scorecardresearch

गुजरातमध्ये ‘आप’चे व्यापरी कार्ड, भाजपाला टक्कर देण्यासाठी अरविंद केजरीवाल सक्रिय

आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी अहमदाबादच्या टाऊन हॉलमध्ये गेल्या १० दिवसांत  तिसऱ्यांदा उद्योगपतींसोबत संवाद साधला.

गुजरातमध्ये ‘आप’चे व्यापरी कार्ड, भाजपाला टक्कर देण्यासाठी अरविंद केजरीवाल सक्रिय

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आम आदमी पक्ष व्यापारी आणि छोटे व्यापारी आणि उद्योगपतींना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी अहमदाबादच्या टाऊन हॉलमध्ये गेल्या १० दिवसांत  तिसऱ्यांदा उद्योगपतींसोबत संवाद साधला. केजरीवाल यांनी यापूर्वी सौराष्ट्रातील राजकोट आणि जामनगर जिल्ह्यांमध्ये अशाच प्रकारच्या संवाद सभांचे आयोजन केले होते. हा भाग राज्याचे सुक्ष, लघु आणि मध्यम उद्योगांचे केंद्र मानले जाते.

२६ जुलै रोजी राजकोट येथे आयोजित पहिल्या बैठकीत केजरीवाल यांनी गुजरातमध्ये सत्तेवर आल्यास व्यापारी समुदायाला ‘ पाच वचने” दिली आहेत. भीतीचे वातावरण संपवणे, व्यापाऱ्यांबाबत समाजात आदर निर्माण करणे, भ्रष्टाचार नष्ट करणे, सुटसुटीत सरकारी सेवा प्रक्रिया, प्रलंबित व्हॅट रिबेट याचिका सहा महिन्यांत क्लिअर करणे आणि जीएसटी सुलभ करणे अशी पाच वचने केजरीवाल यांनी गुजरातमधील व्यापाऱ्यांना दिली आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व व्यावसायिक क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश असलेली सल्लागार समिती स्थापन करून व्यावसायिकांना “सरकारमधील भागीदार बनविण्याचे आश्वासन दिले आहे.  ५ ऑगस्ट रोजी जामनगरमधील टाऊन हॉलमध्ये आयोजित दुसऱ्या बैठकीत रेड राज” संपवण्याचे आश्वासन देत त्यांनी पाच आश्वासनांचा पुन्हा उच्चार केला.

‘आप’चा दावा आहे की त्यांच्या टाऊन हॉलमधील बैठकांना होणारी उद्योगपतींची हे त्यांचे मोठे यश आहे आणि गुजरातमध्ये व्यवसायांची भरभराट होत असल्याच्या राज्य सरकारच्या दाव्याच्या पोकळपणाचा पुरावा आहे. व्यावसायिक सार्वजनिक ठिकाणी उघडपणे बोलत नाहीत. परंतु खाजगीरित्या त्यांच्याकडे जीएसटी शासन आणि भ्रष्टाचार याबद्दल असंख्य तक्रारी असल्याचे ‘आप’ गुजरात व्यापारी शाखेचे प्रमुख शिवलाल बरासिया यांनी संगितले.

केवळ एमएसएमईच नव्हे तर पाच लाख ते पाचशे कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या व्यावसायिक घराण्यांनी त्यांच्या बैठकांना हजेरी लावली असल्याची माहिती ‘आप’ तर्फे देण्यात आली. बरासिया पुढे म्हणाले की “आमचे राजकीय प्रतिस्पर्धी आणि टीकाकार कदाचित ‘आप’ वर गरिबांना मोफत सुविधा देण्याचे आश्वासन देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करू शकतात. परंतु असे निष्कर्ष चुकीचे आहेत. टाऊन हॉलमधील व्यापारी आणि उद्योगपतींच्या मतदानावरून हे सिद्ध होते की सध्याच्या सरकारच्या धोरणांमुळे केवळ गरिबांनाच त्रास सहन करावा लागत आहे असे नाही तर व्यापारी बांधवही अडचणीत आहेत”. 

‘आप’ चे उद्दिष्ट हे समाजातील प्रत्येक घटकाचा आवाज उठवणे हेच आहे. त्यामुळे आमचा अजेंडा आणि फोकस क्षेत्र दर दोन आठवड्यांनी बदलत राहील असे आपकडून स्पष्ट करण्यात आले.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.