राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होण्याची शक्यता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वर्तविली असतनाच या दोन्ही निवडणुका एकत्र होणे अशक्य असल्याचे प्रत्युत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्याने या निवडणुका एकत्र की स्वतंत्रपणे होणार याबाबत संभ्रम कायम आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांची रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची शक्यता लक्षात घेता जागावाटपाची प्रक्रिया आतापासूनच सुरू करावी, अशी चर्चा झाली. त्यानुसार जागावाटपासाठी तीन पक्षांच्या प्रत्येकी दोन नेत्यांची समिती स्थापन करण्यात येईल. या समितीच्या माध्यमातून कोणी कोणत्या जागा लढवायच्या यावर चर्चा केली जाईल, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जाहीर केले.

Ajit Pawar, khadakwasla, Baramati lok sabha,
बारामतीच्या निकालाची ‘खडकवासल्या’वर भिस्त!… अजित पवारांनी दिली कबुली
odisha assembly elections BJD chief Naveen Patnaik chosen to contest from two seats
ओडिशाचे मुख्यमंत्री दोन जागांवर लढवणार निवडणूक; काय आहेत डावपेच?
narendra modi
“जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक होणार, राज्याला लवकरच…”, पंतप्रधान मोदींच्या तीन मोठ्या घोषणा
telugu desam party
“सत्तेत आल्यास उत्तम दर्जाचं मद्य, कमी किंमतीत उपलब्ध करून देऊ”, निवडणुकीपूर्वी चंद्राबाबू नायडूंचं मतदारांना आश्वासन

हेही वाचा – सिद्धरामय्या यांच्याविरोधातील भाजपाच्या उमेदवाराचे काय झाले? दोन जागांवर लढवली होती निवडणूक

महाविकास आघाडीने किंवा अजित पवार यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होतील, असा अंदाज व्यक्त केला असतानाच लोकसभेबरोबरच विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आज तरी दिसत नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी मत व्यक्त केले आहे. लोकसभा निवडणुकीनंतरही विधानसभेची मुदत ही सहा महिने आहे. यामुळेच यावर आजच अंदाज व्यक्त करणे घाईचे ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – सोलापूर लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादीची डोळा? सुशीलकुमार शिंदे यांची भूमिका महत्त्वाची

भाजपमध्ये एकत्रित निवडणुकांबाबत दोन मते आहेत. मोदी लाटेचा फायदा घेण्यासाठी लोकसभेबरोबरच विधानसभेची निवडणूक घ्यावी, असा एक मतप्रवाह आहे. तर लोकसभेबरोबर विधानसभेची निवडणूक घेतल्यास त्याचा कदाचित लोकसभेला फटका बसू शकतो, अशीही भीती व्यक्त केली जाते. राज्यातील नेत्यांनी कोणतीही भूमिका मांडली तरी शेवटी मोदी-शहा यांच्या पातळीवरच राज्याबाबत निर्णय होईल.