ साली भाजपात प्रवेश केलेले नरेंद्र मंडलाला पांडव यांचादेखील समावेश आहे. त्यामुळे पक्षातील नाराजी आणि बंडखोरीला थोपवून भाजपाला सर्वसहमतीच्या व्यक्तीला उमेदवारी द्यावी लागणार आहे. याच कारणामुळे ही जागा भाजपासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

भाजपाला जागा जिंकणे कठीण?

हेही वाचा >>> हिमाचल प्रदेश : निवडणूक जिंकण्यासाठी आश्वासनांचा पाऊस; काँग्रेस, भाजपाच्या जाहीरनाम्यांत नेमकं काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काँग्रेसलादेखील ही जागा जिकंण्याची आशा आहे. आप आणि भाजपा यांच्यात पाटीदार समाजाच्या मतांचे विभाजन झाल्यास त्याचा फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसने या जागेवर प्रजापती समाजाचा उमेदवार दिलेला आहे. याच कारणामुळे आगामी काळात या जागेवरून कोण बाजी मारणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.