जम्मू काश्मीरमधील प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येत या भागाला राज्याचा दर्जा द्यावा तसेच लवकरात लवकर येथे निवडणुका घ्याव्यात, असी मागणी केली आहे. हीच मागणी घेऊन जम्मू आणि काश्मीरमधील विरोधी पक्षाचे नेते दिल्लीमध्ये जाऊन वेगवेगळ्या पक्षप्रमुखांची भेट घेणार आहेत. या भेटीत जम्मू-काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीबद्दल चर्चा केली जाईल. यासह जम्मू काश्मीरमधील विविध पक्षांचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाचीही भेट घेणार आहे.

हेही वाचा >> रामदास कदमांचे बंधू पण ठाकरे गटाचे समर्थक, ईडीने अटक केलेले सदानंद कदम कोण आहेत?

फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी तीन तासांची बैठक

नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष तथा जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी येथील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत जम्मू-काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. तसेच जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाला लवकरात लवकर राज्याचा दर्जा द्यावा. लवकरात लवकर येथे निवडणुका घ्याव्यात, या मागणीवर सर्वांचे मतैक्य झाले.

जम्मू काश्मीरमध्ये २०१४ सालापासून विधानसभेची निवडणूक झालेली नाही

“इतर राज्यांप्रमाणेच आम्हालाही एका राज्याचा दर्जा हवा आहे. आम्ही दिल्लीला गेल्यानंतर निवडणूक आयोगाचीही भेट घेऊन लवकरात लवकर निवडणूक घ्यावी, अशी मागणी करणार आहोत. जम्मू काश्मीरमध्ये २०१४ सालापासून विधानसभेची निवडणूक झालेली नाही,” असे अब्दुल्ला म्हणाले.

हेही वाचा >> जळगावात महाविकास आघाडीला तडे; जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडीत खडसेंना धक्का

…तर मग निवडणूक घेण्यास काय अडचण आहे?

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर आलेली आहे. येणाऱ्या मे महिन्यात येथे जी-२० सदस्य राष्ट्रांची बैठक आयोजित केली जाईल, असे विधान केले होते. याच विधानाचा संदर्भ घेत अब्दुल्ला यांनी या भगात जी-२० राष्ट्रांची बैठक होण्यास काही अडचण नसेल, तर मग निवडणूक घेण्यास काय अडचण आहे? असा सवाल मोदी सरकारला केला आहे.

हेही वाचा >> Gujarat: मोदी सरकारवर आरोप करणारे निवृत्त IAS अधिकारी प्रदीप शर्मा यांना पुन्हा अटक; १५ वर्षांत १२ खटले दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

…नंतरच आगमी राजकारणाची दिशा ठरवली जाईल

दरम्यान, जम्मू काश्मीरमधील विरोधकांचे शिष्टमंडळ दिल्लीमध्ये गेल्यानंतर दिल्लीतील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहे. दिल्लीतील विरोधी पक्षांच्या राष्ट्रीय नेत्यांशी भेट झाल्यानंतरच पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांची भेट घ्यायची की नाही, हे ठरवले जाईल. या भेटसत्रानंतर आम्ही जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा बैठक घेऊ. त्यानंतर आमच्या आगामी राजकारणाची दिशा ठरवली जाईल, अशी माहितीही अब्दुल्ला यांनी दिली.