राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रादेशिक प्रभारींची तीन दिवसीय बैठकीत नुकतीच पार पडली. आरएसएसने उदयपूर आणि अमरावती येथे झालेल्या क्रूर हत्यांच्या पार्श्वभूमीवर वाढत्या इस्लामिक कट्टरतावाद या विषयावर चर्चा केली. सरसंघचालक मोहन भागवत आणि सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे या प्रमुख नेत्यांनी उपस्थित पार पडलेल्या या बैठकीत कट्टरतावादाचा मुकाबला करण्याचे मार्ग आणि त्यात संघाची भूमिका हा प्रमुख चर्चेचा विषय होता.
“आरएसएसच्या अशा बैठकांमध्ये सर्व समकालीन विषयांवर चर्चा केली जाते. त्यामुळे साहजिकच उदयपूर आणि अमरावतीच्या घटनाही चर्चेत आल्या. या घटनांबद्दल कामगारांमध्ये संताप आहे. मात्र हा राग जबाबदारीने व्यक्त करावा लागेल अशी संघाची भूमिका आहे” असे या बैठकीला उपस्थित असलेल्या आरएसएसच्या वरिष्ठ कार्यकर्त्याने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झुंझुनू येथे गुरुवार ते शनिवार या कालावधीत प्रांत प्रचारक बैठक आयोजित करण्यात आली होती. करोना काळानंतर प्रादेशिक प्रभारींची ही पहिलीच प्रत्यक्ष बैठक होती. बैठकीनंतर संघाचे प्रचार प्रभारी सुनील आंबेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी देवी काली सिगारेट ओढत असल्याचं चित्रण करणाऱ्या चित्रपटाच्या पोस्टरच्या वादावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आंबेकर म्हणाले, “अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करताना लोकांच्या भावनांचीही काळजी घेतली पाहिजे”. उदयपूरच्या घटनेबाबत आंबेकर म्हणाले, “उदयपूरमधील निर्घृण हत्या ही पूर्णपणे निषेधार्ह आहे. या घटनेची कितीही निंदा केली तरी ती कमीच आहे. आपल्या देशात लोकशाही आहे. कोणाचे म्हणणे पटत नसेल तर लोकशाही पद्धतीने आपला निषेध व्यक्त करायला हवा.अशा घटनांवर सुसंस्कृत समाज नेहमीच टीका करतो”.

आरएसएसच्या म्हणण्यानुसार या बैठकीत करोना काळात प्रचारकांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला आणि भविष्यातील कामाची आखणी केली. आंबेकर म्हणाले की, ” गेल्या काही वर्षांत झालेल्या संघ शिक्षा वर्ग या संघाच्या प्रशिक्षण कार्यक्रमात जवळपास २३,००० लोक सहभागी झाले होते. यापैकी १८,९८१ लोक  ही ४० वर्षाखालील होती. २,२९२ लोकांचे वय ४० वर्षांपेक्षा जास्त होते. आरएसएसची देशभरात १०१ प्रशिक्षण केंद्रे आहेत.
आंबेकर म्हणाले की, कोरोनाच्या साथीनंतर आता आरएसएसचे लक्ष हे संघाचे कार्य पुन्हा जोमाने सुरू करणे आहे हे आहे. सध्या आरएसएसच्या ५६,८२४ शाखा  आहेत. कौटुंबिक मूल्यांचे जतन करण्यासाठी सुरू केलेल्या कुटूंब प्रबोधन कार्यक्रमाला नवा जोर आला असतानाही जलव्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छता यांवर आरएसएसचे कार्य सामाजिक सहभागाने चांगलेच प्रगतीपथावर आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In rss meeting they discussed about extremisms in the country pkd
First published on: 11-07-2022 at 19:19 IST