महेश सरलष्कर, नवी दिल्ली

हरियाणातील मनोहरलाल खट्टर सरकारमधील मित्र पक्ष जननायक जनता पक्षाचे प्रमुख दुष्यंत चौताला यांच्या लोकसभा निवडणुकीसाठी दोन जागांच्या मागणीचे कारण पुढे करत भाजपने राज्यात ‘गुजरात पॅटर्न’ राबवण्याचा प्रयत्न केला आहे. हरियाणामध्ये मंगळवारी झालेल्या वेगवान राजकीय घडामोडींमध्ये भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने प्रदेशाध्यक्ष नायब सिंह सैना यांना हरियाणाचे नवे मुख्यमंत्री केले असून मनोहरलाल खट्टर यांना डच्चू देण्यात आला आहे.

ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
Lok Sabha Elections Union Minister Jitendra Singh from Udhampur Constituency in Jammu Congress challenge to him
जितेंद्र सिंह यांच्यापुढे एकत्रित विरोधकांचे आव्हान
narendra modi rahul gandhi lalu yadav
“मुघलांच्या मानसिकतेतून…”, राहुल गांधी – लालू यादवांच्या ‘त्या’ व्हिडीओवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
narendra modi
“जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक होणार, राज्याला लवकरच…”, पंतप्रधान मोदींच्या तीन मोठ्या घोषणा

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांसह अख्खे मंत्रिमंडळ बदलण्याचा धाडसी निर्णय मोदी-शहांनी घेतला होता. कार्यक्षमता आणि लोकप्रियता दोन्हींमध्ये कमकुवत असलेले तत्कालीन मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना डच्चू देऊन भूपेंद्र पटेल यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती. हरियाणामध्येही लोकसभा निवडणुकीनंतर पुढील सहा महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार असून लोकप्रियता गमावू लागलेले खट्टर सरकार विद्यमान स्थितीत निवडणुकीला सामोरे गेले तर भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी आठ महिने भाजपने हरियाणातील पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी ‘जेजेपी’शी संबंध तोडून नवे मंत्रिमंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मानले जात आहे. नायब सैना ओबीसी असून नव्या मुख्यमंत्र्याकडे राज्याची धुरा देऊन भाजपने विधानसभा निवडणुकीचा मार्ग सुकर केला आहे.  

हेही वाचा >>>बसपच्या मुस्लीम उमेदवारांमुळे सपा-काँग्रेस अडचणीत; मायावतींची निवडणूक रणनीती काय?

हरियाणातील भाजप व जेजेपी आघाडी सरकारमध्ये शेतकरी आंदोलनाची हाताळणी, विविध आर्थिक घोटाळे अशा मुद्द्यांवरून दोन्ही पक्षांमधील मतभेद वाढू लागले होते. २०२१ मध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनाच्या हाताळणीमध्ये मुख्यमंत्री खट्टर यांनी दाखवलेली कथित असहिष्णुता आत्ता सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनातही कायम राहिली असल्याची तक्रार मित्र करू लागला होता. जाट समाज ‘जेजेपी’चा प्रमुख मतदार असून शेतकरी आंदोलनामध्ये जाट मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. त्यामुळे जाट मतदार पक्षापासून दूर जाण्याची भीतीही दुष्यंत चौताला यांना वाटू लागली होती.

शिवाय, दुष्यंत चौताला यांनी हिसार व भवानी महेंद्रगढ या दोन लोकसभेच्या जागांची मागणी केली होती. मात्र, या दोन्ही जागा भाजप सोडण्यास तयार नाही. हिसारचे विद्यमान खासदार बृजेंद्र सिंह यांनी भाजपचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे तिथे नवी समीकरणे तयार होऊ शकतात. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने हरियाणातील सर्वच्या सर्व १० जागा जिंकल्या होत्या. २०२४मध्येही स्वबळावर दहाही जागा जिंकण्याचा विश्वास प्रदेश भाजपच्या नेत्यांनी शहा-नड्डा यांना दिला आहे. त्यामुळे ‘जेजेपी’ची दोन जागांची मागणी भाजपने मान्य केलेली नाही. उपमुख्यमंत्री दुष्यंत चौताला यांनी गेले दोन दिवस शहा व नड्डांशी चर्चा केली आहे. हरियाणातील भाजप सरकारला कोणताही धोका नसल्याने ‘जेजेपी’शी तडजोड करण्यास भाजपने नकार दिला आहे. शिवाय, शेतकरी आंदोलनापासून जाट समाज भाजपपासूनही दूर जात असल्याचे प्रदेश भाजपच्या नेत्यांचे म्हणणे होते. जेजेपी, काँग्रेस व आयएनएलडी या तीनही पक्षांमध्ये जाट मतदारांची विभागणी होऊन लोकसभा निवडणुकीत भाजपला फायदा होईल असे गणितही मांडले जात होते.

हेही वाचा >>>कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या कुटुंबात कुणाला मिळणार भाजपाची उमेदवारी? राजकीय संकेत काय सांगतात?

हरियाणातील नव्या राजकीय घडामोडींमुळे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर व त्यांच्या मंत्रिमंडळाने मंगळवारी राजीनामा दिला आहे. जाटप्रभुत्व असलेल्या हरियाणामध्ये पंजाब खत्री समाजातील खट्टर यांनी आत्तापर्यंत राज्याचा कारभार सचोटीने हाताळला असला तरी, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला गुजरातप्रमाणे हरियाणामध्येही नवे नेतृत्व द्यावे लागणार होते. त्यामुळे खट्टर यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देऊन नव्या मुख्यमंत्र्यासह नव्या मंत्रिमंडळाचा विचार भाजपचे केंद्रीय नेतृत्व करत होते. खट्टर यांची उचलबांगडी करून त्यांच्याच विश्वासातील नायब सैनी यांना मुख्यमंत्री पदावर बसवले आहे.

हरियाणा ९० जागांच्या विधानसभेत भाजपकडे ४१, जेजेपीकडे १०, काँग्रेसकडे ३०, भाजपला पाठिंबा दिलेले अपक्ष ६, हरियाणा लोकहित पक्षाचा १ आमदार (गोपाल कांडा), अभय चौताला यांच्या आयएनएलडीकडे २ व अपक्ष १ अशी सदस्य विभागणी आहे. जेजेपीतील ५ आमदारांनी वेगळा गट केला असून त्यांनी भाजप सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत भाजप सरकारकडे ५३ आमदारांचे संख्याबळ आहे. बहुमतासाठी ४६ संख्याबळाची गरज आहे.