पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्या मावळ विधानसभा मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. यासाठी २ ऑगस्ट रोजी शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे आमदार शेळके यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून, मावळ विधानसभेवरून महायुतीत तिढा निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुती म्हणून एकत्रित विधानसभा निवडणुकीला सामोरी जाणार आहे. ‘ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला मतदारसंघ’ असे महायुतीचे प्राथमिक सूत्र ठरल्याचे सांगितले जाते. परंतु, घटक पक्षाचा आमदार असलेल्या मावळ मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. ही जागा कमळाच्या चिन्हावर लढविण्यासाठी आग्रह धरला आहे.

After Ajit Pawars visit NCP state general secretary resigned in Nagpur
अजित पवारांच्या दौऱ्यानंतर नागपुरात पक्षात पडझड, प्रदेश सरचिटणीसाचा राजीनामा
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
mahavikas aghadi jode maro andolan marathi news
महाविकास आघाडीचे आज ‘जोडे मारो’ आंदोलन; शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांची उपस्थिती
Ajit Pawar meeting in Katol assembly constituency on 31st August
अनिल देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांची ३१ला सभा, काय बोलणार?
Supriya Sule, Baramati Assembly, Supriya Sule on Baramati Assembly, candidate, Ajit Pawar, Jay Pawar , Yugendra Pawar, NCP, Sharad Pawar
बारामती विधानसभा उमेदवाराबद्दल खासदार सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य !
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या चेहऱ्याबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “आमच्याकडून…”
Loksatta karan rajkaran BJP challenge for Congress in Solapur City Madhya constituency of Praniti Shinde in Assembly elections 2024 print politics news |
कारण राजकारण: प्रणिती शिंदे यांच्या ‘सोलापूर शहर मध्य’मध्ये काँग्रेससाठी यंदा डोकेदुखी
Sharad Pawar, Vidarbha tour, sharad pawar in Nagpur, sharad pawar vidarbh tour, Nagpur,
शरद पवार नागपुरात, दणक्यात स्वागत; नेत्यांच्या भेटीगाठींकडे लक्ष

हेही वाचा : तमिळनाडूमध्ये महिनाभरात ५ राजकीय कार्यकर्त्यांची हत्या; काय आहे कारण?

मावळ विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. सलग २५ वर्षांपासून मावळातून भाजपचा आमदार निवडून येत होता. परंतु, २०१९ मध्ये भाजपमध्ये बंडखोरी झाली. पक्षाने बाळा भेगडे यांना उमेदवारी दिल्याने भाजपचे तत्कालीन नगरसेवक असलेल्या सुनील शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शेळके यांनी राज्यमंत्री असलेले भेगडे यांचा ९० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.

मागील पाच वर्षांत आमदार शेळके आणि भाजप पदाधिकारी यांमध्ये विविध कारणांनी खटके उडत राहिले. एका व्यासपीठावर येणेही टाळत होते. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत सत्तेत आल्यानंतरही त्यांच्यातील राजकीय मतभेद कमी झाल्याचे दिसले नाही. त्यातच आता भाजपने मावळ मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे आगामी काळात मावळ भाजप आणि आमदार शेळके यांच्यातील संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा : अरविंद केजरीवलांनंतर ‘आप’च्या आणखी एका नेत्याला होणार अटक? कोण आहेत दुर्गेश पाठक?

मावळ तालुक्यातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा २ ऑगस्टला मेळावा होणार आहे. याबाबत माजी आमदार बाळा भेगडे म्हणाले की, रामभाऊ म्हाळगी यांनी १९५७ ला जनसंघाच्या माध्यमातून मावळ तालुक्याचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले. १९५७ ते २०२४ या काळात सर्वाधिक वेळा जनसंघ, जनता पार्टी आणि भाजपचे आमदार मावळच्या जनतेने निवडून दिले आहेत. संघटनेच्या ताकदीवर लोकप्रतिनिधी निवडून देणारा मतदारसंघ म्हणून मावळ तालुका ओळखला जातो. त्यामुळे परंपरागत बालेकिल्ला असलेला मावळ मतदारसंघ भाजपला मिळावा म्हणून आम्ही आमच्या नेत्यांकडे आग्रहाची मागणी करणार आहोत.