नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत विदर्भ व विशेषत: नागपूरला झुकते माप देण्यात आले आहे. पक्षाचे विदर्भातील ज्येष्ठ नेते चैनसूख संचेती यांना उपाध्यक्ष करून पक्षाने जुन्या नेत्यांची दखल घेतली. तर काही नव्या चेहऱ्यांनाही संधी देऊन नव्या-जुन्यांचा मिलाफ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भातील चार जिल्ह्यांतून एकही पदाधिकारी नियुक्त करण्यात आला नाही. फक्त कार्यकारिणी सदस्यांमध्ये तेथील नेत्यांचा समावेश आहे. अपेक्षेप्रमाणे नागपूरमधून वर्णी लागलेल्यामध्ये अपेक्षेप्रमाणे फडणवीस समर्थकांची संख्या अधिक आहे. वादग्रस्त मुन्ना यादव यांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील तीनही प्रमुख नेते विदर्भातील विशेषत: नागपूरचे असल्याने प्रदेश कार्यकारिणीतील या भागातील प्रतिनिधीत्वाकडे भाजप कार्यकर्त्यांचे अधिक लक्ष होते. २०२४ च्या लोकसभा, विधानसभा व त्यापूर्वी होणाऱ्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकी लक्षात घेता कार्यकारिणीत पक्षातील सर्व गटांना, समाजघटकांना तसेच पक्षाच्या पारंपारिक वर्गाला सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. हे करताना काही जिल्ह्यांना घसघशीत तर काही जिल्ह्यांना फक्त कार्यकारिणी सदस्यत्वापुरतेच प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. विशेषत: हे जिल्हे विदर्भातील असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

mahayuti in campaign, Mahavikas Aghadi,
महायुतीतील दिग्गज प्रचारात, तर महाविकास आघाडीत मोठ्या सभेची प्रतीक्षाच; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चौथ्यांदा यवतमाळात येणार
Campaigning by BJP outside the polling station Congress complaint to the Commission
मतदान केंद्राबाहेरच भाजपकडून प्रचार; प्रशासन बघ्याच्या भूमिकेत, काँग्रेसची आयोगाकडे तक्रार
Adam Master, adam master solapur
घरकुलांचे श्रेय घेणाऱ्या भाजपला फटकारत आडम मास्तर प्रणिती शिंदेंच्या पाठीशी, पारंपरिक प्रतिस्पर्धी आले एकत्र
Wrong campaign, gangster type people
कल्याण पूर्वेत गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून खासदार शिंदेंचा अपप्रचार, भाजपच्या वरिष्ठांनी दखल घेण्याची जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांची मागणी

हेही वाचा – Karnataka Election 2023 : “नरेंद्र मोदींचे सहकारी भ्रष्टाचारात गुंतलेले, भाजपाकडून मागितले जाते ४० टक्के कमिशन,” मल्लिकार्जुन खरगे यांचा गंभीर आरोप

कार्यकारिणीत सर्वात महत्त्वाचे नाव मलकापूरचे आमदार चयनसूख संचेती यांचे आहे. विदर्भातील सर्वात ज्येष्ठ नेत्यांमध्ये त्यांचा समावे्श होतो. अनेक वर्ष आमदार राहूनही २०१४ मध्ये पक्षाची सत्ता आल्यावर त्यांना मंत्री करण्यात आले नव्हते, शेवटच्या टप्प्यात त्यांना विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष करण्यात आले होते. पण तेही पद त्यांनी नाराजीनेच स्वीकारले होते. त्यांच्याकडे पक्षाने पाठ फिरवली असे वाटत असतानाच त्यांचा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यकारिणत समावेश करण्यात आला. जुन्या नेत्यांकडे पक्षाचे लक्ष असल्याचे संकेत या निवयुक्तीतून देण्यात आले. संजय भेंडे (नागपूर) यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे शहर अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव चर्चेत होते. विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांच्या उमेदवारीची चर्चा होती. पण ऐनवेळेवर त्यांचे नाव मागे पडते व त्यांना कार्यकारिणीत सामावून घेतले जाते. याही वेळी भेंडे यांच्याबाबत हेच झाल्याचे दिसून आले. नागपूरचे फडणवीस समर्थक ॲड. धम्मपाल मेश्राम यांना उपाध्यक्ष करण्यात आले आहे. उपेंद्र कोठेकर हे कार्यकारिणीत संघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांना विदर्भाचे संघटन सचिव करून बढती देण्यात आली आहे. अत्यंत महत्त्वाचे हे पद मानले जाते. कोठेकर यांची मागची कामगिरी लक्षात घेऊन त्यांच्यावरची जबाबदारी वाढवण्यात आली आहे. गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व कार्यकारिणी सदस्यत्वापुरतेच मर्यादित आहे, या जिल्ह्यातून एकही पदाधिकारी नियुक्त करण्यात आला नाही. भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात भाजपचा प्रभाव आहे हे येथे उल्लेखनीय.

हेही वाचा – कर्नाटकमध्ये प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मोदी विरुद्ध गांधी?

नागपूरचा विचार केला तर येथील फडणवीस समर्थकांना अधिक संधी देण्यात आली आहे. गडकरी यांनी अलीकडच्या काही वर्षात शहरातील राजकारणात लक्ष देणे बंद केल्याने त्यांच्या अनेक समर्थकांनी फडणवीस यांच्याकडे मोर्चा वळवला. यापैकी काहींची वर्णी ‘गडकरी समर्थक’ म्हणून प्रदेश कार्यकारणीत लावण्यात आली आहे. विशेष म्हणजे, वादग्रस्त मुन्ना यादव यांचा विशेष निमंत्रितांमध्ये करण्यात आलेला समावेश सर्वांच्या भुवया उंचावणारा ठरला आहे. यादव हे फडणवीस समर्थक मानले जातात. कार्यकारिणी सदस्य म्हणून समाविष्ट माजी आमदार अनिल सोले (नागपूर) हे गडकरी समर्थक म्हणून ओळखले जातात. माजी महापौर नंदा जिचकार (नागपूर), विशेष निमंत्रितांमध्ये माजी महापौर मायाताई नवनाते (नागपूर), माजी नगरसेवक राजीव हडप (नागपूर) हे फडणवीस समर्थक तर जि.प.चे माजी अध्यक्ष रमेश मानकर (नागपूर), सुधीर दिवे (वर्धा) गडकरी समर्थक आहेत.